Professional Tax Update GR
Professional Tax Update GR
Professional Tax Amendment Circular
vyavsaykar sudharna shasan nirnay paripatrak
Maharashtra State Business, Trade, Livelihood and Employment Tax (Amendment) Act, 2023,
Maharashtra State Business, Trade, Livelihood and Employment Tax (Amendment) Act, 2023,
शिसंमापु/शिक्षक शिक्षकेत्तर/२५-२६/ टी-६-ब /दि.२५/०२/२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व
३. शिक्षण निरिक्षक मुंबई (उ, द, प)
४. लेखाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, कार्यालय सर्व
५. अधीक्षक वेतन व भनिनि पथक (माध्यमिक), सर्व
विषय- महाराष्ट्र राज्य व्यवसायव्यापार उपजीविका व नौकरी यावरील कर अधिनियम १९७५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम
संदर्भ- महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०६/०४/२०२३
विषयांकित प्रकरणी सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९ महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०६/०४/२०२३ चे अवलोकन करावे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. (महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०६/०४/२०२३ प्रत सलंग्न)
Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 25-02-2026 14:37:34
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.
प्रत माहितीस्तव -मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे-१
श्री पवन जोशी, महा-आयटी, यांना देवून कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०६/०४/२०२३ ( प्रत सलग्न) नुसार शालार्थ प्रणालीत आवश्यक बदल करण्यात यावे.

RNI No. MAHBIL/2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ९, अंक १३]
गुरुवार, एप्रिल ६, २०२३/चैत्र १६, शके १९४५
[पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक १९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम…
पृष्ठे
१-२
दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मुग्धा अ. सावंत, प्रारुपकार-नि-सह सचिव, महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.
१९ ७५ चा
ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या महा. १६. यांवरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:-
भाग चार-१९-१
(१)
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल ६, २०२३/चैत्र १६, शके १९४५
संक्षिप्त नाब व प्रारंभ.
१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा) अधिनियम, २०२३, असे म्हणावे.
(२) तो, १ एप्रिल २०२३ रोजी अंमलात येईल.
१९७५
सन १९७५ वा अधिनियम क्रमांक १६ याच्या कालम २७अ ची
२. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५ (यात महाराष्ट्र यापुढे, ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा केला आहे), याच्या कलम २७अ मधील, –
१६.
सुधारणा.
(१) खंड (क) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल:-
चा
महा.
“(क) (एक) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ याच्या कलम २ च्या खंड (द) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे लक्षणीय दिव्यांगत्व असणारी कोणतीही व्यक्ती किंवा
२०१६ चा ४९.
(दोन) लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या बालकाचे आई-वडील किंवा पालक,
जर, अशा लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीने किंवा बालकाने, उक्त अधिनियमाखालोल किंवा त्यान्वये केलेल्या नियमांखालील प्रमाणित प्राधिकरणाने दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र धारण केले असेल तर :
परंतु, अशी व्यक्ती किंवा, यथास्थिति, मालक, ती या खंडान्वये ज्या पहिल्या आकारणी वर्षासाठी सूट मिळण्याचा दावा करीत असेल त्या वर्षासंबंधात विहित प्राधिकरणाकडे उपरोक्त प्रमाणपत्र सादर करील :
परंतु आणखी असे की, व्यक्तीने किंवा, यथास्थिति, मालकाने, दिनांक १ एप्रिल २०२३ च्या लगतपूर्वी असलेल्या या कलमाच्या प्रयोजनार्थ, विहित प्राधिकरणाकडे यापूर्वीच प्रमाणपत्र सादर केले असेल तर तिला पुन्हा ते सादर करण्याची आवश्यकता असणार नाही.”;
(२) खंड (ई) वगळण्यात येईल :
(३) खंड (ग) वगळण्यात येईल.
३. मुख्य अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची एक मधील, नोंद १ ऐवजी, पुढील नोंद दाखल करण्यात
सन १९७५ चा महाराष्ट्र येईल :-अधिनियम क्रमांक १६ याच्या अनुसूची एक ची सुधारणा.
“१. वेतनदार व मजुरी मिळविणारे-
(एक) पुरुषांच्या बाबतीत, ज्यांचे मासिक वेतन किंवा मजुरी,-
(अ) सात हजार पाचशे रुपयांहून अधिक नाही।
काही नाही.
(ब) सात हजार पाचशे रुपयांहून अधिक परंतु दहा हजार रुपयांहून अधिक नाही;
दरमहा एकशे पंचाहत्तर.
(क) दहा हजार रुपयांहून अधिक
दरसाल दोन हजार पाचशे हे पुढील पद्धतीने
देण्यात येतील :-
(अ) फेब्रुवारी महिना वगळता दरमहा दोनशे : (ब) फेब्रुवारी महिन्यात तीनशे.
(दोन) स्त्रियांच्या बाबतीत, ज्यांचे मासिक वेतन किंवा मजुरी, –
(अ) पंचवीस हजार रुपयांहून अधिक नाही;
(ब) पंचवीस हजार रुपयांहून अधिक
काही नाही.
दरसाल दोन हजार पाचशे हे पुढील पद्धतीने
देण्यात येतील :-
(अ) फेब्रुवारी महिना वगळता दरमहा दोनशे;
(ब) फेब्रुवारी महिन्यात तीनशे.”.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR. RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, 21-A
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, , NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE

.