Payment Of House Rent Allowance Difference

Payment Of House Rent Allowance Difference

Payment Of House Rent Allowance Difference

Regarding Payment Of House Rent Allowance Difference

Regarding payment of house rent allowance difference

Government of Maharashtra
Directorate of Education, (Secondary & Higher Secondary) Maharashtra State Central Building,

Dr. Annie Besant Road, Pune.

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंटव पुणे ४११००१

जा.क्र. शिसंमा/शिशि/टी-७/२२-२३/पुणे /9393

दिनांकः ०३/०३/२०२३

प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

e 0 9 MAR 2023

विषयः घरभाडेभत्ता फरक अदा करणेबाबत.

संदर्भः-श्री. अनिल बोरनारे, संयोजक मुंबई व कोकण विभाग, शिक्षक आघाडी, भाजप यांचे पत्र क्र.२३.०२.२०२३.

उपरोक्त विषयी व संदर्भान्वये कळविण्यात येते की, जुलै २०२१ पासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे घरभाडे भत्यात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ २४% वरुन २७ % पर्यंत करण्यात आली आहे. माहे ऑक्टोबर २०२१ पासून प्रत्यक्ष २७ टक्के प्रमाणे वाढ देण्यात आली आहे. मात्र जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली मात्र राज्यातील शिक्षकांना शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध न केल्याने ही थकबाकी देण्यात आली नाही हा शिक्षकांवर अन्याय आहे. कृपया याबाबत तातडीने निर्णय घेवून थकबाकी अदा करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर या अन्यायाविरुदध अंदोलन करण्यात येईल असे श्री. अनिल बोरनारे, संयोजक मुंबई व कोकण विभाग यांनी संदर्भीय निवेदनाव्दारे संचालनालयास कळविले आहे.

त्यानुसार आपल्या विभागातील किती शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा माहे जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीचा घरभाडेभत्ता फरक प्रदान करणे बाकी आहे याचा आढावा घेवून थकीत देयकांना संचालनालयाची प्रशासकीय मान्यता घ्यावी. व लागणाऱ्या थकीत रकमेची मागणी ११ माही अंदाजपत्रकात करण्यात यावी.

सदर थकीत देयकांचा कालावधी हा १ वर्षावरील असल्याने शासन निर्णय दि. १५ जुलै २०१७ अन्वये सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक आहे.

सर्व विभागांकडून माहिती प्राप्त झालेनंतर शालार्थमध्ये टीए एरिअर्स टॅब उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

(कृष्णकुमार पाटील)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत-:-श्री. अनिल बोरनारे, संयोजक मुंबई व कोकण विभाग, शिक्षक आघाडी, भाजप यांना माहितीस्तव

Leave a Comment

error: Content is protected !!