MHT CET PCM PCB UPDATE
MHT CET PCM PCB UPDATE
Regarding the re-examination of MHT-CET 2025 PCM Group conducted on April 27, 2025
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
क.तंशिप्र-१२२५/प्र.क्र.०८/ जाहिर सूचना/२०२५/८९६
दिनांक-३०.०४.२०२५
जाहिर सूचना
दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम ग्रुपच्या फेर परीक्षेबाबत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक ०९ एप्रिल, २०२५ ते २७ एप्रिल, २०२५ या कालावधीत पार पाडली आहे. सदर परिक्षेदरम्यान दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेमध्ये उमेदवारांना गणित विषयाशी संबंधीत तांत्रिक अडचणी उद्भवल्याबाबत उमेदवारांनी ई-मेल, पत्र, टिकीट सिस्टम, दुरध्वनी आणि प्रत्यक्ष सीईटी कक्षास भेट देवून पालक / उमेदवारांनी आक्षेप / तक्रारी नोंदविल्या आहेत. उमेदवार / पालक यांच्या तक्रारींची दखल घेवून तसेच उमेदवरांच्या शैक्षणिक हित लक्षात घेता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे-
१. दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
२. त्याचप्रमाणे दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेली आहे, अशा परीक्षेकरीता उपस्थित सर्व उमेदवारांची फेरपरीक्षा दिनांक ०५ मे, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे, याची संबंधीत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
३. सदर परीक्षेस उपस्थित राहीलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षा देणे अनिवार्य असेल.
४. सदर फेर परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
५. उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी राज्य सीईटी कक्षाच्या संकेतस्थळ
वर नियमितपणे भेट द्यावी.
वेबसाईट:
सही/-आयुक्त राज्य सामाईक प्रवेश प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई