Recruitment in Govt Offices Through MPSC SOP Declared

Recruitment in Govt Offices Through MPSC SOP Declared

IMG 20241213 135025
Recruitment in Govt Offices Through MPSC SOP Declared

Recruitment in Govt Offices Through MPSC SOP Declared

शासकीय कार्यालयातील पदभरती एमपीएससी मार्फत
Recruitment Grade B Grade C in Govt Offices through MPSC

Standard Operating Procedure (SOP) for filling up of Group-B (Non-Gazetted) and Group-C (Excluding Driver) cadre posts in all Government offices under the jurisdiction of the State Government by direct service through Maharashtra Public Service Commission is promulgated.

राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत …

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः प्रानिमं १२२४/प्र.क्र.११६/का.सेवा-४ मंत्रालय, मुंबई

दिनांक : १० डिसेंबर, २०२४.

वाचा :

  • शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक प्रानिमं १२२४/प्र.क्र.७०/सेवा-४(का.१३-अ), दिनांक १८ जुलै, २०२४.

प्रस्तावनाः –
राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे सरळसेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास संदर्भाधीन दिनांक १८/०७/२०२४ च्या शासन निर्णयाद्वारे तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार, उपरोक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील प्रमाणित कार्यपध्दती (Standard Operating Procedure) प्रसिध्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

परिपत्रक :-
राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरीता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.

१ अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग अध्यक्ष
२ अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग सदस्य
३ सह सचिव/उप सचिव (मलोआ/सामान्य प्रशासन विभाग) सदस्य
४ सह सचिव/उप सचिव (कार्यासन सेवा-४/सामान्य प्रशासन विभाग)सदस्य
५ सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य सचिव

२. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाचे पदांचे प्रस्ताव उपरोक्त समितीपुढे शिफारशीसाठी सादर करावयाचे आहेत. तद्नंतर विभागांना पदे आयोगामार्फत भरता येणार आहेत. या अनुषंगाने, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपध्दती (Standard Operating Procedure) पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.
अ.क्र.
प्रमाणित कार्यपध्दती
१ मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदांचे विहित प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग/सेवा-४ कार्यासनाकडे सादर करावेत.

२ मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेले विहित नमुन्यातील प्रस्ताव एकत्रितरित्या समन्वय समितीकडे शिफारशीसाठी सामान्य प्रशासन विभाग/सेवा-४ कार्यासनामार्फत सादर करण्यात येतील.
३ सदर समिती कोणती पदे प्रथम टप्प्यात प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावयाची याबाबत शिफारस करेल. तसेच पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करावयाची आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल.
४ समन्वय समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावयाच्यापदांची शिफारस केल्यानंतर, पदे आयोगाच्या कक्षेत आणण्याची पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग/ सेवा-४ कार्यासनामार्फत मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना देण्यात येतील.
५ समन्वय समितीने शिफारस केलेली पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, १९६५ च्या नियम ३ सोबतच्या अनुसूचीमधील क्रमांक ३३ मध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग/का. ८ (मलोआ) कडे स्वतंत्र प्रस्ताव संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने सादर करावा.
६ सदर पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग/का.१२ (सेवा-१/सेवा-२/सेवा-३) व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करुन संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने स्वतंत्ररित्या करावी.
७ पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, १९६५ च्या नियम ३ सोबतच्या अनुसूची मधील क्रमांक ३३ मध्ये दुरुस्ती व पदांचे सेवाप्रवेश सुधारित करणे ही कार्यवाही झाल्यानंतर, पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरताना आयोगाकडे मागणीपत्र पाठविणे तसेच आयोग व मंत्रालयीन प्रशासकीय विभागस्तरावरील कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : प्रानिमं १२२०/६२/प्र.क्र.३०/का.१३-अ, दिनांक ०२/११/२०२२ मध्ये नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी.
८ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) पदांसाठी यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण व अनुषंगिक सोयी-सवलती यापुढेही लागू राहतील.

३. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४१२१०१२३५११७१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Circular pdf Copy Link

(सु. मो. महाडिक) सह सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20241213 WA0008
Recruitment in Govt Offices Through MPSC SOP Declared

प्रति,
१) मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
३) सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

Leave a Comment

error: Content is protected !!