Relaxation of Restrictions on Use of Mobile Phones in Primary Upper Primary Middle Higher Secondary School Premises

Relaxation of Restrictions on Use of Mobile Phones in Primary Upper Primary Middle Higher Secondary School Premises

image 2
Relaxation of Restrictions on Use of Mobile Phones in Primary Upper Primary Middle Higher Secondary School Premises

प्राथमिक / उच्च प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळेच्या आवारात मोबाईलफोन (भ्रमणध्वनी) वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत

Relaxation of Restrictions on Use of Mobile Phones in Primary Upper Primary Middle Higher Secondary School Premises

In Zilla Parishads / Municipalities / Nagar Parishads / Municipal Corporations, Aided / Unaided Primary Schools / Upper Primary Schools / Middle and Higher Secondary Schools of the State, Headmasters / Teachers are allowed to use mobile phones Bhramandhwani subject to conditions

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः भ्रवानि-२०१५/प्र.क्र. ११८/टिएनटी-१ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय विस्तार भवन, मुंबई

वाचा –

दिनांक :- २८ मे, २०१५

१) शासन निर्णय क्रमांक, शालेय शिक्षण विभाग क्र. संकीर्ण १००४/ (१५४/०४)/ माशि-२, दि.८.९.२००४

२) शासन निर्णय क्रमांक शालेय शिक्षण विभाग क्र. पीआरई-२००९/ प्र.क्र. ८९/ प्राशि-१, दि.१८.२.२००९

प्रस्तावना

राज्यातील जिल्हा परिषद / नगरपालिका / नगर परिषदा / महानगरपालिका, अनुदानित / विनाअनुदानित खाजगी संस्थाच्या प्राथमिक शाळा / उच्च प्राथमिक शाळा / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शाळेच्या आवारात / वर्गामध्ये मोबाईल (भ्रमणध्वनी) फोन वापराबाबतचे निर्बंध शासन निर्णय, दिनांक १८.२.२००९ अन्वये घालण्यात आलेले आहेत. सध्या सर्वत्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. याचा भाग म्हणून मोबाईल फोनचा सुध्दा वापर हा जलदगतीने सर्रासपणे माहिती मिळण्याकरिता / जनसंपर्काकरिता अधिक प्रमाणात होत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण क्षेत्रात दिसून येतो. विषयानुरुप सखोल व विस्तृत स्वरुपाची माहिती ही माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षकांना प्राप्त झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या हिताकरिता फायदेशीर ठरणार आहे. यास्तव शाळेच्या आवारात वर्गात अध्यापनाकरिता शिक्षकांना भ्रमणध्वनीचा वापर करु देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :-

राज्यातील जिल्हा परिषद / नगरपालिका / नगर परिषदा / महानगरपालिका, खाजगी संस्थांच्या अनुदानित / विनाअनुदानित प्राथमिक शाळा / उच्च प्राथमिक शाळा / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, मुख्याध्यापक / शिक्षक यांना मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनी) वापर करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे :-
१) मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनीचा) वापर शाळेच्या आवारात / वर्गात शैक्षणिक साधन म्हणून करता येईल. शिक्षकांना शैक्षणिक साधन म्हणून मोबाईल (भ्रमणध्वनी) वापर करताना त्याबाबत मुख्याध्यापकांची पूर्व परवानगी घेण्यात यावी.

२) मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनीचा) वापर शाळेच्या आवारात / वर्गात बाहेरील व्यक्तिशी संभाषणासाठी करता येणार नाही.

३) उपरोक्त २ येथील नमूद अटीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास शासन निर्णय, दि.१८.२.२००९ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

४) शिक्षकेतर कर्मचारी / विद्यार्थी यांना शाळेच्या आवारात मोबाईल (भ्रमणध्वनी) फोन वापरण्याबाबत शासन निर्णय, दि.१८.२.२००९ अन्वये घालण्यात आलेले निर्बंध कायम

राहतील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या स्पर्श करा या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१५०६२४१२३०५२८८२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा.ग. गुंजाळ )

उप सचिव,
महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!