SPIC MACAY
SPIC MACAY
For cultural collaboration with SPIC MACAY.
SPIC MACAY Project SCERT Guidelines
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
दि. १७/१०/२०२५
जा.क्र. राशैसंप्रपम/कला व क्रीडा/स्पिक मैके शा. पत्र/२०२५-२६/
विषय : स्पिक मैके (SPIC MACAY) सोबत सांस्कृतिक सहयोगासाठी.
संदर्भ : व्यवस्थापक, स्पिक मैंके, नवी दिल्ली यांचे पत्र.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, भारताचा सास्कृतिक वारसा हा शास्त्रीय संगीत, गायन, वादन, नाट्य, नृत्य, लोककला व हस्तकला इत्यादी सर्वागांनी समृद्ध असणाऱ्या जगातील मोजक्याच वारशापैकी एक आहे. आपल्या या सांस्कृतिक वारशाची ओळख प्रत्येक विद्यार्थी व नागरीकांच्या मनात आपल्या देशाविषयीचा अभिमान जागृत करते आणि त्याच्या व्यक्तिमत्व विकासात महत्वाचे योगदान देते. हा वारसा प्रत्येकाला अनेक शतकांपासून आपल्या पूर्वजांनी केलेल्या अथक मेहनतीची आणि कला, आपल्या समाज जीवनाचा अविभाज्य घटक असल्याची जाणीवही करून देतो.
स्पिक मैंके (SPIC MACAY- Society for the Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) ही एक राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून तरुण पिढीला या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यासाठी समर्पित भावनेने अनेक दशकांपासून कार्य करीत आहे. आजच्या वेगाने बदलत जाणाऱ्या जगात तरुण पिढी आणि आपली संस्कृती यांच्यात दरी निर्माण होत आहे. सदर संस्थेचे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत व कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या मैफिली, व्याख्यान, प्रात्यक्षिके, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, हेरिटेज वॉक आणि संवाद सत्राचे आयोजन करणे, तसेच समृद्ध वारसा (VIRASAT), सण-उत्सव (FEST) आणि नॅशनल स्कूल इंटेन्सिव्ह (National School Intensive) यासारख्या स्पिक मॅकेच्या वार्षिक कार्यक्रमांचे आयोजन करून यातील अंतर कमी करणे हे संस्थेचे उद्धिष्ट आहे. राष्ट्र घडविण्यात शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात यावर सदर संस्थेचा दृढ विश्वास आहे. शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या सांस्कृतिक परंपरेबद्दल आदर, कौतुक आणि प्रेम रुजवण्याचे कार्य प्रभावीपणे करू शकतात.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ प्रेरणाच मिळत नाही, तर शिस्त, समर्पण आणि कलात्मक उत्कृष्टता यांचे मूर्तीमंत रूप असलेल्या दिग्गज कलाकारांशी संवाद साधण्याची दुर्मिळ संधी देखील मिळते. सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा इच्छुक असल्यास संबंधित संस्थेच्या श्रीम. सिम्पी सिंह, स्वयंसेवक, ९९७१४८८७४६ स्पीक मॅके, श्री. प्रकाश ढोबले, स्वयंसेवक, ९४२२४९६६२० स्पीक मॅके यांना संपर्कसाधावा तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांना आदेशित करण्यात यावे.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे- १
मा.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
प्रत माहितीस्तव व योग्य कार्यवाहीस्तव सादरः-
१. शिक्षण संचालक (प्राथमिक, माध्यमिक, योजना) शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे.
२. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
३. स्पीक मॅके व्यवस्थापक, नवी दिल्ली.
प्रति,
१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), जि. प. (सर्व)
४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई.
५. प्रशासकीय अधिकारी न.पा./ म.न.पा. (सर्व)
SPIC MACAY
