PM eVidya Educational Channels To Inform And Disseminate

PM eVidya Educational Channels To Inform And Disseminate

PM eVidya Educational Channels To Inform And Disseminate

Regarding information and dissemination regarding PM eVidya educational channels SCERT MAHARASHTRA GUIDELINES

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रति,
विभागीय उपसंचालक (सर्व)
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) (सर्व)
शिक्षण निरीक्षक (दक्षिण, उत्तर, पश्चिम), मुंबई
प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (सर्व)

विषय : PM eVidya शैक्षणिक वाहिन्यांबाबत माहिती व प्रसार करण्याबाबत…..

भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत महाराष्ट्र राज्यास एकूण ५ पीएम ई-विद्या (PM eVidya) वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर वाहिन्यांचे पुनर्वाटप व वर्गनिहाय प्रक्षेपणाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे,

अ.क्र.

चॅनल क्रमांक

यूट्यूब वाहिनी

इयत्ता

१. PMeVidya ११३

SCERTM C११३

इयत्ता १ ली व ६ वी

२. PMeVidya ११४

SCERTM C११४

इयत्ता २ री व ७ वी

३. PMeVidya ११५

SCERTM C११५

इयत्ता ३ री व ८ वी

४. PMeVidya ११६

SCERTM C११६

इयत्ता ४ थी व ९ वी

५. PMeVidya ११७

SCERTM C११७

इयत्ता ५ वी व १० वी

या वाहिन्या DD Free Dish तसेच, उपरोक्त नमूद YouTub वाहिन्यांवर Live उपलब्ध आहेत.

१) प्रक्षेपणाची माहिती :

प्रत्येक वाहिनीवर दिलेल्या दोन इयत्तांसाठी मिळून दररोज ६ तासांचे शैक्षणिक प्रक्षेपण केले जाते. हे प्रक्षेपण २४ तासांच्या कालावधीत ३ वेळा पुनर्प्रक्षेपित केले जाते. त्यामुळे सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रात चालणाऱ्या शाळांना याचा लाभ होईल.

तसेच विद्यार्थी घरी असताना (पालकांसहसुद्धा) सकाळी किंवा संध्याकाळी हे कार्यक्रम पाहू शकतात.

या प्रक्षेपणात सर्व मुख्य विषयांचा समावेश असून आवश्यकतेनुसार, दैनंदिन अध्ययन-अध्यापनातसुद्धा उपयोग करता येऊ शकतो.

२) प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीबाबत :

हे शैक्षणिक व्हिडिओ परिषदेच्या आयटी विभागामार्फत, राज्यातील ३१ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर अशा एकूण ३२ कार्यालयांच्या समन्वयाने तसेच त्या-त्या जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने स्टार्स उपक्रमांतर्गत २०२४-२५ मध्ये तयार करण्यात आले आहेत.

३) सूचना व कार्यवाही :

या वाहिन्या आपल्या कार्यक्षेत्रातील/अधिनस्त सर्व शिक्षक व अधिकारी यांना सब्स्क्राइब करायला सूचित करावे. तसेच याबाबत आवश्यक तो आढावा घेवून यूट्यूब वाहिन्या सब्स्क्राइब केल्याबद्दल खात्री करावी.

अधिकाधिक पालकांना देखील या वाहिन्या सब्स्क्राइब करण्याबाबत जागृती व काळजीपूर्वक कार्यवाही करावी.

या वाहिन्यांचे प्रक्षेपण वेळापत्रक पालकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी अधिकारी, शिक्षक व

शाळांनी आवश्यक ती पावले उचलावीत.

या प्रक्षेपणाचे मासिक वेळापत्रक आणि वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक परिषदेच्या संकेतस्थळावर

www.maa.ac.in

पीएम-ई-विद्या वाहिन्या या टॅब अंतर्गत उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीएम-ई-विद्या वाहिन्यांचा उपयोग करण्यासाठी
http://www.maa.ac.in/index.php?tcf=pmey

या लिंकचा देखील वापर करता येईल.

या वाहिन्यांच्या, YouTube प्रक्षेपणाच्या लिंक्स परिषदेच्या संकेतस्थळावर

www.maa.ac.in

उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

ही बाब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने

योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

परिपत्रक पीडीएफ लिंक

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

PM eVidya Educational Channels To Inform And Disseminate
PM eVidya Educational Channels To Inform And Disseminate

Leave a Comment

error: Content is protected !!