Sanvidhanachi Vatchal Question Paper
Sanvidhanachi Vatchal Question Paper
Maharashtra State Board SSC (Marathi Medium) Class Tenth 10th Standard Board Exam
| इयत्ता – १० वी विषय : इतिहास व राज्यशास्त्र |
| प्रकरण ०१ ले संविधानाची वाटचाल प्रश्न पत्रिका |
विद्यार्थ्याचे नाव वेळ : ४० मिनिटे गुण : १२
प्र.१ ला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. गुण ०२
१) लोकशाहीचा गाभा म्हणजे…………होय.
अ) प्रौढ मताधिकार ब) सत्तेचे विकेंद्रीकरण क) राखीव जागांचे धोरण ड) न्यायालयीन निर्णय
२) भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ………….. ……….. पासून सुरूवात झाली.
अ) २६ जानेवारी १९५० ब) २६ नोव्हेंबर १९४९ क) २६ नोव्हेंबर १९५० ड) १५ ऑगस्ट १९४७
प्र.२ रा पुढील विधाने चुक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (कोणतेही दोन) गुण ०४
२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
२) सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात.
३) संविधानाचे स्वरूप एखाद्या जीवंत दस्ताऐवजाप्रमाणे असते.
प्र.३ रा अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा. (कोणतेही दोन) गुण ०२
1) राखीव जागांविषयक धोरण
२) हक्काधारित दृष्टिकोन
ब) दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. (कोणतेही एक) गुण ०२
०१) महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायद
०२) संविधानाच्या मुलभूत चौकटीतील समाविष्ट तरतुदी
प्रश्न ३ रा ब) पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. (कोणतेही एक)
१. संसदेने महिलांसंबंधी केलेल्या कायद्यांचे महिलांना कोणते फायदे झाले ? ०२ गुण
२. मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?