पीएम यशस्वी टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना PM YASASVI Top Class Education In Schools Scholarship Apply Link

PM YASASVI Top Class Education In Schools Scholarship Apply Link

PM YASASVI Top Class Education In Schools Scholarship Apply Link

Updated list of Schools for “Top Class Education in Schools for OBC, EBC & DNT Students” under PM YASASVI-reg

Top Class School Education Scheme

Government of India
Ministry of Social Justice & Empowerment Department of Social Justice & Empowerment

Shastri Bhawan, New Delhi Dated the 15th Sept, 2025

Subject: Updated list of Schools for “Top Class Education in Schools for OBC, EBC & DNT Students” under PM YASASVI – reg.

Respected Sir/Madam,

This is to inform you that a latest list of schools has been received from the Department of School Education and Literacy for “Top Class Education in Schools for OBC, EBC & DNT Students” under PM YASASVI.

  1. The updated list includes schools offering classes for the 10th and 12th standards, as detailed below:

a. Number of schools in Class 10th: 82,626 (list attached)

b. Number of schools in Class 12th: 31,056 (list attached)

  1. These schools have consistently achieved 100% results in the board examinations for the past three academic years: 2022-23, 2023-24, and 2024-25. And the guideline of the Scheme is attached below.
  2. Furthermore, it is requested that States/UTs may follow up with their respective State/UT Education Departments for necessary action and effective implementation of the scheme at the state level so that eligible students are not left out.

Encl. as above.

(Rajesh Kumar Makkar)

Director

e-mail: rajesh.makkar@nic.in

Copy to:

Sh Umesh Kumar Agarwal, HoD, NSP, NIC, with a request to upload the attached list of schools on the NSP portal.

To
The Additional Chief Secretary/Principal Secretory/ Secretary Backward Class Welfare Department/ Social Welfare Department (All States/UTs)

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने ‘पीएम यशस्वी टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना’ लागू केली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभमिळावा, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. विद्यार्थ्यांनी या मुदतीत अर्ज करून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा,

भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयाच्या डीबीटी मिशन, नवी दिल्लीच्या वतीने ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (एनएसपी) वरील केंद्र पुरस्कृत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ‘पीएम यशस्वी टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येत आहे.

भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयाच्या डीबीटी मिशन, नवी दिल्लीच्या वतीने ३० सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला आयएनओ स्तर (एल १) अर्ज तपासणी होईल, तर १५ नोव्हेंबरला डीएनओ/एसएनओ स्तर (एल २) तपासणी होणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिक वेळ मिळावा या उद्देशाने ही मुदतवाढ करण्यात आली आहे.

कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि पालकांनी वरील वेळापत्रकानुसार अर्ज व आवश्यक तपासणी प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग केले आहे.

विद्यार्थी, पालकांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती घेता येणार आहे.

टॉप क्लास स्कूल एज्युकेशन योजना (OBC, EBC व DNT विद्यार्थ्यांसाठी, इयत्ता 9 वी ते 12 वी)

  1. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर जा

वेबसाईट:

🌐👇

https://scholarships.gov.in

“New Registration” वर क्लिक करा.

दिलेल्या सूचना नीट वाचा आणि “Continue” करा,

विद्यार्थ्यांची मूलभूत माहिती (नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी इ.) भरा.

नोंदणी झाल्यावर तुम्हाला Application ID (User ID) आणि पासवर्ड मिळेल.

  1. लॉगिन करा (Login)

Application ID व पासवर्ड वापरून “Fresh Login (AY 2025-26)” वर लॉगिन करा.

पहिल्या वेळेस लॉगिन केल्यावर पासवर्ड बदलावा लागेल.

  1. अर्ज फॉर्म भरणे (Filling Application Form)

लॉगिननंतर PM-YASASVI-Top Class School Education for OBC/EBC/DNT

Students योजना निवडा.

अर्जामध्ये खालील माहिती भरावी:

वैयक्तिक माहिती (Personal Details)

शैक्षणिक माहिती (Educational Details)

बँक खात्याची माहिती (Bank Account Details विद्यार्थी/पालक यांच्या नावावर)

ओबीसी जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, गुणपत्रिका इत्यादी

तपशील

  1. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (Upload Documents)

सर्व कागदपत्रे PDF/JPEG स्वरूपात अपलोड करावीत :

जात प्रमाणपत्र (Caste Certificate OBC/EBC/DNT)

उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत)

इयत्तेचे गुणपत्रक (Marksheet)

शाळेचा प्रवेश/अभ्यास प्रमाणपत्र

आधार कार्ड

बँक पासबुकची प्रत

पासपोर्ट साईज फोटो

  1. अर्ज सादर करा (Final Submission)

सर्व माहिती तपासून “Final Submit” करा.

सबमिट केल्यावर अर्जामध्ये बदल करता येत नाही, त्यामुळे नीट तपासूनच अंतिम सबमिशन करावे

अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

  1. शाळेची पडताळणी (Institute Verification)

विद्यार्थ्याने अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शाळेचा Institute Nodal Officer (INO) तो अर्ज ऑनलाईन पडताळतो.

त्यामुळे विद्यार्थ्याने शाळेत माहिती द्यावी की त्याने NSP वर अर्ज केलेला आहे.

महत्त्वाच्या तारखा (AY 2025-26)

अर्ज करण्याची शेवटची तारीख (विद्यार्थ्यांसाठी): 30 सप्टेंबर 2025

शाळेकडून पडताळणी करण्याची अंतिम तारीखः ऑक्टोबर अखेरपर्यंत (NSP वर दर्शवली जाईल)

अर्ज करताना मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी सक्रिय असावा,

नाव व तपशील आधार व बँक खात्याशी जुळणे आवश्यक आहे.

चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

अर्ज केल्यानंतर नियमित NSP पोर्टल तपासत राहावे.

IMG 20250927 092713 1
PM YASASVI Top Class Education In Schools Scholarship Apply Link

Leave a Comment

error: Content is protected !!