SSC Board Exam 2026 GEOGRAPHY Question Paper With Answer Pdf
SSC Board Exam 2026 GEOGRAPHY Question Paper With Answer Pdf
Class 10th SOCIAL SCIENCES (73) GEOGRAPHY SCIENCE-PAPER-II
इयत्ता १० वी राज्य मंडळ माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२६ सामाजिक शास्त्रे भूगोल प्रश्न पत्रिका आदर्श उत्तरसह पीडीएफ
SSC Board Exam 2026 GEOGRAPHY Question Paper With Answer Pdf
STD 10th GEOGRAPHY Paper Solution English & Marathi Medium
SOCIAL SCIENCES (73) GEOGRAPHY PAPER-II (M) सामाजिक शास्त्रे (७३) भूगोल पेपर-२ (म)
(REVISED COURSE)
2026 III 18 – 1100 N 970 Seat Number बैठक कमाक २०२६.०३.१८ – ११०० Time: 2 Hours
वेळ -२ तास Pages – 7 पृष्ठे -७ एकूण गुण -४० Total Marks: 40 एकूण गुण -४० 2026 III 18 – 1100 N 970 Seat Number बैठक कमाक

सूचना :-
(1) सर्व प्रश्न/कृती सोडविणे आवश्यक आहे.
(2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
(3) प्रश्न क्रमांक 4 (अ) साठी पुरविण्यात आलेल्या ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा.
(4) प्रश्न क्रमांक 6 (अ) साठी पुरविण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी.
(5) प्रश्नांची उत्तरे लिहितांना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे.
(6) प्रश्नांची उत्तरे लिहितांना आवश्यक तेथे आकृत्या/आलेख काढावेत.
(7) प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत. पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
(8) आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही.
सूचना :-
(1) सर्व प्रश्न/कृती सोडविणे आवश्यक आहे.
(2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
(3) प्रश्न क्रमांक 4 (अ) साठी पुरविण्यात आलेल्या ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा.
(4) प्रश्न क्रमांक 6 (अ) साठी पुरविण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी.
(5) प्रश्नांची उत्तरे लिहितांना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे.
(6) प्रश्नांची उत्तरे लिहितांना आवश्यक तेथे आकृत्या/आलेख काढावेत.
(7) प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत. पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
(8) आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही.
- अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा : 4
(1) वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन ……………….. आहे.
(i) रस्तेमार्ग
(ii) जलमार्ग
(iii) हवाईमार्ग
(iv) रेल्वेमार्ग
योग्य उत्तर – (ii) जलमार्ग
(2) भारताच्या मध्यातून गेलेल्या …………… पर्यंत सूर्य किरणे लंबरूप पडतात.
(i) विषुववृत्त
(ii) मकरवृत्त
(iii) कर्कवृत्त
(iv) रेखावृत्त
योग्य उत्तर – (iii) कर्कवृत्त
(3) ब्राझीलमधील वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो.
(i) पानझडी
(ii) काटेरी झुडपी
(iii) सदाहरित वर्षों
(iv) हिमालयीन
योग्य उत्तर – (iii) सदाहरित वर्षों
(4) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ……………..
(i) कमी राष्ट्रीय उत्पन्न
(ii) प्रचंड लोकसंख्या
(iii) मोठे कुटुंब
(iv) अन्नधान्य कमतरता
योग्य उत्तर – (ii) प्रचंड लोकसंख्या
2 वेगळा घटक ओळखा : (1)
ब्राझीलमधील राज्ये :
(i) साको पावलो
(ii) पाराना
(iii) बाहिया
(iv) उरुग्वे
योग्य उत्तर – (iv) उरुग्वे
(2) पठारी प्रदेश :
(i) महाराष्ट्र
(ii) पैटानल
(iii) कर्नाटक
(iv) तेलंगाना
योग्य उत्तर –
(3) भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे :
(i) मौसिनराम
(ii) चेरापुंजी
(iii) जैसलमेर
(iv) महाबळेश्वर
योग्य उत्तर – (iii) जैसलमेर
(4) ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार :
(i) चीन
(ii) जर्मनी
(iii) अमेरिकेची संयुक्त संस्थाने
(iv) कॅनडा
योग्य उत्तर – (iv) कॅनडा
- चूक की बरोबर सांगा (कोणतेही चार) : 4
(1) नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे.
योग्य उत्तर – चूक
(2) ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पर्तीच्या प्रजाती आहेत.
योग्य उत्तर – बरोबर
(3) गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य नाही.
योग्य उत्तर – चूक
(4) ब्राझीलच्या आग्नेय किणाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे.
योग्य उत्तर – बरोबर
(5) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
योग्य उत्तर – बरोबर
(अ) ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार) : 4
(1) ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र
योग्य उत्तर –
(2) रिओ दी जनेरीओ
योग्य उत्तर –
(3) ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने
योग्य उत्तर –
(4) विषुववृत्त
योग्य उत्तर –
(5) पॅराग्वे नदी
योग्य उत्तर –
(6) सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे राज्य
योग्य उत्तर –
(आ) खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) : 4
भारत प्रमुख नद्या व सरोवरे
प्रश्न –
(1) भारतातील अती उत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा.
योग्य उत्तर – वुलर सरोवर
(2) मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदया कोणत्या ?
योग्य उत्तर – नर्मदा व तापी
(3) कावेरी नदीचे उगमस्थान कुठे आहे ?
योग्य उत्तर – ब्रम्हगिरी डोंगरभाग
(4) मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?
योग्य उत्तर – ब्रम्हपुत्रा
(5) वरील नकाशा काय दर्शवितो ?
योग्य उत्तर – भारत प्रमुख नदया व सरोवरे
- भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन) : 6
(1) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
योग्य उत्तर –
(१) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.
(२) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.
(३) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
(2) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
योग्य उत्तर –
(१) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.
(२) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.
(३) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
(3) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
योग्य उत्तर –
(१) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.
(२) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.
(३) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
(4) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. 6.
योग्य उत्तर –
(१) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते.
(२) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विदयुतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
(३) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उदयोजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
(अ) खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 6
वर्ष भारत-साक्षरता प्रमाण (टक्केवारी)
1981 40.8
1991 48.2
2001 61.0
2011 69.3
प्रश्न :
(1) 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?
योग्य उत्तर – 69.3%
(2) 1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली ?
योग्य उत्तर – 12.8%
(3) 40.8% साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते ?
योग्य उत्तर – 1981
किंवा
(आ) खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 6
पर्यटन व अर्थव्यवस्था (2016)
पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या
एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान
योग्य उत्तर –
प्रश्न :
(1) वरील आलेखाचा प्रकार कोणता ?
योग्य उत्तर – जोड स्तंभालेख
(2) या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत ?
योग्य उत्तर – पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान
(3) कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे ?
योग्य उत्तर – ब्राझील
(4) भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे ?
योग्य उत्तर – ९.२%
(5) भारत व ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्यांचा फरक आहे ?
योग्य उत्तर – १.२%
(6) एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता ?
योग्य उत्तर – भारत
ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागत आहे
(१) वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
(२) दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रद्वणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
(३) वाढते प्रक्षण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या हासाच्या समस्येला तोंड दयावे लागत आहे.
(४) पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे.
- खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : 8
(1) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते ?
योग्य उत्तर –
(2) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.
योग्य उत्तर –
भारत आणि ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार खालीलप्रमाणे आहे:
भारत अक्षवृत्तीय विस्तार:
उत्तर ते उत्तर अक्षवृत्त रेखावृत्तीय विस्तार: पूर्व ते पूर्व रेखावृत्त
ब्राझील: अक्षवृत्तीय विस्तार:
उत्तर ते दक्षिण अक्षवृत्त रेखावृत्तीय विस्तार: पश्चिम ते पश्चिम रेखावृत्त Scribd.
थोडक्यात विश्लेषण:
भारत पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे.
ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात, तर मुख्य भाग दक्षिण गोलार्धात आणि पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे.
(3) ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?
योग्य उत्तर –
ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी उपाय
(१) जनजागृती करणे: लोकांना ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमार्फत मोहिमा राबवणे. नागरिक जेव्हा या स्थळांचा आदर करतील, तेव्हाच त्यांचे खऱ्या अर्थाने रक्षण होईल.
(२) तोडफोड आणि विद्रुपीकरणाला प्रतिबंध: अनेक लोक ऐतिहासिक भिंतींवर नावे कोरतात किंवा कचरा टाकतात. हे रोखण्यासाठी कडक नियम आणि दंडाची तरतूद असायला हवी. तसेच, परिसरात कचराकुंडीची सोय असावी.
(३) नियमित देखभाल आणि दुरुस्ती: पुरातत्व विभागामार्फत या स्थळांची वेळोवेळी वैज्ञानिक पद्धतीने स्वच्छता आणि दुरुस्ती केली पाहिजे. पावसामुळे किंवा प्रदूषणामुळे होणारी झीज रोखण्यासाठी रासायनिक संवर्धन (Chemical Conservation) करणे आवश्यक आहे.
(४) सुरक्षा व्यवस्था: महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवणे आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, जेणेकरून चोरी किंवा हानी टाळता येईल.
(५) डिजिटलायझेशन (Digitalization): प्रत्येक ऐतिहासिक स्थळाची माहिती, नकाशे आणि छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवावीत. क्यूआर कोड (QR Code) द्वारे पर्यटकांना त्या स्थळाचा इतिहास अचूकपणे समजावा.
(६) स्थानिक सहभाग: स्थानिक नागरिकांना या प्रक्रियेत सामील करून घेणे. मार्गदर्शक (Guides) म्हणून स्थानिकांना प्रशिक्षण दिल्यास ते या स्थळांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतील.
(७)पर्यटन शिस्त: पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवणे आणि त्यांच्यासाठी विशिष्ट नियमावली तयार करणे, ज्यामुळे वास्तूवर अतिरिक्त ताण येणार नाही.