शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली Shikshak Badli Durgam Bhagatun Sugam Bhagat GR

Shikshak Badli Durgam Bhagatun Sugam Bhagat GR

image 2
Shikshak Badli Durgam Bhagatun Sugam Bhagat GR

Shikshak Badli Durgam Bhagatun Sugam Bhagat GR

Transfer of Teachers from remote areas to accessible areas

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग,

मुंबई

क्रमांक : न्यायाप्र-२०२४/प्र.क्र. १०५/आस्था-१४

प्रति,

मे. विन्सीस आय टी सर्विसेस प्रा. लि., पुणे.

दिनांक:- ३१ मे, २०२४.

विषय : रिट याचिका क्र. ५२५८/२०२३ व अन्य याचिंकामध्ये मा. उच्च न्यायालय, नागपूर यांनी दि. ४.१२.२०२३ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये याचिकाकर्त्या शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली मिळणेबाबत

संदर्भ : १) शासनाचे समक्रमांकीत दि. १५.५.२०२४ रोजीचे पत्र.

Online Transfer of z P Teachers from remote areas to accessible areas

महोदय,

२) आपली दिनांक २१.५.२०२४ व दि. २९.५.२०२४ रोजीची पत्रे.

उपरोक्त संदर्भ क्र. २ वरील आपल्या पत्रान्वये उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, यातील मुद्दा क्र. १ (server availability) व २ (Renewal of SMS and email work order) बाबत (शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि त्याच्यासाठी येणारा एकूण १ वर्षासाठीचा खर्च) यानुषंगाने विभागाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून याबाबत आपणास कळविण्यात येईल. दरम्यान, शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी सर्वर अनुषंगिक बाबींची पूर्तता करून तात्काळ पोर्टल सुरू करण्याची कार्यवाही करावी तसेच जिल्हा परिषद अमरावती करिता तात्काळ पोर्टल उपलब्ध करून द्यावे. सदर बाब तातडीची समजण्यात यावी. तसेच मुद्दा क्र. ३ व ४ बाबत जिल्हा परिषद, अमरावती यांचेकडून तातडीने माहिती उपलब्ध करून घ्यावी. जिल्हा परिषद, अमरावती यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तसेच मुद्दा क्र. ५ बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेसाठी पोर्टल सुरू करण्याच्या सूचना आपणास संदर्भीय क्र. १ वरील पत्रान्वयेच देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.

IMG 20240605 222859
Shikshak Badli Durgam Bhagatun Sugam Bhagat GR

आपला

(नितीन स. पवार)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रतः- १. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांना कळविण्यात येते की, मे. विन्सीस आय टी. कंपनीचे दि. २१.५.२०२४ रोजीचे पत्र सोबत जोडले असून यातील मुद्दा क्र. ३ व ४- शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी आवश्यक माहिती तात्काळ संबंधित कंपनीस उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच सदर कंपनीशी संपर्क करून जिल्हांतर्गत बदल्यांबाबतीच प्रक्रीया तात्काळ

राबविण्यात यावी.

२. निवड नस्ती- आस्था-७

Leave a Comment

error: Content is protected !!