Singing Vande Mataram In All schools
Singing Vande Mataram In All schools
Singing and performing of the entire Vande Mataram in all schools
Regarding singing the entire Vande Mataram in all schools and organizing exhibitions.
क्रमांक :- संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३०८/एस.डी.४
दिनांक:- २७ ऑक्टोबर, २०२५
विषय :- दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ (कार्तिक शुद्ध नवमी) ते दि. ०७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम् चे गायन होण्याबाबत व प्रदर्शनी लावण्याबाबत.
संदर्भ :- श्रीम. राधा भिडे, खजिनदार, राजमाता जिजाबाई ट्रस्ट, जि. ठाणे यांचे पत्र, दिनांक १८.०२.२०२५
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन पत्राची प्रत या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.
२. स्व. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी तिथीनुसार म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील शाळांमधून रोज वंदे मातरम् या गीताची पहिली दोनच कडवी गायिली जातात, परंतु १५० वर्षपूर्तीचे औचित्य साधून दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी सर्व शाळांमधून संपूर्ण वंदे मातरम् चे गायन व्हावे व वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्यात यावी अशी विनंती संदर्भाधीन पत्रान्वये करण्यात आलेली आहे. तसेच, दैनंदिन वापरातील ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, दि. ०७ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
४. त्या अनुषंगाने, दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ ते दि. ०७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीदरम्यान, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम् चे गायन होण्याबाबत व वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत राज्यातील सर्व शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे, ही विनंती.
सहपत्र- वरीलप्रमाणे पीडीएफ मध्ये प्राप्त करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
आपला,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
प्रति,आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
