Submission Information On Receipt Rice Expenditure Number of Beneficiaries PM Poshan
Submission Information On Receipt Rice Expenditure Number of Beneficiaries PM Poshan
Regarding submission of information on receipt of rice, expenditure and number of beneficiaries under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana
pradhanmantri poshanshakti nirman yojanentargat shala staravar mahe april, 2026 akher shillak tandul v dhanyadi malachi nond karanebabat
Regarding recording of remaining rice and other grains at the school level as of the end of April 2026 under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांना प्रत्येक दोन महिन्याच्या कार्यदिवसाच्या मागणीनुसार तांदुळ व धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो. सद्यस्थितीमध्ये पुरवठा करण्यात येत असलेल्या तांदुळ व धान्यादी मालाची नोंद शाळा स्तरावर योजनेचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षकांमार्फत नोंदवहीमध्ये करुन घेण्यात येते. योजनेंतर्गत जिल्हा स्तरावरुन निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार शाळा स्तरावर देण्यात येणाऱ्या दैनंदिन लाभाची तसेच लाभार्थी संख्येनुसार दैनंदिन खर्च व शिल्लक याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावरुन घेण्यात येतात. शाळा स्तरावरील नोंदविण्यात येणाऱ्या नोंदीच्या कामकाजासाठी शिक्षकांचा अधिकचा वेळ सदर कामकाजामध्ये निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रस्तुत बाबीच्या अनुषंगाने शाळा स्तरावरील तांदूळ व धान्यादी माल खर्च/शिल्लक व मासिक एकत्रित गोषवारा याबाबतची ऑनलाईन सुविधा लातुर जिल्ह्यातील शाळांना देऊन पथदर्शी अभ्यास करण्यात आला आता राज्यातील सर्व शाळांना सदर सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
अ. शाळा स्तरावरुन करावयाची कार्यवाहीः-
१. योजनेस पात्र सर्व शाळांनी शाळा स्तरावरील दि.३० एप्रिल, २०२६ अखेर किंवा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील आहारवाटप केलेला जो अखेरचा दिवस असेल त्या दिवसाचा शिल्लक तांदुळ व धान्यादी मालाची नोंद एमडीएम पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या Opening Balance टॅब अंतर्गत करावयाची आहे.
२. शाळा स्तरावरील शिल्लक तांदुळ व धान्यादी मालाची नोंद कि. ग्रॅममध्ये करावयाची असून सदरची नोंद इ.१ ली ते ५ वी व इ. ६ वी ते ८ वी अशी नोंदविण्यात यावी.
३. सदरच्या शिल्लक तांदूळाची व धान्यादी मालाची नोंद पुर्ण झाल्यानंतर माहितीची पडताळणी करुन Save & Finailize करण्यात यावी.
४. सदची माहिती भरण्याबाबत शाळा स्तरावरुन करावयाच्या कार्यवाहीबाबतची माहिती पुस्तिका (Manual) यासोबत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शाळा स्तरावरील शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची माहिती भरल्यानंतर जिल्हा स्तरावरुन निश्चित करुन दिलेल्या पाककृतीनुसार शाळा स्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची दैनंदिन लाभार्थ्यांची माहिती एमडीएम पोर्टलवर नोंदविण्यात यावी. सदर माहिती Web Portal/App/SMS द्वारे असे ३ प्रकारे नोंदविता येईल.
५. शाळांच्या मागणीनुसार पुरवठादार संस्थेकडून शाळेस प्राप्त होणारा तांदूळ व इतर धान्यादी मालाची नोंद, सदरचे धान्य शाळांना प्राप्त झाल्यानंतर शाळा लॉगिनवर उपलब्ध असलेल्या Opening Balance या टॅब अंतर्गत शाळा स्तरावरुन नोंदविण्यात यावी. उक्त प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची नोंद एमडीएम पोर्टलवर शाळा स्तरावरुन नोंदविले नसल्यास सदर शाळेची महिना अखेरीची खर्च/शिल्लक मालामध्ये तफावत आढळून येईल. त्यामुळे सर्व शाळांनी यापुढील कालावधीत शाळेस प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची नोंद विहित कालावधीमध्ये एमडीएम पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक राहील. (सोबत मॅन्युअल दिले आहे)
६. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस सर्व शाळांना तांदुळ व धान्यादी माल याचा खर्च/शिल्लक अहवाल एकत्रितपणे Opening Balance या टॅब अंतर्गत PDF स्वरूपात उपलब्ध होणार आहे. सदर PDF प्रिंट करून जतन करावी त्यामुळे यानंतर नोंदवहीमध्ये नोंदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्व शाळांनी दैनंदिन उपस्थिती आणि प्राप्त धान्य यांची नोंद अचूकपणे विहित कालमर्यादेत एमडीएम पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे.
७. जिल्हा स्तरावरुन निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार सदरचा मेनू मोबाईल अॅपमध्ये दिसून येत असल्याची खात्री योजनेंतर्गत पात्र सर्व शाळांनी करावी. सदरची पाककृती अॅपमध्ये दिसून येत नसल्यास मोबाईल मधील सध्याचा App डिलीट करून MDM Portal वरून नव्याने App Install करावा त्याबाबतचे मॅन्युअल सोबत दिले आहे
आ. तालुका स्तरावरुन करावयाची कार्यवाही :-
१. शाळांनी नोंदविलेल्या माहितीनुसार शाळा स्तरावर शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची नोंद एमडीएम पोर्टलवर झाल्याची खातरजमा गटशिक्षणाधिकारी व अधीक्षक, पीएम पोषण यांच्या स्तरावरुन करण्यात यावी.
२. दैनंदिन माहिती तसेच शाळा स्तरावर प्राप्त होणारा तांदूळ व धान्यादी माल याची माहिती नोंदविण्याकरीता शाळांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण तात्काळ तालुका स्तरावरुन करण्यात यावे.
३. शाळा स्तरावर प्राप्त होणारा तांदूळ व धान्यादी माल याच्या नोंदी शाळा नियमितपणे शाळेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या टॅबमध्ये घेतील याची दक्षता घेणे तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सनियंत्रण करणे.
४. तालुका स्तरावरुन योजनेस पात्र शाळांपैकी केंद्रनिहाय दैनंदिन माहिती नोंदविलेल्या शाळांचा आढावा दररोज घेण्यात यावा
इ. जिल्हा स्तरावरुन करावयाची कार्यवाही :-
१. जिल्हा स्तरावरुन प्रस्तुत उपक्रमांतर्गत अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयांशी समन्वय ठेऊन जिल्ह्यातील सर्व शाळा दैनंदिन व शाळा स्तरावर प्राप्त होणात्या तांदूळ आणि धान्यादी मालाची माहिती एमडीएम पोर्टलवर नोंदवतील याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांच्या स्तरावरुन घेण्यात यावी.
२. केंद्र शासनाने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दैनंदिन लाभाच्या माहितीचा तपशील नोंदविण्याकरीता विकसित केलेल्या Automated Monitoring System (AMS Portal) वरील नोंदी तसेच शाळा स्तरावरील खर्च/शिल्लक साहित्याच्या नोंदीबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांच्या स्तरावरुन नियमित आढावा घेण्यात यावा.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांच्या स्तरावरुन विहित कालमर्यादेमध्ये सर्व शाळांची दैनंदिन माहिती एमडीएम पोर्टल/मोबाईल अॅपवर नोंदवली जाईल क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन संबंधितांना योजनेचे प्रभावी सनियंत्रण करण्याबाबत आदेशित करण्यात यावे.
वरीलप्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार सर्व शाळांनी कामकाज पूर्ण करावयाचे आहे व याकरीता जिल्हास्तरावरुन आवश्यक ते लेखी निर्देश क्षेत्रिय कार्यालय, शाळा/मुख्याध्यापक यांना देण्यात यावेत.
१. Opening Balance Manual (माहिती पुस्तिका)
२. Stock Inward Manual (माहिती पुस्तिका)
३. Mobile App Install Manual (माहिती पुस्तिका)
४. Daily Attedence Manual (माहिती पुस्तिका)
Digitally signed by
Sharad Shankargiri Gosavi Date: 01-07-2026 13:48:32
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
——– ALSO RESD ———-
📢 Poshan ShaktibNirman PM POSHAN
📢 शाळांसाठी महत्त्वाची सूचना
सर्व शाळांनी मुख्याध्यापक लॉगिन वरून शाळेतील तांदुळ आणि इतर धान्यादी मालाची 30 एप्रिल 2026 (शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक) रोजीची शिल्लक “Opening Balance” या टॅब अंतर्गत 10 जून 2026 पर्यंत नोंदवावी.
Also Read –
शाळांसाठी सूचना :
३० एप्रिल २०२६ (शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक) रोजीची सुरुवातीची शिल्लक 10 जून २०२६ पर्यंत अचूकपणे नोंदवावी.
सध्याचे मोबाईल ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करा आणि नव्याने इन्स्टॉल करण्यासाठी ते पीएम पोषण वेबसाइटवरून पुन्हा डाउनलोड करा.
विषय – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळांचे ओपनिंग बॅलेन्स भरणे बाबत संदर्भ – मा. शिक्षण संचालक (प्रा), म. रा. पुणे यांचे कार्यालयीन VC दि. 02/06/2026 मधील सुचना
उपरोक्त विषयान्वये आज दि. ०२/०६/२०२६ रोजी मा.शिक्षण संचालक (प्रा), म.रा.पुणे यांचेकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये MDM Portal वर शाळांनी करावयाच्या नोंदीबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
१. सर्व तालुक्यांनी आपल्या अधिनस्त सर्व शाळांकडून मुख्याध्यापक लॉगिन वरून शाळेतील तांदूळ आणि इतर धान्यादी मालाची ३० एप्रिल २०२६ (शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक) रोजीची शिल्लक “Opening Balance” या टॅब अंतर्गत १० जून २०२६ पर्यंत नोंद करून घेणेची आहे.
२. ३० एप्रिल २०२६ (शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक) रोजीची सुरुवातीची शिल्लक १० जून २०२६ पर्यंत अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे.
३. ज्या शाळा अॅप व्दारे Opening Balance ची नोंद करणार आहेत अशा शाळांनी पूर्वी चालू असलेला अॅप अनइन्स्टॉल करून नव्याने अॅप इन्स्टॉल करावा व त्यावरून Opening balance ची नोंद करावी.
४. शाळांनी आपल्या पोर्टलवरून अथवा अॅप व्दारे Opening Balance ची नोंद करून ती Approval साठी BEO लॉगिन ला पाठविणेची आहे.
५. BEO लॉगिन वरून सदर शाळांनी भरलेला Opening Balance ची खात्री करून त्याला Apporved करून Finalise करावे.
६. तसेच शैक्षणिक वर्ष चालू झालेनंतर ज्या दिवशी धान्यादी मालाचा पुरवठा होणार आहे त्या प्राप्त धान्यादी मालाची नोंद MDM पोर्टलवरील Stock Inward या टॅबव्दारे तात्काळ करणेची आहे. तसेच त्यानंतर देखील धान्यादी माल ज्याप्रमाणे प्राप्त होईल त्याप्रमाणे त्याप्रत्येकवेळी प्राप्त धान्यादी मालाची नोंद करावयाची आहे.
तरी सद्यस्थितीत दि. १० जून २०२६ पर्यंत आपल्या अधिनस्त सर्व शाळांकडून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत MDM Portal वर ३० एप्रिल २०२६ अखेरच्या तांदूळ व धान्यादी मालाच्या शिल्लकीची नोंद Opening Balance या टॅबव्दारे भरून घेण्याचे काम पूर्ण करून घेणेचे आहे. सदरचे काम कालमर्यादीत आहे याची नोंद घेणेत यावी.
सोवत – Opening Balance अॅपडेट मॅन्युअॅल,
🪀 JOIN OUR SOCIAL MEDIA 😀✨
https://whatsapp.com/channel/0029VaCGxzREAKWCYuyyo90Z
PM POSHAN MDM SCHOOL LOGIN LINK 👇
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5
महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना (स्वतंत्र कक्ष) प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे
जा. क्र. प्राशिसं/तांदूळ/२०२५/०००५३
दि.०९/०१/२०२५.
प्रति.
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदुळ प्राप्त, खर्च व लाभार्थी संखेची माहिती सादर करणे बाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे एप्रिल, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधी करीता शाळा, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदांनी नोंदविलेल्या मागणीनुसार १०० टक्के तांदूळ भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून उचल करुन शाळा व केंद्रीय स्वयंपाकगृहस्तरावर पुरवठा करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांना डिसेंबर, २०२४ व जानेवारी, २०२५ करीता तांदुळ नियतन मंजुर करण्यात आलेले आहे.
तथापि शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली संस्था तसेच पुरवठादार यांचेकडे शिल्लक असणाऱ्या तांदुळ व धान्यादी मालाचा आढावा न घेता पुढील तांदुळ मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे तांदुळ उचल, वाटप आणि लाभार्थी संख्या यांच्या प्रमाणामध्ये विसंगती आढळून येत आहे. सबब सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये सर्व शाळा आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था यांचेकडून अचूकपणे तांदूळ उचल, वाटप व शाळांस्तरावरील प्रत्यक्ष लाभार्थी संख्या यांची अचूक माहिती संकलित करुन प्राथमिक शिक्षण संचालनालयास दि. १५.०१.२०२५ पर्यंत सादर करण्यात यावी. जेणेकरुन जिल्ह्यांच्या मागणीनुसार पुढील तांदुळ नियतन मंजूर करणे सुलभ होईल. सदर माहिती त्वरीत संकलित करणेकरीता गुगल शीटचा उपयोग करण्यात यावा. जिल्ह्याची शाळानिहाय माहिती संचालनालयाकस सादर करुन नये, तालुकानिहाय एकत्रित माहिती सादर करण्यात यावी,
ज्या जिल्ह्यांची माहिती प्राप्त होणार नाही, अशा जिल्ह्याना पुढील कोणतेहीत तांदुळ नियतन मंजुर करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी तसेच जिल्ह्यांनी माहिती सादर करण्यात विलंब केल्यास व त्यामुळे तांदूळ नियतन मंजूर करण्यास विलंब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याची राहील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक),
महाराष्ट्र राज्य, पुणे

👌