Shikshak Kshamtavrudhi Prashikshan
Shikshak Kshamtavrudhi Prashikshan
Teacher Capacity Building 2.0 Guidelines for District Level and Taluka Level Training Programmes.
जा.क्र. जिशिप्रसंवे / प्रशिक्षण/२०२४-२५ / १३९
दि.१८/०२/२०२५.
विषय – शिक्षक क्षमता वृध्दी २.० प्रशिक्षण कालावधीतील सार्वजनिक सुटटी बाबत.
उपरोक्त विषयान्वये, बुधवार दि. १९/०२/२०२५ रोजी शिवजयंतीची सुटटी असलेले या दिवसाचे प्रशिक्षण शनिवार दि.२२/०२/२०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. व पुढील टप्पा क्रं. ३ मध्ये बुधवार दि.२६/०२/२०२५ रोजी महाशिवरात्राची सुटटी असलेने सदर दिवसाचे प्रशिक्षण शनिवारी दि. ०१/०३/२०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत आयोजित करण्यात यावे. शनिवारी होणा-या प्रशिक्षणाच्या भोजनाच्या वेळेचे नियोजन आपल्या स्तरावरुन करण्यात यावे.
(जितेंद्र सांळुखे) प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर
प्रत माहिती व कार्यवाहीस्तवः-
शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), जि.प. सोलापूर
Also Read 👇
जा.क्र. राशेसंप्रपम/अविवि/SE/२०२५/०६७६
दिनांक- ०६/०२/२०२५
विषयः शिक्षक क्षमतावृद्धी २.० जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना.
संदर्भः
१. या कार्यालयाचे पत्र क्रमांक- राशैसंप्रपम/अविवि/SE/२०२५/०१२२ दिनांक.१०/०१/२०२५
२. या कार्यालयाचे पत्र क्रमांक- राशैसंप्रपम/अविवि/SE/२०२५/०२२६ दिनांक. १६/०१/२०२५
उपरोक्त विषयान्वये, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० चे आयोजन करावयाचे आहे. त्याचे नियोजन संदर्भिय पत्राद्वारे आपणास कळविलेले आहे. त्यानुसार जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणाचे नियोजन व आयोजन परिणामकारक होण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या सहकार्याने अंमलबजावणी करुन घेण्याची जबाबदारी डाएट प्राचार्य यांची राहील. याबाबत पुढील सूचनांचे अनुषंगाने कार्यवाही करावी.
शिक्षक क्षमतावृद्धी २.० प्रशिक्षणासाठी सर्वसाधारण सूचना-
१. हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते ५ वी तसेच इ.६ वी ते ८ वी आणि इ.९ वी ते १२ वी इयत्तांना शिकविणाऱ्या सर्व माध्यमांच्या शिक्षकासाठी लागू असेल.
२. जिल्हा व तालुकास्तरासाठी अपेक्षित प्रशिक्षणार्थी संख्या निश्चित करुन देण्यात आलेली आहे त्या मर्यादेत प्रशिक्षण प्रत्येक घटकास दिले जाईल असे नियोजन करावे.
३. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५ दिवस असून एका वर्गामध्ये ५०-६० प्रशिक्षणार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी.
४. यापूर्वी बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार दोन प्रशिक्षण वर्गासाठी ०४ तज्ज्ञ मार्गदर्शक व पुढील प्रत्येक वर्गासाठी अतिरिक्त ०२ तज्ज्ञ मार्गदर्शक घ्यावेत परंतु, प्रत्यक्षात प्रत्येक वर्गाचे आर्थिक हिशेब सादर करताना प्रतिवर्ग ०२ तज्ज्ञ मार्गदर्शक असे करुन सादर करावे.
५. प्रशिक्षणासाठी दिलेल्या विषयांनुसार एक तासिका ९० मिनिटांची याप्रमाणे ०५ दिवस दररोज ०४ तासिका होतील.
६. प्रशिक्षणादरम्यान घ्यावयाच्या प्रत्येक तासिकेचे नियोजन व आशय ppt यास्तरावरुन पुरविण्यात आलेले आहेत. त्यानुसार चर्चा, सादरीकरण, गटकार्य, प्रात्यक्षिक पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी.
७. प्रशिक्षणार्थी यांचेसाठी पूर्वचाचणी, उत्तरचाचणी आणि अभिप्राय फॉर्म ऑनलाईन स्वरुपात SCERTM मार्फत पुरविण्यात येईल. त्यामध्ये सर्व प्रशिक्षार्थी वेळचेवेळी नोंदी करतील याचा आढावा घ्यावा.
८. जिल्हास्तरीय प्रशिक्षण निवासी स्वरुपाचे असेल व त्यानंतर तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल.
९. इयत्ता.१ ते ५, ६ ते १२ व पर्यवेक्षकीय यंत्रणा प्रशिक्षण नोंदी स्वतंत्र ठेवाव्यात. प्रत्येकाचे खर्चाचे लेखाशीर्ष स्वतंत्र आहे. त्यानुसार निधी मागणी व वितरण होईल.
१०. खर्च लेखाशीर्ष (१-५ साठी)-
STARS Project- SIG ३: Improved Teachers Performance and Classroom Practice
३.२: Learning Enhancement Programme.
a) Capacity Building of Primary Teachers (Grade १-५)
११. खर्च लेखाशीर्ष (६-८ साठी) –
SAMAGRA SHIKSHA-Scheme-१: Elementary Education, Component: 4 Quality Interventions,
Activity- ५.७.१: In-service training (Elementary) (VI-VIII)
१२. खर्च लेखाशीर्ष (९-१२ साठी) आणि (पर्यवेक्षकीय यंत्रणा प्रशिक्षासाठी)–
SAMAGRA SHIKSHA-Scheme-२: Secondary Education
Component: Quality Interventions,
Activity-३.२.१: In-Service Training (IX-XII)
१३. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण-
a. तालुकास्तर शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी ०२ दिवसांचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करावे.
h. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीच्या प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश करावा- NEP-२०२०, SCF-SE, SCF-FS. CBA-२ क्षमताधारित मूल्यांकन संकल्पना, HPC संकल्पना, SQAAF- १. SQAAF- २. SQAAF-३ (एकूण-८)
८. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीच्या प्रशिक्षणासाठी सर्व जिल्हास्तरीय व क्षेत्रीय अधिकारी जसे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांचा समावेश करावा.
d. पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठीचे प्रशिक्षण २-३ तालुके एकत्र करुन आयोजित करावे. एका प्रशिक्षण स्थळावर किमान
०२ वर्ग व ०४ तज्ज्ञ मार्गदर्शक असतील असे नियोजन करावे.
१४. खर्चाच्या बाबी व निकष (प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक यांचेसाठी)
प्रशिक्षण स्तर जिल्हास्तर (निवासी)
खर्च मर्यादा रु.१०००/- प्रतिव्यक्ती प्रतिदिन (प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ)
खर्चाच्या बाबी
बैठक व्यवस्था, स्टेशनरी, प्रमाणपत्र व अनुषंगिक खर्च, उपस्थित प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी निवास, प्रवास खर्च (एकदा येणे व जाणे), २ वेळ चहा, अल्पोपाहार, २ वेळ भोजन यावरील खर्च,
तालुकास्तर (अनिवासी)
रु.१५०/-प्रतिव्यक्ती प्रतिदिन (प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ)
तज्ज्ञ मार्गदर्शकांना प्रवास खर्च (एकदा येणे व जाणे) व मानधन- रु.५०० प्रतिव्यक्ती प्रतिदिन प्रमाणे.
स्टेशनरी, प्रमाणपत्र व अनुषंगिक खर्च,
उपस्थित प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी- २ वेळ चहा व दुपारचे भोजन यावरील खर्च,
तज्दा मार्गदर्शकांना प्रवास खर्च (एकदा येणे व जाणे) व मानधन- रु.४०० प्रतिव्यक्ती प्रतिदिन प्रमाणे.
पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण (अनिवासी) जिल्हा एकत्र
रु.१५०/-
प्रतिव्यक्ती प्रतिदिन (प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ)
स्टेशनरी, प्रमाणपत्र व अनुषंगिक खर्च,
उपस्थित प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी- २ वेळ चहा व दुपारचे भोजन यावरील खर्च,
फक्त तज्ज्ञ मार्गदर्शकांना प्रवास खर्च (एकदा येणे व जाणे) व मानधन- रु.४०० प्रतिव्यक्ती प्रतिदिन प्रमाणे,

- आर्थिक तरतूदीनुसार निधी प्राप्त झाल्यानंतर PFMS च्या माध्यमातून अदा करण्यात येईल.
ii. नेमून दिलेल्या मर्यादेत खर्चाचे नियोजन करावे. सर्व खर्च व देयके, अभिलेखे वित्तीय नियमानुसार ठेवली जातील याची दक्षता घ्यावी.
१५. आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील इ.१ली ते १२वी इयत्तांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचे जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण क्षमतावृद्धी २.० प्रशिक्षण तसेच सर्व पर्यवेक्षकीय अधिका-यांचे प्रशिक्षण निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल याची दक्षता गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी घ्यावी. प्राचार्य डाएट व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी संनियंत्रण करावे.
परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत, माहितीस्तव सादर
मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.