Shikshak Shikshakettar Arjitraja Rokhikaran
शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी अर्जित रजा रोखीकरण
Shikshak Shikshaketar
Arjitraja Rokhikaran
Shikshak Shikshakettar Arjitraja Rokhikaran
महाराष्ट्र के शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत पुणे
प्रति,
दिनांक : २८.०५.२०२४.
क्र.प्राशिसं/खाप्राशा/अंदाज-२०३/अ.र.रो./२०२४/३८३०
30 MAY 2024
विभागीय शिक्षण उपसंचालक,
विभाग- सर्व.
विषय : अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाबाबत.
Encashment of accrued leave of teachers/non-teaching staff in non-government primary schools
संदर्भ :-
१) संचालनालयाचे पत्र क्रमांक प्राशिसं/खाप्राशा/अंदाज-२०३/रजा रोखीकरण/ २०२१/३५०५ दिनांक २५.१०.२०२१.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बुलडाणा यांचे पत्र क्रमांक वेभनिनिपप्रा/ बुल/१५/२०२४ दिनांक १९.०१.२०२४.
३) अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक), बुलडाणा यांचे पत्र क्रमांक वेभनिनिपप्रा/बुल/१२३/२०२४ दिनांक १०.०५.२०२४.
उपरोक्त संदर्भ क्रमांक २ व ३ च्या पत्रान्वये खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी संचालनालयस्तरावरून मार्गदर्शन मिळणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बुलडाणा व अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक), जिल्हा बुलडाणा यांनी विनंती केलेली आहे.
👉 अर्जित रजा रोखीकरण करण्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
उपरोक्त प्रकरणी आपर्णास कळविण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नियम १६ मधील १८ (ब) नुसार फक्त माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक पूर्ण वर्षासाठी १५ दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे. खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.
नियम १९ अन्वये कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुटीचा किंवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला/कर्मचा-याला शिक्षणाधिका-यांची पूर्वपरवानगी मिळवावी लागेल.
प्राथमिक शिक्षक/मुख्याध्यापकांना दिनांक ०१.०७.१९९५ अन्वये अर्धवेतनी रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी १० दिवस मान्य केलेली आहे. तथापी, सदरील आदेशामध्ये अर्धवेतनी रजेच्या ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमूद आहे.
महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मध्ये तरतूद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
⏬⏬⏬⏬⏬
सदरचे परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त ओळीला स्पर्श करा
☝☝☝☝☝
प्रत : माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व. २) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), जिल्हे सर्व.