Shala Swachchata Jababdari
jilha parishad shala parisar swachchata v swachchata gruhambabat
Regarding cleanliness of Zilla Parishad school premises and toilets
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, मुंबई
क्रमांकः बैठक-२०२५/प्र.क्र.३१/१०५९४३१/आस्था-१५
दिनांक : ०४ मार्च, २०२६.
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद (सर्व)
विषय : जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छता व स्वच्छता गृहांबाबत.
महोदया / महोदय,
शालेय शिक्षण विभांगातर्गत शाळांच्या सुविधाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (VC) बैठक शुक्रवार, दि.२१ मार्च, २०२५ रोजी मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या आवाराची व स्वच्छता गृहांची स्वच्छता करण्यासाठी विशिष्ट कर्मचारी नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत याबाबत जबाबदारी स्विकारल्यास स्वच्छता ठेवणे शक्य होईल, असे मत मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनी मांडले होते.
२. त्याअनुषंगाने मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांनी ५००० व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील जिल्हा परिषदेच्या शाळामधील स्वच्छतागृहाची स्वच्छता ग्रामपंचयात कर्मचारी यांनी करावी असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करण्यात यावी.
आपला,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.
प्रत माहितीसाठी :
१. मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांचे खाजगी सचिव.
२. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहायक.
३. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
