SSC Board Exam 2025 GEOGRAPHY Question Paper With Answer PDF

SSC Board Exam 2025 GEOGRAPHY Question Paper With Answer PDF

image 69
SSC Board Exam 2025 GEOGRAPHY Question Paper With Answer PDF

SSC Board Exam 2025 GEOGRAPHY Question Paper With Answer PDF

Std 10th Exam 2025 GEOGRAPHY Answer Key

Iytta Dahavi Bhugol uttarsuchi Pariksha 2025

SOCIAL SCIENCES (73) GEOGRAPHY PAPER-II (M)
(REVISED COURSE)
सामाजिक शास्त्रे (७३) भूगोल पेपर-२ (म)
2025 III 17-1100 N 870 Seat No. बैठक क.
२०२५.०३.१७-११०० एकूण गुण ८० वेळ २ तास Time: 2 Hours Total Marks: 40

सूचना :-
(1) सर्व प्रश्न/कृती सोडविणे आवश्यक आहे.
(2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात,
(3) प्रश्न क्रमांक 4 (अ) साठी पुरविण्यात आलेल्या ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा,
(4) प्रश्न क्रमांक 6 (अ) साठी पुरविण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी.
(5) नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे.
(6) प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या, आलेख काढावेत.
(7) प्रश्नांचे उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत.
(8) आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही.
(9) पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत,


दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा

(1) भारत ब्राझील या देशाची राजवट प्रकाराची आहे.
(i) लष्करी
(ii) साम्यवादी
(iii) प्रजासताक
(iv) अध्यक्षीय

योग्य उत्तर – (iii) प्रजासताक

(2) हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे वारे अडविले जातात.
(i) अतिथंड
(ii) अतिवष्ण
(iii) उष्ण व कोरडे
(iv) बाष्पयुक्त

योग्य उत्तर – (i) अतिथंड

(3) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे.
(i) प्राथमिक
(ii) दवितीयक
(iii) तृतीयक
(iv) चतुर्थक

योग्य उत्तर – (iii) तृतीयक

(4) ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात क्रमांक आहे.
(i) पाचवा
(ii) सहावा
(iii) सातवा
(iv) चौथा

योग्य उत्तर – (i) पाचवा

2 वेगळ घटक ओळखा: 4

(1) क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य:
(i) प्रश्नावली
(ii) कमेरा
(iii) संगणक
(iv) नोंदवही

योग्य उत्तर – (iii) संगणक

(2) ब्राझीलमधील नदया :
(i) अॅमेझॉन
(ii) पैराग्वे
(iii) उरुग्वे
(iv) गंगा

योग्य उत्तर – (iv) गंगा

(3) प्राथमिक व्यवसाय :
(i) शेती
(ii) खाणकाम
(iii) पर्यटन
(iv) मत्स्य व्यवसाय

योग्य उत्तर – (iii) पर्यटन

(4) वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक :
(i) पाण्याची उपलब्धता
(ii) प्रतिकूल हवामान
(iii) सुपीक जमीन
(iv) अनुकूल हवामान

योग्य उत्तर – (ii) प्रतिकूल हवामान

3 चूक की बरोबर ते सांगा (कोणतेही चार) : 4
(1) भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे.
योग्य उत्तर – बरोबर

(2) ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू असतात.
योग्य उत्तर – चूक

(3) मैनॉस हे निग्रो व अॅमेझॉन या नक्ष्यांच्या संगमावरील बंदर आहे.
योग्य उत्तर – बरोबर

(4) ब्राझीलमध्ये लिंगगुणोत्तर जास्त आहे.
योग्य उत्तर – बरोबर

(5) ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे.
योग्य उत्तर – चूक

4 (अ) तुम्हास पुरविलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा (कोणतेही चार) : 4

(1) पंपास
(2) माराओं बेट
(3) ब्राझीलची राजधानी
(4) पिको दी नेब्लीना
(5) पैराना नदी
(6) मारान्हाओ राज्य
योग्य उत्तर –

image 70
SSC Board Exam 2025 GEOGRAPHY Question Paper With Answer PDF

(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) : 4

प्रश्न :
(1) वरील नकाशा काय दर्शवितो ?
योग्य उत्तर – भारत स्थान व विस्तार

(2) भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते ?
योग्य उत्तर – कन्याकुमारी

(3) भारतातील पूर्व-पश्चिम अंतर किती आहे ?
योग्य उत्तर – पुर्व-पश्चिम = 3000 किमी

(4) भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे ?
योग्य उत्तर – 82.30° रेखावृत्त

(5) भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
योग्य उत्तर –अरबी समुद्र

भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन) : 6
(1) हिमालयातील नदधा बारमाही वाहतात.
योग्य उत्तर –

(१) हिमालयातील बहुतांश नया अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात.
(२) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.
(३) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत.

(2) ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
योग्य उत्तर –

(१) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळसर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही.
(२) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.
(३) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीणस्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्येउष्णकटिबंधीय
वादळे कमी प्रमाणात होतात.

(3) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
योग्य उत्तर –

(१) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उत्न्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
(२) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
(३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात; म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

(4) ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही.
योग्य उत्तर –

(१) ब्राझीलमधील बहुतांश नयांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
(२) ब्राझीलमधील बहुतांश नयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
(३) ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गांचा
विकास झालेला नाही.

    किंवा 

(आ) दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : 6
ब्राझील भारत

image 71
SSC Board Exam 2025 GEOGRAPHY Question Paper With Answer PDF

स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान (2016)

image 73
SSC Board Exam 2025 GEOGRAPHY Question Paper With Answer PDF

व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी (2016)
प्राथमिक द्वितीयक तृतीयक

प्रश्न :
(1) प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे ?

योग्य उत्तर – भारत 48.8%.

(2) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान जास्त आहे ?

योग्य उत्तर – ब्राझील 67%

(3) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात ‌द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे ?
योग्य उत्तर – ब्राझील 27.5%

(4) ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे ?
योग्य उत्तर – तृतीयक व्यवसाय 71%

(5) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे ?
योग्य उत्तर – ब्राझील चे योगदान, भारतापेक्षा 10% ने जास्त आहे

(6) भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती ?
योग्य उत्तर – भारतात तृतीयक व्यवसाय 26.9%% आहे

प्रश्न ७ खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : 8

(1) क्षेत्रभेट म्हणजे काय ? क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल ?

योग्य उत्तर –

एखादया ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे ‘क्षेत्रभेट’ होय.

क्षेत्रभेटीची तयारी/तपशीलवार नियोजन पुढील प्रकारे करू :

(१) ठिकाणनिश्चिती :-
(i) क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे.
(ii) उदा. वन क्षेत्र, नदीकिनारा, शेत,समुद्रकिनारा, पर्वत, किल्ला, पठार, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी. शेत,

(२) हेतूनिश्चिती :
(i) क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे.
(ii) उदा. वनक्षेत्रास भेट देऊन या वनांतील प्राणी वनस्पती यांचा अभ्यास करणे इत्यादी.

(३) अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता :
(i) क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे.
(ii) उदा. वनक्षेत्रास भेट देण्यासाठी वनक्षेत्रपालाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी.

(४) प्रश्नावली निर्मिती :
(i) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे.
उदा. वनक्षेत्रास भेट देताना वनक्षेत्रपालाकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे :
(i) वनक्षेत्राचे नाव काय ?
(ii) वनक्षेत्राचा प्रकार कोणता?
(iii) वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी आढळतात ?
(iv) वनक्षेत्रात कोणकोणते वृक्ष आढळतात ?

(2) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले ?

योग्य उत्तर –

स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड दयावे लागले (१) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन यु‌द्धांना सामोरे जावे लागले.
(२) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.
(३) स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड दयावे लागले.
(४) स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड दयावे लागले.


(3) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते ?

योग्य उत्तर –

ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागत आहे
(१) वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे.
त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
(२) दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रद्वणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
(३) वाढते प्रक्षण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या हासाच्या समस्येला तोंड दयाचे लागत आहे.
(४) पर्यावरणाच्या जहासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे.

MAHARASHTRA STATE BOARD SSC EXAM 2025 ALL SUBJECT ALL MEDIUM QUESTION PAPER WITH ANSWER KEY / SOLUTION

Leave a Comment

error: Content is protected !!