Rajya Lok Seva Hakk Aayog Nagrik Sanad
Rajya Lok Seva Hakk Aayog Nagrik Sanad
Citizens’ Charter of State Public Service Commission published
Right to Public Services Act, 2015) Citizen’s Charter
राज्य लोकसेवा हक्क आयोगाची नागरिकांची सनद प्रसिध्द करण्याबाबत..
Rajya Lok Seva Hakk Aayog Nagrik Sanad
दिनांक:- ०९ जानेवारी, २०२६
संदर्भ :-
१. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम-२००५
२. शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम, २०१३, दिनांक १४ नोव्हेंबर, २०१३
प्रस्तावना :-
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ८ (१) (२) मधील तरतुदीनुसार प्रत्येक विभाग किंवा कार्यालय यांनी नागरिकांची सनद प्रसिध्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यास अनुसरून राज्य लोकसेवा हक्क आयोगाची नागरिकांची सनद प्रसिध्द करण्याबाबतची बाब विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
प्रस्तावनेत नमूद केलेल्या अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील राज्य लोकसेवा हक्क आयोगाची नागरिकांची सनद सोबत जोडलेल्या पुस्तिकान्वये प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच सदर नागरिकांची सनद https//:aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०१०९१६१५४३६९०७असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक : GAD/१५७/२०२५-जीएडी/लो.दि.क.
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२