NCMC Smart Card Mandatory For ST Bus Concession Holders
NCMC Smart Card Mandatory For ST Bus Concession Holders
ST Corporation implements ‘National Common Mobility Card’ (NCMC) system
एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ
सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची अनिवार्यता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.
ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बैंक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरु होणार आहे.
कोणाला मिळणार NCMC कार्ड?
या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे:
विद्यार्थीः शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिक व महिलाः अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.
दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.
पुरस्कारार्थी व पत्रकारः स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारा मार्फत वितरण.
कार्डची वैशिष्ट्ये प्रवासात स्मार्ट सोय
१) किंमतः नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.
२) वॉलेट मर्यादाः किमान १०० रुपयेः ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.
३) रिचार्ज सुविधाः ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
४) नोंदणीसाठी व्यापक यंत्रणाः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.
५) बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
एसटी बसने सवलतीत प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) जवळ बाळगणे बंधनकारक असेल.
नेमकं काय बदललंय?
यापूर्वी केवळ आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवून महिलांना ५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना १००% सवलत मिळत असे. पण आता सवलत मिळवण्यासाठी हे नवीन डिजिटल ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असेल.
नवीन NCMC कार्ड घेण्यासाठी १९९ रुपये शुल्क मोजावे लागेल. ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांना ते जमा केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळेल.
हे एक ‘प्रीपेड’ वॉलेटसारखे असेल. यात किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवावा लागेल आणि ५० च्या पटीत रिचार्ज करता येईल.
कोणाला कोणते कार्ड मिळणार?
१. विद्यार्थी: शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ‘सरल’ (Saral) क्रमांकाशी हे कार्ड जोडलेले असेल.
२. महिला व ज्येष्ठ नागरिक: महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील) लाभार्थ्यांचे कार्ड त्यांच्या ‘आधार’ क्रमांकाशी लिंक असेल.
३. दिव्यांग: दिव्यांगांचे कार्ड UDID CARD
महाराष्ट्र राज्य मार्ग
परिवहन महामंडळ
मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई ४००००८
दुरध्वनी क्र. ०२२-२३०२४००४
जनसंपर्क शाखा
ई-मेल – pro.msrtc@gmail.com
अधिक माहितीसाठी संकेत स्थळ
सवलतीसाठी RuPay ON-THE-GO (NCMC) स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.
NCMC कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल.
कार्डची डिलिव्हरी ३० दिवसांत नोंदणीच्या ठिकाणी मिळेल.
सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेट मधूनच दिले जाईल.
वॉलेट कॅश किंवा UPI ने टॉप-अप करता येईल.
NCMC कार्डवर आधार कार्ड नुसार नाव व फोटो असतील.
सदर कार्ड रोख समतुल्य व अहस्तांतरणीय आहे.
सवलतीधारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे.
हरवलेली किंवा खराब झालेली कार्डे सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येतील.
नवीन स्मार्ट कार्ड केवळ ₹१९९ मध्ये उपलब्ध आहे.
नोंदणी आणि वितरण : सवलतीचा प्रकार बस डेपो / नियंत्रण केंद्र अधिकृत एजंट आवश्यक कागदपत्र
महिला आधार कार्ड
ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड
अमृत ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड
दृष्टिहीन वैश्विक ओळखपत्र
दिव्यांग (शारीरिक अपंग) वैश्विक ओळखपत्र
विद्यार्थी सरल क्रमांक
इतर सर्व सवलती शासकीय प्रमाण पत्र
सवलत नसलेले प्रवासी
मोबाईल OTP
सदर कार्ड जारी करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य राहील.