Student WhatsApp SWADHYAY
Student WhatsApp SWADHYAY
WhatsApp SWADHYAY Upkram
जा.क्र.मप्राशिप/सशि/संगणक / VSK/२०२२-२३/2942
दिनांक: 30 OCT 2023
विषय : विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणेबाबत.
संदर्भ : केंद्र शासनाचे पत्र D.O.No.२०-२०/२०२२-१९.१, दि.३०/०६/२०२२
उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे. त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.
सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत राज्य मंडळाशी सलग्नित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इ. • 2 री ते ८ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अध्ययन निष्पत्ती निहाय ऑनलाईन साप्ताहिक स्वाध्याय प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहे.
सदर उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी आपल्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांना आदेशित करावे.
सोबत : १. साप्ताहिक स्वाध्याय वेळापत्रक
२. मार्गदर्शक सूचना
(समीर सावंत)
राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक
म. प्रा. शि. प. मुंबई
WhatsApp SWADHYAY Yojana
क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.८६/एसडी-६ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय, मुंबई दिनांक :- २५ नोव्हेंबर, २०२०
राज्यातील इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेला स्वाध्याय (SWADHYAY) – Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणेबाबत
उपरोक्त विषयान्वये दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे आणि Leadership For Equity (LFE) संस्था व ConveGenius यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाध्याय (SWADHYAY) – Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana उपक्रमाचे उद्घाटन मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. ह्या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना WhatsApp वर दर आठवडयात विषयनिहाय प्रश्न प्राप्त होतात व त्यांची online चाचणी (test) होते.
या उपक्रमाद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून WhatsApp वापरुन स्वाध्याय उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्याच्या फोनवर (quiz/ प्रश्नमंजुषा) घरच्या घरी फोनवर उपलब्ध असतील आणि त्याचा उपयोग करून शिक्षक, विद्यार्थी आणि
पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील. हे मुख्यतः राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (Functional literacy and numeracy) वाढविण्याचे एक साधन म्हणून वापरले जाईल. प्रारंभी, मराठी भाषा आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.
तरी या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालक यांपर्यंत जाणे आणि त्याद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची या उपक्रमामध्ये नोंद होणे, त्यांनी सहभागी होणे आणि उपक्रमाद्वारे स्व अध्याय करणे आवश्यक आहे. याकरिता याची माहिती सर्व अधिकारी तथा शिक्षक यांपर्यंत जाणे आवश्यक असून आपल्या स्तरावरून याची जागृती तथा विद्यार्थी सहभागासाठी प्रयत्न करावे.
प्रत्येक जिल्हास्तरावरून या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी विभाग, जिल्हा आणि केंद्र स्तरावरून विविध पर्यायांचा आणि माध्यमांचा वापर होणे आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत संबंधित जिल्ह्याचा WhatsApp नंबरच जाण्यासाठी प्रयत्न करणे, याकरिता जागृतीसाठी शिक्षक, पालक यांचे ऑनलाईन सत्र घेणे, शिक्षण परिषद तथा आढावा बैठकीमध्ये चर्चा घडविणे, शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीकरिता उपक्रमाची माहिती आणि वापर कसा करावा याबाबतचे सविस्तर पत्र काढणे आणि याकरिता स्थानिक सामाजिक माध्यम, स्थानिक वृत्तपत्रे, रेडिओ वा केबल या माध्यमांचा जागृतीसाठी आणि माहिती पोचविण्यासाठी वापर करणे इत्यादींचा वापर करता येईल.
विभागनिहाय WhatsApp नंबर खालीप्रमाणे –
विभाग
विभाग अंतर्गत जिल्हे
विभागनिहाय WhatsApp नंबर
नागपूर
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
+९१ ८५९५५ २४५१५
अमरावती
अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम
+९१ ८५९५५ २४५१५
औरंगाबाद
औरंगाबाद, नांदेड, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली
+९१ ८५९५५ २४५१६
कोकण
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
+९१ ८५९५५ २४५१८
पुणे
कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली
+९१ ८५९५५ २४५१९
नाशिक
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगांव
+९१ ८५९५५ २४५१७
उपरोक्त संबंधित जिल्ह्यांचा WhatsApp नंबर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याशी संबंधित नंबरवर Hello किंवा Namaskar असे पाठवण्यास सांगावे आणि विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन स्वाध्याय उपक्रमात सहभागी व्हावे. स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ पाहावा.
“स्वाध्याय” अंतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्न पाठवले जातील आणि ही दीर्घकालीन व नियमित चालणारी प्रक्रिया आहे आणि याचा दर १५ दिवसातून एकदा वरिष्ठ स्तरावरून जिल्हानिहाय आढावा घेतला जाईल. तरी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी.
वंदना कृष्णा
अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग.
whatsapp swadhyay dashboard LINK
whatsapp swadhyay link
wwhatsapp swadhyay report LINK