Online Attendance of Students on Smart Attendance Bot under Vidya Samiksha Kendra Swift Chat Application Link SCERT Guidelines
rajyatil sarv vyavasthapanachya sarv madhyamatil 100% vidyarthyanchi online upasthiti vidya samiksha kendrachya SwiftChat ya Application madhil “smart upasthiti” ya Bot chya madhyamatun nondavinebabat
Regarding recording 100% online attendance of students in all management levels in the state through the “Smart Attendance” Bot in the SwiftChat application of Vidya Samiksha Kendra
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
(डिजिटली स्वाक्षरीत दिनांक)
प्रति,
१. आयुक्त, मनपा (सर्व)
२. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक
३. आयुक्त, समाजकल्याण विभाग, पुणे
४. आयुक्त, दिव्यांग कल्याण विभाग, पुणे
५. उपसचिव, बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
७. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
विषय :- राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमातील १००% विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती विद्या समीक्षा केंद्राच्या SwiftChat या Application मधील "स्मार्ट उपस्थिती" या Bot च्या माध्यमातून नोंदविणेबाबत...
संदर्भ : १) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE ACT) २००९, Section ८ & Section १२
२) स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र D.O.No.19-11/2022-IS-6, दि.२४ मे, २०२२
३) राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) अहवाल २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२०२५.
४) मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र. मप्राशिप/सशि / संगणक / VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३ नोव्हेंबर २०२३
५) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांक: १२ मार्च, २०२४.
६) भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय यांचे पत्र D.O. No. 1-34/2022-DIGED, Dated – 04th July 2025
७) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा. क्र./ राशैसंप्रपम /आयटी/VSK/२०२४-२५/०३१९९, दि.०४/०७/२०२५
८) या कार्यालयाचा आदेश क्र. SCERT-२८.०/६०/२०२५-IT/BROADCAST MEDIA I/१४६०२९७/२०२५, दि.३०/०९/२०२५
९) Joint Director, CIET, New Delhi यांचे पत्र F.NO.-RVSK/२०२६/०६/०५, Dated ०७/०५/२०२६ १०) मा. संचालक (प्राथमिक) यांचे पत्र जा. क्र./ प्राशिसं / शाळा प्रवेशोत्सव /८०२/२०२६ दि. ११/०६/२०२६
समग्र शिक्षा, PM पोषण, स्टार्स, पी.एम. श्री अंतर्गत उपक्रमांचे संनियंत्रण तसेच राष्ट्रीय विद्या समिक्षा केंद्राद्वारा तयार करण्यात आलेल्या 6A framework अंतर्गत Attendance, Assessment, Accreditation, Administration, Adaptive Learning व Artificial intelligence याचे ट्रॅकिंग करण्यासाठी राज्याचे विद्या समीक्षा केंद्र कार्यरत आहे.
उपरोक्त संदर्भ क्र. १ ते ३ विचारात घेऊन संदर्भ क्र. ४ अन्वये, दि.०१ डिसेंबर २०२३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते १२ वीच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील “स्मार्ट उपस्थिती” या Bot द्वारे ऑनलाईन उपस्थिती सुरू करण्यात आली असून, संदर्भ क्र. ७ व ८ नुसार ऑनलाईन उपस्थिती नोंदीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी यापूर्वी आदेश देण्यात आले होते.
संदर्भ क्र. ६ अन्वये, राज्याच्या विद्या समीक्षा केंद्राचे (VSK) सर्व्हर राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राशी (RVSK) संलग्न असल्यामुळे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या १००% शाळा देखील विद्या समीक्षा केंद्राशी संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. संदर्भ क्र. ९ नुसार, भारत सरकारचे राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्र (RVSK) वरीलपैकी ६A framework अंतर्गत विद्यार्थी उपस्थिती चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) Real-Time पद्धतीने Dashboard द्वारे संनियंत्रित करणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या १००% शाळेतील इ.१ ली ते इ.१२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याचे निर्देश आहेत.
संदर्भ क्र. १० नुसार शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने नागपूर व अमरावती विभाग (विदर्भ) वगळता राज्यातील इतर सर्व विभागांतील शाळांनी विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती दि. १५ जून २०२६ पासून व नागपूर व अमरावती विभाग (विदर्भ) (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा व यवतमाळ या ११ जिल्ह्यांतील) सर्व शाळांना दि.३० जून २०२६ पासून नियमितपणे १०० % विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याबाबत आपल्या स्तरावरून त्वरित आदेश देण्यात यावेत. तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी VSK च्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा घ्यावा, क्षेत्रीय अधिकारी यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात.
विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती - मार्गदर्शक सूचना
१. इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या वर्गशिक्षकांनी नोंदवावी.
२. SwiftChat या Application चा वापर करणाऱ्या शिक्षकांनी लॉगिन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा. तसेच आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा.
३. ज्या शिक्षकांना शालार्थ आय. डी. उपलब्ध नसेल, त्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी यु-डायस+ पोर्टलमधील १० अंकी National Teacher Code व यु-डायस + पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकाचा वापर करावा. National Teacher Code टाकण्यापूर्वी NTC लिहून पुढे १० अंकी National Teacher Code टाकावा (उदा. NTCTPXXXXXX32). उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व यु-डायस पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर पोर्टलवरील माहिती अपडेट केल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील.
४. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना App मध्ये विद्यार्थी न दिसल्यास आपल्या स्तरावरून U-Dise प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रमोशनची (Grade Progression) प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. जेणेकरून विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
५. दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं.०५.०० या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी. रात्रशाळांना आपली उपस्थिती रात्री ०९.०० पर्यंत नोंदविता येईल.
६. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. समग्र शिक्षा अंतर्गत प्रोग्रॅमर याकामी त्यांना मदत करतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.
७. राज्यस्तरावरून मासिक आढावा बैठकीत याविषयीचा नियमित आढावा घेण्यात येईल.
८. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी
https://tinyurl.com/AttendanceBot
या लिंकवर सादर कराव्यात.
Digitally signed by SACHINDRA PRATAP SINGH Date: 14-06-2026 12:19:21
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण)
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

विद्यार्थी ऑनलाइन उपस्थिती मार्गदर्शक सूचना
ALSO READ 👇

Online Attendance of Students on Smart Attendance Bot under Vidya Samiksha Kendra Swift Chat Application Link SCERT Guidelines
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०
जा.क्र. रार्शसंप्रपम/आय.टी./VSK/आदेश/२०२४-२५/०३१८८
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), जि. प. सर्व
३. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व
४. शिक्षण निरीक्षण, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण)
विषय : विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत…
संदर्भ : १) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र.मप्राशिप
/सशि/संगणक / VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३ नोव्हेंबर २०२३
२) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांक: १२ मार्च, २०२४.
उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले
संदर्भ क्र. १ अन्वये, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ.
मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून आली आहे. इयत्ता १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आलेली होती. परंतु जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेणे, तसेच सर्व संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयानुसार, सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे. तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून आढावा घेण्यात यावा.
सोबत : मार्गदर्शक सूचना 👈 वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
(राहूल रेखाबार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
दिनांक: ०४/०७/२०२४
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. आयुक्त, शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
प्रत कार्यवाहीस्तव :
१. मा. आयुक्त, मनपा, सर्व
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सर्व
३. शिक्षण संचालक (प्राथ. व माध्य.), शिक्षण संचालनालय, पुणे