Shala Madhye Mahavachan Utsav Upkram Circular
Shala Madhye Mahavachan Utsav Upkram Circular
निपुण भारतअमृत महोत्सवमहाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
अतितात्काळ/महत्वाचे/प्राधान्याने/कालमर्यादित.
जा.क्र.मप्राशिप/सशि/वाच/काअ/२०२३-२४/323६
दिनांक : – 4 DEC 2023
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
२) प्रशासन अधिकारी/ शिक्षणाधिकारी महानगरपालिका, सर्व.
३) समग्र शिक्षा विभाग, विभागिय शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई विभाग, मुंबई
विषय : राज्यातील सर्व शाळांमध्ये “महावाचन उत्सव” हा उपक्रम राबविणेबाबत.
संदर्भ : शासन निर्णय क्र. संकिर्ण -२०२३/प्र.क्र.३६०/एसडी-४ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई दि.२२/११/२०२३.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, राज्यातील सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ हा उपक्रम राबविणेबाबत शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने “महावाचन उत्सव” वाचन चळवळीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.व्यक्तीमत्व विकास, त्यातून सामाजिक उन्नती व त्यातून राष्ट्राचा उत्कर्ष ह्या प्रक्रियेचा पाया “समृध्द वाचन” हा आहे. वाचन हे एक महत्वाचे मूलभूत कौशल्य आहे. वाचन संज्ञानात्मक विकासाला चालना देते, तसेच भावी यशाचा मार्ग दाखवते. बोली भाषा मुले नैसर्गिकरित्या शिकतात, पण वाचन जाणीवपूर्वक शिकले पाहिजे. आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, युनिसेफ व रिड इंडिया यांच्या संयुक्त भागीदारीत “महावाचन उत्सव” हा उपक्रग महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे.
वाचन चळवळीची उद्दिष्टे :- १. वाचनाचे महत्व सांगणे आणि इयत्ता ३री पर्यंत प्रत्येक मूलाला कुशलतेने वाचायला शिकविणे. २. मुलांना वाचनाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकसहभागातून कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन एक व्यापक लोक वाचन चळवळ उभी करणे. ३. वाचनाची आवड मुलांमध्ये रुजविण्यासोबतच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देणे व त्याद्वारे मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग तयार करण्यास मदत करणे. ४. वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडवणे. ५. कथा, कविता, कादंबरी, नाटके ज्यातून रसग्रहण दृष्टी प्राप्त होते. यातून मुलांमध्ये रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे. ६. मुलांमध्ये नैतिक मुल्यांची रुजवण करणे. |
राज्यस्तरीय वाचन चळवळीचा शुभारंभ :-
मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री (गृह), मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) व मा. मंत्री (शालेय शिक्षण) महाराष्ट्र शासन यांचे हस्ते महाराष्ट्रातील वाचन चळवळीचा अधिकृत शुभारंभ दिनांक ०५/१२/२०२३ रोजी दरबार हॉल, राजभवन मुंबई येथे होणार आहे.
जिल्हास्तरीय वाचन चळवळीचा शुभारंभ :- राज्यस्तरीय वाचन चळवळीच्या शुभारंभानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने सुयोग्य दिनांक ठरवून संबंधित जिल्हयाचे मा. पालकमंत्री यांचे हस्ते जिल्हयात वाचन चळवळीच्या शुभारंभ करतील. या शुभारंभामध्ये प्रत्येक शाळा नजिकच्या शासकीय ग्रंथालयास जोडण्याच्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल. या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आवश्यककार्यवाही जिल्हा स्तरावर करुन शासकीय ग्रंथालयाची पुस्तके शाळांना उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. |
शाळास्तरावर महावाचन उत्सवाचा शुभारंभ राज्यस्तरीय शुभारंभानंतर शाळास्तरावर या योजनेचा शुभारंभ लवकरात लवकर करुन संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी. |
महावाचन उत्सवाची रुपरेषा :- या कार्यक्रमाद्वारे वाचन चळवळीला “महावाचन उत्सव” असे संबोधण्यात यावे, यामध्ये प्रत्येक आठवड्यात एक विषय / थीम निश्चित करुन त्यावर आधारित पुस्तकांचे शाळांमध्ये वाचन करणे, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात यावे. मुलांना यासंदर्भात १ ते २ मिनिटाचे व्हिडीओ /Audio करुन किंवा लघुनिबंध लिहून ते एका विशिष्ठ साईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहीत करण्यात यावे, वेबसाईटबाबतची सविस्तर माहिती लवकरच कळविण्यात येईल. महावाचन उत्सवासाठी सहा आठवड्यांच्या वाचन, व्हिडीओ, ऑडिओ वा लघुनिबंधासाठी काही मार्गदर्शक विषय / थीम बाबत सविस्तर माहिती विभागाच्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. मुलांनी व्हिडिओ तयार केल्यावर तो त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अवलोकन व मान्यतेनंतर तालुकास्तरीय फेरीसाठी साईटवर अपलोड होईल. विद्यार्थ्यांच्या लघुनिबंध, ऑडिओ, व्हिडीओमधील आशय व सादरीकरण याला प्रत्येकी ५ गुण असे एकूण १० पैकी गुण असतील. त्यापैकी ७ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र ठरतील. त्यांना तालुकास्तरीय बक्षीसेही दिली जावीत. त्याबाबतची स्पर्धा व पारितोषिके (पुस्तक स्वरुपात) प्रदान करण्यात यावीत. याबाबतचा निधी राज्य स्तरावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात येत आहे. पुस्तकांची यादी, विषय/थीम आणि त्याच्याशी निगडीत पुस्तकांची यादी विभागाद्वारे प्रसिध्द पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाप्रदर्शनास शाळांनी भेट देणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सूचना निर्गमित कराव्यात. जिल्हास्तरावरील पुस्तकांचे प्रदर्शनास शाळा भेट घेतील याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) घेतील. उपरोक्तनुसार मार्गदर्शक सूचनांचे वाचन चळवळ साध्य करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास विनाविलंब पाठविण्यात यावा. |
(प्रदीपकुमार डांगे भा.प्र.से.) राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प. मुंबई. |
राज्यातील सर्व शाळांमध्ये “महावाचन उत्सव” हा उपक्रम राबविणेबाबत. दि १६ जानेवारी २०२४ चे महत्वपूर्ण परिपत्रक वाचाल वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा |
१) मा. मंत्रीमहोदय, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई.
२) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई.
प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव,
१) मा.आयुक्त, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे.
२) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे.
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व.
४) आयुक्त महानगरपालिका सर्व.
५) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य पुणे.
६) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे.
७) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
सुख समृध्छीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा.
सुख समृद्धीचा जरा, शिक्षण हाच मार्ग खरा.