ST Ticket Fare Increase
ST Ticket Fare Increase
ST Ticket Bhade Wadh
विषय :- ग्रामिण सेवेच्या वाहतूकीतील सुधारित भाडेवाढीच्या अंमलबजावणीबाबत.
संदर्भः- राप.प. मध्यवर्ती कार्यालयाचे वाहतूक खाते परिपत्रक क्र. १/२०२५ पत्र क्र.राप/वाह/सामान्य/भाडेवाढ /३८२, दि. २४.०१.२०२५.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, पेट्रोलियम पदार्थ [डिझेल], चेसीस, टायर व महागाई भत्याच्या मुल्यात बदल झाल्याने त्यानुसार येणारे सुधारित प्रवास भाडे दर लागू करण्यास मा. संचालक मंडळाने, राज्य परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या २७६ व्या बैठकीत पारीत झालेल्या ठराव क्रं.०२/२०२५ नुसार मंजूरी दिली आहे. सदरची भाडेवाढ ही दि. २५.०१.२०२५ म्हणजेच दि. २४.०१.२०२५ व दि.२५.०१.२०२५ रोजीच्या मधील मध्यरात्री [००.०० वा.] पासुन अंमलात आणावयाची यावी.
ग्रामीण बससेवा सुधारित प्रवासभाडे दर.
सदरची भाडेवाढ आगार पातळीवर अंमलात आणण्यासाठी खालील निर्णयाच्या व माहितीच्या प्रति आपणांस सदर पत्रासोबत देण्यात येत आहेत. तसेच आगार पातळीवर करावयाच्या कार्यवाहीबाबत खालील सुचना देण्यात येत आहे.
सदरची भाडेवाढ ही रा.प. मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात येणार असल्यामुळे आगार पातळीवर नविन अॅन्ड्रॉइड इटीआयएम ओआरएस संगणकीय कार्यप्रणालीमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.
आगारामध्ये दि. २५.०१.२०२५ रोजी ००.०५ वा. नंतर इटीआयएम मशिनमध्ये वाहकाची प्रत्यक्ष कामगीरी लावून रा.प. महामंडळाच्या सर्व बससेवाप्रकारासाठी भाडेवाढ झाल्याची खात्री करण्यात यावी.
काही कारणांस्तव एखाद्या वाहकाच्या इटीआय मशिन मधुन सुधारित भाडेवाढीनुसार तिकीटे निघत नसल्यास अशा वाहकांना मॅन्युअल तिकीट ट्रे द्वारे फरकाचे तिकीट देण्याबाबत आदेशीत करावे.
झालेल्या भाडेवाढीबाबत आगारातील सर्व वाहकांना सुचना देऊन त्यांना सुधारित टप्पा दरपत्रकाच्या प्रति देऊन, प्रति मिळाले बाबत त्यांच्या स्वाक्ष-या नोंदवहीत घेण्यात याव्यात.
भाडे आकारणी संबंधी जन आंदोलना विषयी प्रतिबंधक कार्यवाही म्हणुन आगाराच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत येणारे मा. तहसिलदार व संबंधीत पोलीस स्टेशन यांना जातीने / पत्राद्वारे संपर्क साधुन योग्य ती कार्यवाही करावी.
आगार पातळीवर वरिल प्रमाणे कार्यवाही न झाल्यास व सुधारित भाडेवाढी प्रमाणे प्रवासभाडे रा.प. महामंडळास प्राप्त न झाल्यास होणा-या आर्थीक नुकसानीस आपली वैयक्तीक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी.
सुधारित भाडेवाढ अंमलात आल्यानंतर केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल | दाखला | दि.२५.०१.२०२५ रोजी १०.०० पर्यंत खास प्रतिनिधी मार्फत या कार्यालयास न चुकता पाठविण्यात यावा.
करीता आपले माहिती व उपरोक्त प्रमाणे कार्यवाहीस्तव.
Circular pdf Copy Link
विभाग नियंत्रक राज्य परिवहन