STARS SAT 1 PAT 2 MARKS CHATBOT LINK
STARS SAT 1 PAT 2 MARKS CHATBOT LINK
Sankalit Chachni 1
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन/सं.चा.१-VSK/२०२५-२६/
दि. २९ ऑक्टोबर २०२५
विषय : संकलित चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत…..
संदर्भ : १. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. SCERT-३८.०/७२/२०२५-EVALUATION ।/१४४२६७३/२०२५ दि.२३/०९/२०२५.
हेही वाचाल - संकलित चाचणी-१ (PAT-२) २०२५-२६ उत्तरसूची व गुणदाना बाबत सूचना तसेच गुणनोंद तक्ते पीडीएफ लिंक या ओळीला स्पर्श करा
समग्र शिक्षा अंतर्गत QUALITY INTERVENTION (५.३.१ funds for Quality (LEP) Innovation Guldance अंतर्गत Competency Based Periodical Assessment (PAT) सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ चे (PAT-२) आयोजन दि. १० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते.
प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित चाचणी-१ च्या (PAT२) चाचणीपत्रिका_शिक्षकांनी तपासावेत याबबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरावयाचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित चाचणी-१ (PAT-२) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित चाचणी-१ (PAT-२) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. संकलित चाचणी-१ (PAT-२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना
दि. ३० ऑक्टोबर २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
संकलित चाचणी-१ चे (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक –
तथापि, उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT_(महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित चाचणी-१ (PAT-२) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता दुसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा.

तरी त्यांच्या अधिनस्थ असणाऱ्या सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांच्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. तसेच सदर संकलित चाचणी-१ चे गुण नोंद ही दि. ३० ऑक्टोबर २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीतच चाटबॉटवर होणे अपेक्षित आहे. याकरिता मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के शाळांची गुणनोंदणी होईल याची दक्षता घ्यावी.
(मूळ टिपणी मा. संचालक यांनी मान्य केली आहे.)
सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व)
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा, (सर्व)
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम)
४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प. (सर्व)
