Preference To Candidates Completed CMYKPY Training In New Schemes
Preference To Candidates Completed CMYKPY Training In New Schemes
mukhymantri Yuva karya prashikshan Yojana updates gr
Preference will be given to candidates who have completed CMYKPY training in new schemes.
Preference will be given to candidates who have completed CMYKPY training in schemes implemented by the Department of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation.
Preference will be given to candidates who have completed CMYKPY training in schemes implemented by the Department of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation.
Regarding giving preferential benefits to candidates who have completed training under the Chief Minister’s Youth Work Training Scheme in the schemes implemented by the Department of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्राधान्याने लाभ देण्याबाबत
महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय, क्र. कौविउ २०२५/प्र.क्र. ३१६/प्रशा-२ मंत्रालय, मुंबई
दिनांक : २० फेब्रुवारी, २०२६.
संदर्भ :-
१) शासन निर्णय, क्र. संकिर्ण-२०२४/प्र. क्र. ९०/व्यशि-३, दि. ०९.०७.२०२४,
२) शासन निर्णय, क्र. कौविउ २०२४/प्र.क्र. ११८/प्रशा-२, दि. १०.०३.२०२५,
३) शासन पूरकपत्र, क्र. कौविउ २०२४/प्र.क्र. ११८/प्रशा-२, दि. ११.०३.२०२५,
४) मा. मंत्री यांचे पत्र क्र. १२८३/२०२५. दि. १७.१२.२०२५.
५) शासन निर्णय, क्र. कौविउ २०१७/प्र. क्र. २४३/कौशल्य-२, दि. ०४.०९.२०२५,
६) शासन पत्र, क्र. आयटीआय-२०२५/प्र. क्र. १८१/व्यशि-३, दि. १७.०९.२०२५.
प्रस्तावना:-
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता संदर्भ क्र. १ येथील दि. ०९.०७.२०२४ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दि. ०८.१२.२०२५ ते दि. १४.१२.२०२५ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाचे तृतीय (हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. सदर अधिवेशनात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांबाबत झालेल्या चर्चेदरम्यान मा. मंत्री (कौ. रो. उ. व ना.) यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्राधान्याने लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार मा. मंत्री (कौ. रो. उ. व ना.) यांच्या संदर्भ क्र. ४ येथील दि. १७.१२.२०२५ च्या पत्रान्वये प्राप्त झालेल्या निदेशानुसार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना या विभागातंर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (IT) राबविण्यात येणाऱ्या अल्प मुदतीचे अभ्यासक्रम, मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड इत्यादी योजनांमध्ये प्राधान्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगार/स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरीता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे:-
१) संदर्भ क्र. ६ नुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (ITI) राबविण्यात येणाऱ्या अल्पकालीन अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी १०% जागा मागणीनुसार राखीव ठेवण्यात याव्यात. सदर योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना अल्पकालीन अभ्यासक्रमांमधील कोणत्याही एका अभ्यासक्रमासाठी एकदाच मोफत प्रवेश देण्यात यावा.
२) संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ मधील मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड” मध्ये पात्रतेनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना एकूण लक्षांकापैकी १०% जागा राखीव ठेवण्यात येतील.
३) मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांची अद्ययावत यादी, रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, उद्योग विभागास नियमितपणे उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच, रोजगार/स्वरोजगार योजना राबविणाऱ्या महामंडळांना देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात यावी.
४) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांची माहिती (Data) महास्वयम् पोर्टल मध्ये समाविष्ट करून ‘Match Making Portal अप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात यावे, ज्याद्वारे उद्योग, उद्योजक व लाभार्थी यांच्यात थेट संपर्क व रोजगार-संधी निर्माण होतील.
५) विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांमध्ये उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करुन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची नोंदणी व इतर अनुषंगिक सहाय्य पुरविण्याकरिता विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा.
६) खाजगी कंपन्यांना आवश्यक असलेल्या तात्पुरत्या (Temporary) मनुष्यबळासाठी ITI मार्फत आवश्यकतेनुसार विशेष प्रशिक्षण (Customised Training) देऊन, अशा रोजगारामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत प्रयत्न करण्यात यावेत.
उपरोक्त मुद्द्यांबाबतची कार्यवाही आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी करावी व त्याबाबतचा अहवाल दरमहा शासनास सादर करण्यात यावा.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०२२०१३५००६३७०३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
Digitally signed by VAISHALI MANISH SULE Date: 2026.02.20 13:51:05 +05’30’
शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक
(वैशाली सुळे) उप सचिव, महाराष्ट्र शासन
