Special Education Conference On Positive Discipline
Special Education Conference On Positive Discipline
Organizing a special education conference on the topic of positive discipline SCERT PUNE Guidelines
Regarding organizing a special education conference on the topic of positive discipline at the district, taluka and central levels in the state….
Regarding organizing a special education conference on the topic of positive discipline at the district, taluka and central levels in the state….
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जाक्र. राशैसंप्रपम/साव्यावि/शि.प./२०२५/
दिनांक :- २९/११/२०२५
विषय :- राज्यामध्ये जिल्हा, तालुका, केंद्रस्तरावर सकारात्मक शिस्त या विषयावर विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन करणेबाबत….
संदर्भ :
१) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण ३२१६/(९४/२०१६) प्रशिक्षण दि. १ सप्टेंबर, २०१६
२) मा. मंत्री, शालेय शिक्षण यांचे कार्यालयाचे दि.२६ नोव्हेंबर २०२५ चे पत्र
उपरोक्त विषयान्वये मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण यांचे संदर्भिय पत्रातील निर्देशानुसार राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून समाजात याविषयीची चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक-विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने, राज्यातील सर्व जिल्हे, तालुके अथवा केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवडयात किंवा डिसेंबर च्या पहिल्या आठवडयात ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर किमान ४५ मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याबाबत मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण) यांनी निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने तात्काळ आपले स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात याव्यात. या मार्गदर्शन सत्रामध्ये पुढील मुद्दयांचा समावेश असावा.
१) शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतूदी व शिक्षकांची जबाबदारी
२) शिक्षेचे प्रकार व स्वरुप शारीरिक, शाब्दिक, भावनिक, मानसिक तसेच भिती दाखविण्याकरता केलेली कृती
३) शिक्षेचे परिणाम भीती, न्यूनगंड निर्माण होणे, अबोल होणे, अध्ययन गतीचा वेग मंदावणे, मुले भित्री किवा आक्रमक होणे
४) शिक्षेचे मनावर व मेंदूवर होणारा परिणाम
५) विविध शैक्षणिक विचारवंत व त्यांचे सकारात्मक शिस्तीविषयीचे विचार
६) सकारात्मक शिस्त तत्वे व त्यांची अंमलबजावणी
७) संवाद, सहकार्य व समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन
८) योग्य शिस्तीचे मार्ग, सकारात्मक शिस्तीचे विविध तंत्रे व उपक्रम
९) अलीकडील घटनांचा संदर्भ घेऊन शिक्षकांची संवेदनशीलता वाढविणे
अधिक माहितीसाठी सोबत जोडलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग दोन यामधील सकारात्मक शिस्त एक आव्हान या लेखाचा
आधार घेण्यात यावा. सदर परिषदांचे संक्षिप्त अहवाल दोन दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयाच्या सी.पी.डी. विभागाच्या
💌 cpddept@maa.ac.in या ई मेल वर सकल मराठी फौट मध्ये सादर करण्यात यावा. यामध्ये या विषयावर जिल्हानिहाय आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण परिषदांची संख्या, सहभागी एकूण शिक्षकांची संख्या, महत्वाची छायाचित्रे, वैशिष्ट्यपूर्ण बातम्या यांचा समावेश असावा.
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई ३२
२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
५) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
