SSC 10th Marathi Internal Assessment

Class 10th – Marathi Internal Assessment इयत्ता 10वी – मराठी अंतर्गत मूल्यमापन

eVA 1

इयत्ता १० वी मराठी कुमारभारती – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत मूल्यमापन – गुण २० Internal evaluation
इयत्ता १० वी मराठी कुमारभारती –
अ) श्रवण कौशल्य ०५ गुण
आ) भाषण कौशल्य ०५ गुण
इ) स्वाध्याय – १० गुण
तोंडी परीक्षेकरिता खालीलपैकी कोणतीही दोन कौशल्ये निवडणे अपेक्षित.
अ) श्रवण कौशल्य (खालीलपैकी कोणतेही एक निवडणे.)
श्रवण कौशल्याची चाचणी ‘श्रवण लेखन’ स्वरुपात घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध वेळ यानुसार विद्यार्थ्यांचे गट करावेत. खालील चार पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय श्रवण कौशल्यासाठी निवडावा.
१) परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे. (किमान ०५ प्रश्न) ( योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण)
सूचना –

i) निवडलेला परिच्छेद पाठयपुस्तकातील असावा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द )
ii) प्रस्तुत परिच्छेदावर किमान ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
(iii) प्रश्न फळयावर लिहून द्यावेत.
iv) प्रस्तुत परिच्छेद किमान २ वेळा सावकाश, स्पष्टपणे वाचून दाखवावा.
v) फळयावर लिहिलेल्या ५ प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
(vi) प्रत्येक गटासाठी स्वतंत्र परिच्छेद निवडावा.
vii) प्रत्येक प्रश्नाला १ गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे.
(viii) एकूण गुण पाचपैकी दयावेत.
ix) निवडलेले परिच्छेद, त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्याच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
२) ५ वाक्ये किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.
(योग्य वाक्यास प्रत्येकी एक गुण, योग्य १० शब्द लिहिल्यास प्रत्येकी अर्धा गुण)
वाक्यांसंदर्भात सूचना-
1) पाठयपुस्तकातील कोणतीही ०५ वाक्ये निवडावीत.
३) ४ ते ५ शब्दांचे वाक्य असावे.
iii) २ सोपी, २ मध्यम व १ कठीण याप्रकारे वाक्ये निवडावीत.
iv) प्रत्येक वाक्य किमान २ वेळा सुस्पष्टपणे वाचून दाखवावे.
v) एकेक वाक्य शिक्षकांनी वाचून विद्यार्थ्यांनी ते ऐकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.

i) निवडलेला परिच्छेद पाठयपुस्तकातील असावा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द )
ii) प्रस्तुत परिच्छेदावर किमान ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
(iii) प्रश्न फळयावर लिहून द्यावेत.
iv) प्रस्तुत परिच्छेद किमान २ वेळा सावकाश, स्पष्टपणे वाचून दाखवावा.
v) फळयावर लिहिलेल्या ५ प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
(vi) प्रत्येक गटासाठी स्वतंत्र परिच्छेद निवडावा.
vii) प्रत्येक प्रश्नाला १ गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे.
(viii) एकूण गुण पाचपैकी दयावेत.
ix) निवडलेले परिच्छेद, त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्याच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
२) ५ वाक्ये किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.
(योग्य वाक्यास प्रत्येकी एक गुण, योग्य १० शब्द लिहिल्यास प्रत्येकी अर्धा गुण)
वाक्यांसंदर्भात सूचना-
1) पाठयपुस्तकातील कोणतीही ०५ वाक्ये निवडावीत.
३) ४ ते ५ शब्दांचे वाक्य असावे.
iii) २ सोपी, २ मध्यम व १ कठीण याप्रकारे वाक्ये निवडावीत.
iv) प्रत्येक वाक्य किमान २ वेळा सुस्पष्टपणे वाचून दाखवावे.
v) एकेक वाक्य शिक्षकांनी वाचून विद्यार्थ्यांनी ते ऐकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
किंवा
शब्दांसंदर्भात सूचना

i) पाठयपुस्तकातील १० शब्दांची निवड करावी.
ii) ४ सोपे, ४ मध्यम, २ कठीण याप्रकारे शब्दांची निवड करावी.
(ii) शिक्षकांनी एकेक शब्द किमान २ वेळा सुस्पष्टपणे वाचून दाखवाया.
iv) एकेक शब्द शिक्षकांनी वाचून विद्यार्थ्यांनी तो ऐकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
श्रवणकौशल्यासाठी निवडलेली पाच वाक्वे किंवा दहा शब्द गटवार नियोजनानुसार लिखित स्वरुपात असावीत.
ऐकून लिहिलेली वाक्ये किंवा शब्द वासंबंधीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या पुरवण्या व गुणपत्रक शालेयस्तरावर जपून ठेवावे.
३) कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
(किमान ५ प्रश्न ) ( योग्य उत्तरास प्रत्येकी १ गुण)

सूचना-

1) पाठयपुस्तकातील कविता निवडणे अपेक्षित,
II) निवडलेल्या कवितेवर ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
ii) कवितेवरील प्रश्न फळयावर लिहावेत. iv) प्रस्तुत कविता किमान दोन वेळा सावकाश लयीत, स्पष्टपणे वाचून दाखवावी.
४) फळयावर लिहिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिने अपेक्षित आहे.
(vi) प्रत्येक गटासाठी स्वतंत्र कविता निवडावी.
vii) प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे.
ix) निवडलेल्या कविता, त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.

४) ऑडिओक्लिप ऐकून त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे. (किमान ५ प्रश्न) ( योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण )
सूचना
i) पाठयपुस्तकातील पाठ्यांशावर आधारित ऑडिओक्लिप ऐकवावी.
ii) ऑडिओक्लिप स्वतः तयार करावी.
iii) निर्दोष असावी.
(iv) प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ऑडिओक्लिप असावी.
v) ऑडिओक्लिप वर आधारित ५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
vi) हे प्रश्न ऑडिओक्लिप ऐकवण्यापूर्वी फळयावर लिहावेत.
vii) ऑडिओक्लिप किमान २ वेळा विद्यार्थ्यांना ऐकवून विद्यार्थ्यांनी संबंधित ५ प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
viii) प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे.
ix) एकूण गुण ५ पैकी दयावेत.
x) ऑडिओ क्लिप सोडून त्यावर आधरित ५ प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित.
(xi) ऑडिओक्लिप, त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेयस्तरावर जपून ठेवावे.

आ) भाषण कौशल्य (खालीलपैकी कोणतेही एक)
‘भाषण’ हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. विदयार्थ्यांनी ऐकलेला, वाचलेला, अनुभवलेला प्रसंग भाषेद्वारे व्यक्त करणे किंवा स्वतःचे विचार, मत योग्य भाषेत प्रकट करणे, या कौशल्यात अभिप्रेत आहे.
विचारांची स्पष्टता, मांडणी, समर्पक शब्दरचना, भाषिक समज, सभाधीटपणा इत्यादी मुद्दे भाषण कौशल्याच्या मूल्यमापनात विचारात घ्यावेत.
1) वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करणे.

सूचना
i) विदयार्थ्यांच्या वयोगटानुसार कोणतीही दहा पुस्तके निवडावीत. या पुस्तकांची यादी विदयार्थ्यांना वर्षाच्या सुरूवातीस दयावी.
ii) ही पुस्तके विदयार्थ्यांना शालेय वाचनालयात सहज उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करावी.
विदयार्थ्यांनी या व्यतिरिक्त स्वतःहून वेगळे पुस्तके निवडले तरी त्याचे स्वागत करावे. विदयार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी स्वत:चे मत किमान ०३ मिनिटात व्यक्त करणे अपेक्षित आहे. iv)
v) स्वमत प्रकटीकरणात पुस्तकाचे नाव, लेखक, पुस्तकात मांडलेला विचार, लेखनशैली, पुस्तक आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण, पुस्तकाचा प्रभाव इत्यादी मुद्दे विचारात घ्यावेत.
vi) शालेय स्तरावर प्रत्येक विदयार्थ्याचे भाषण कौशल्य स्वतंत्रपणे तपासावे. गुणदान योजनेतील तक्त्यानुसार योग्य गुणदान करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विदयार्थ्यांची यासंबंधीची सविस्तर नोंद असलेली वही शालेय स्तरावर जपून ठेवणे
vii) आवश्यक आहे. दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करणे. (सदर विषय विदयार्थ्यांच्या अनुभवविश्वाशी सुसंगत असावेत.)

सूचना
i) विदयार्थ्याच्या भावविश्वाशी निगडीत असे दहा ते पंधरा विषय विदयार्थ्यांसमोर ठेवावेत.
ii) या विषयांवर शिक्षकांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
विदयार्थ्यांना विषय – निवडीचे स्वातंत्र्य दयावे.
iv) २ ते ३ मिनिटे कालमर्यादा असावी.
v) या कौशल्याचा अंतिम परीक्षेआधी किमान तीन वेळा सराव व्हावा.
vi) विचारप्रकटीकरणात विषयाला धरून केलेला विचार, सूत्रबद्ध मांडणी, समर्पक भाषा, आत्मविश्वास इत्यादी मुद्दे विचारात घेऊन मूल्यमापन होणे अपेक्षित आहे.
2) दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करणे. (सदर विषय विदयार्थ्यांच्या अनुभवविश्वाशी सुसंगत असावेत.)

सूचना –
i) विदयार्थ्याच्या भावविश्वाशी निगडीत असे दहा ते पंधरा विषय विदयार्थ्यांसमोर ठेवावेत. या विषयांवर शिक्षकांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
विदयार्थ्यांना विषय – निवडीचे स्वातंत्र्य दयावे. २ ते ३ मिनिटे कालमर्यादा असावी. v) या कौशल्याचा अंतिम परीक्षेआधी किमान तीन वेळा सराव व्हावा.
vi) विचारप्रकटीकरणात विषयाला धरून केलेला विचार, सूत्रबद्ध मांडणी, समर्पक भाषा, – आत्मविश्वास इत्यादी मुद्दे विचारात घेऊन मूल्यमापन होणे अपेक्षित आहे.
vii) शालेय स्तरावर प्रत्येक विदयार्थ्यांचे विचार प्रकटीकरण स्वतंत्रपणे तपासावे. गुणदान योजनेतील तक्त्यानुसार योग्य गुणदान करणे अपेक्षित आहे. –
viii) प्रत्येक विदयार्थ्यांची यासंबंधीची सविस्तर नोंद असलेली वही शालेय स्तरावर जपून ठेवणे आवश्यक आहे.
3) पाठ्यपुस्तकातील पाठ किंवा कविता यांवर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करणे. (विषयानुसार मांडणी, भाषाशैली, सभाधीटपणा, आकर्षक सुरूवात योग्य शेवट या मुद्दयांचा विचार – गुणदानासाठी करणे अपेक्षित.)

सूचना-
1) प्रस्तुत संदर्भानुसार शिक्षकांकडून विशिष्ट मार्गदर्शन अपेक्षित आहे.
iii) पाठ अथवा कवितेसंबंधी स्वतःचे विचार प्रकट करतांना विदयार्थ्यांनी खालील मुद्दे
विचारात घ्यावेत पाठ अथवा कवितेचे नाव, लेखक अथवा कवी / कवयित्री, पाठाची /कवितेची मध्यवर्ती कल्पना, विचार, पाठ / कविता आवडणे वा न आवडणे यामागील विचार
iii) प्रत्येक विदयार्थ्याचे संबंधित पाठ / कवितेवरील विचार स्वतंत्रपणे ऐकून मूल्यमापन करावे.
iv) गुणदान योजनेतील तक्त्यानुसार योग्य गुणदान करणे अपेक्षित आहे.
v) प्रत्येक विदयार्थ्याची यासंबंधीची सविस्तर नोंद असलेली वही शालेय स्तरावर जपून ठेवणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे
श्रवण व भाषण कौशल्यांचे अंतर्गत मूल्यमापन शालेयस्तरावर होणार असले तरी ते पारदर्शक व्हावे. अंतर्गत मूल्यमापनाचे गांभीर्य लक्षात ठेवावे.
श्रवण व भाषण कौशल्यांच्या अंतिम मूल्यमापनापूर्वी उपलब्ध वेळेनुसार साधारणतः तीन वेळा सराव द्यावा.
इ) स्वाध्याय – १० गुण

सूचना-
प्रत्येक विदयार्थ्याने संपूर्ण वर्षात दोन स्वाध्याय पूर्ण करणे अपेक्षित आहे.
ii) प्रत्येक स्वाध्यायास ०५ गुण.
दोन पैकी एक स्वाध्याय गदय अथवा पदय घटकावर आधारित असावा. स्वाध्यायात आकलन, स्वमत, अभिव्यक्ती इत्यादी प्रकारांच्या कृती असणे अपेक्षित आहे.
iv) दुसरा स्वाध्याय उपयोजित लेखनातील घटकांवर आधारित असावा. या घटकांपैकी कोणताही एक घटक स्वाध्यायासाठी निवडावा.
v) हे दोन स्वाध्याय शालेय उत्तरपत्रिकेच्या दोन स्वतंत्र पुरवण्यांवर लिहिलेले असावेत.
vi) हे स्वाध्याय तपासून योग्य गुणदान करावे.
vii) तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणयादया शालेयस्तरावर जपून ठेवाव्यात.

अंतर्गत मूल्यमापन – गुणपत्रिका
एकूण गुण. २० –
अ. क.परीक्षा क्रमांकअ (५ गुण) (श्रवण कौशल्य)आ (५ गुण) + (भाषण कौशल्य)इ (१० गुण) + ( स्वाध्याय)एकूण गुण = (२० पैकी )
      
अ) श्रवण कौशल्य – ०५ गुण
खालीलपैकी कोणतेही एक कौशल्य निवडा. निवडलेल्या कौशल्यावर खूण करा.
अ. क्र.परीक्षा क्रमांक१ परिच्छेद ऐकून त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे.०२ ५ वाक्ये किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.०३ कविता ऐकून त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे०४ ऑडिओ क्लीप ऐकवून त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे
      
आ) भाषण कौशल्य – ०५ गुण
खालीलपैकी कोणतेही एक कौशल्य निवडा. गुणदान तक्त्यातील
योजनेनुसार गुणांची नोंद करा.
अ. क.परीक्षा क्रमांकपुस्तकाचे लेखकाचे नाव (०१ गुण)विषयाला समर्पक स्वमत मांडणी (०३ गुण)भाषाशैली (०१ गुण)एकूण गुण (०५ पैकी)
      
२) दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करणे
अ. क. परीक्षा क्रमांक भाषाशैली (०१ गुण)
एकूण गुण (०५ पैकी)
अ. क.परीक्षा क्रमांकनिवडलेला विषय (०१ गुण)विषयानुसार समर्पक विचार मांडणी (०३ गुण)भाषाशैली (०१ गुण)एकूण गुण (०५ पैकी)
      
३) पाठयपुस्तकातील पाठ किंवा कविता यावर ८ ते १० वाक्यांत आपले विचार प्रकट करणे
अ. क.परीक्षा क्रमांकनिवडलेला पाठाचे किंवा कवितेचे नाव (०१ गुण)निवडलेल्या घटकाविषयी समर्पक विचार मांडणी (०३ गुण)भाषाशैली (०१ गुण)एकूण गुण (०५ पैकी)
      

Leave a Comment

error: Content is protected !!