Online Registration Link Date Schedule for 12th Supplementary Exam July Aug 2024
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत.
Online Registration for
12th Supplementary Exam July-Aug 2024
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत.
Dates for online submission of applications for Higher Secondary Certificate (Class 12th) supplementary examination to be held in July-August 2024.
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education Pune
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
क.रा.मं./परीक्षा-३/१९८९ ५६०
पुणे ४११००४
दिनांक २४/०५/२०२४
प्रति,
विभागीय सचिव, सर्व विभागीय मंडळे.
विषय जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत.
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रु मार्च २०२४ परीक्षेचा निकाल दिनांक २१/०५/२०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या, ITI विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इयत्ता १२वी साठी
या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे –
शुल्क प्रकार | विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, ITI विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा | उच्च माध्यमिक शाळांनी / कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा | उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांस याद्या जमा करावयाची तारीख |
नियमित शुल्क | सोमवार दिनांक २७/०५/२०२४ ते शुकवार, दिनांक ०७/०६/२०२४ | शुकवार, दि.३१/०५/२०२४ ते शनिवार, दि.१५/०६/२०२४ | मंगळवार, दि.१८/०६/२०२४ |
विलंब शुल्क | शनिवार, दिनांक ०८/०६/२०२४ ते बुधवार, दिनांक १२/०६/२०२४ | ||
Also Read – विषयः उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत… |
होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इयत्ता १२वी साठी Registration Link 👈
या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे –
सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावीत.
सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे-
१ ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फेब्रु मार्च २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.
२ श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रु-मार्च २०२४ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रु-मार्च २०२५ अशा लगतच्या दोनन संधी उपलब्ध राहतील, यानी नोंद घ्यावी.
३ पुणे, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क बैंक ऑफ इंडियाच्या (Bank of India) Virtual Account द्वारे मंडळाच्या खात्यामध्ये जमा करुन मलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
- मुंबई, नागपूर व लातूर विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क एच डी.एफ.सी. (H.D.F.C.) बँकेत Virtual Account द्वारे मंडळाच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात
५ अमरावती, नाशिक व कोकण विभागीय मंडळातील उन्य माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क अॅक्सिस (Axis Bank) बँकेत Virtual Account द्वारे मंडळाच्या खात्यामध्ये जमा करुन चलनानी प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
६ परीक्षा शुल्क NEFT/RTGS द्वारे भरणा केल्यानंतर सदर शुल्क पुनःश्च शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या खात्यावर जमा झालेले नाही व ते मंडळाच्या खात्यावर जमा/वर्ग झालेले आहे याची खात्री करावी.
७ आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
(अनुराधा ओक)
सचिव, राज्य मंडळ, पुणे-४
क. मुविमं उमाप वाशी नवी मुंबई-४०० ७०३,
दिनांक २४/०५/२०२४
प्रति,
मुख्याध्यापक / प्राचार्य,
👉Online Registration Link Date Schedule for 10th Supplementary Exam July 2024👈
Nira Soloff
Lusio Seyffart