Netaji Subhash Chandra Bose
Netaji Subhash Chandra Bose
To organize various activities across the state to spread the revolutionary thoughts of Netaji Subhash Chandra Bose to the people and students of the state through schools and colleges to awaken patriotism.
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र.शिसं/संकीर्ण/२०२६/१-२/विद्या शाखा/05768
दि. ०९/०१/२०२६
महत्वाचे/कालमर्यादित/ई-मेल व्दारे
प्रति,
9 JAN 2026
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व जिल्हा परिषदा
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
विषय :- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतीकारी विचार राज्यातील जनतेला, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमधून प्रसारित करून देशभक्तीचे जागरण करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत.
संदर्भ : १. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.०५/एस.डी.४ दिनांक ७/०१/२०२५
२. मा. आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ/शा.प./२२७०५/२०२५/००२२८ दि.१६/०१/२०२५
३. संचालनालयाचे पत्र क्र.शिसं/संकोर्ण/२०२५/ए-२/विद्या शाखा/३३५/ दि.२२/०१/२०२५.
४. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.०५/एस.डी.४ दि. २४/१२/२०२५.
उपरोक्त संदर्भिय शासन पत्र क्रमांक ४ चे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करून राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता शासनपत्रातील सूचना संबंधितांच्या निदर्शनास आणून नियमानुसार उचित कार्यवाही करावी. असे संदर्भ क्रमांक १ च्या शासनपत्राव्दारे सूचित करण्यात आलेले होते.
संदर्भ क्रमांक ४ च्या पत्राव्दारे शासनाने सदर माहिती मागविलेली असून सदर माहिती सादर करण्यात यावी व त्याअनुषंगान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करुन राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता नियमोचित कार्यवाही करण्यात यावी.
शिक्षण उपसंचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत माहितीस्तव :-
१. मा. आयुक्त, (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर. २. श्रीमती. मृणाली काटेंगे, कक्ष अधिकारी, (एस. डो. ४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार),
मंत्रालय, मुंबई
क्रमांक :- संकीर्ण-२०२५/प्र.क्र.०५/एस.डी.४
दिनांक:- २४ डिसेंबर, २०२५
स्मरणपत्र-१
प्रति,
आयुक्त (शिक्षण),
शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
महोदया,
विषय :- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतीकारी विचार राज्यातील जनतेला, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमधून प्रसारित करून देशभक्तीचे जागरण करण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत.
संदर्भ :- शासनाचे समक्रमांकाचे पत्र, दि. ०७.०१.२०२५
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करुन राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता नियमोचित कार्यवाही करण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. तथापि, प्रस्तुत प्रकरणी करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती शासनास अद्याप प्राप्त झालेली नाही.
२. त्याअनुषंगाने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे क्रांतीकारी विचार शाळा व कॉलेजमधून प्रसारित करुन राज्यभर विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता नियमोचित कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
आपली,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
