Medical Reimbursement Proposal

Medical Reimbursement Proposal

image 12
Medical Reimbursement Proposal

Medical Reimbursement Proposal

Vaidyakiya Pratipurti Prastav

शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजरीबाबत…..
महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्रमांक एमएजी २००५/९/प्र.क्र.१/आरोग्य ३ मंत्रालय, मुंबई
दिनांक : १९ मार्च, २००५
प्रस्तावना :-
शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१, मधील तरतुदींच्या अधिन राहून, आकस्मिकं उद्भवणा-या २७ आजारांवर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांवरील वैद्यकीय खर्चाची, वेतनगटानुसार अनुज्ञेय ठरविण्यांत आलेल्या टक्केवारीप्रमाणे परंतु प्रत्येक प्रकरणी रु.२०,०००/- च्या कमाल मर्यादेत प्रतिपुर्तीस मंजुरी देण्याचे अधिकार विभागप्रमुखांना आहेत. यां नर्यादेवरील वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीची प्रकरणे संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागामार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग व वित्त विभागाकडे विशेष बाब म्हणून मान्यतेच्यादृष्टीने सादर केली जातात. संद्यःस्थितीत औषधांच्या किमतीत व उपचार पध्दतीवरील खर्चामध्ये झालेली वाढ तसेच अशी प्रकरणे निकाली काढण्यास लागणारी कालावधी इत्यार्दीचा विचार करता प्रचलित कमाल मर्यादेत वाढ करणे व प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेय रकमेची परिगणना करण्यामध्ये सुलभता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एमएजी १०९९/प्र.क्र.४०/.३, दि.२९ जुलै, १९९९ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे :-
१) औषधोपचारावरील खर्चाची प्रतिपुर्ती :-
वेतनगटानुसार औषधोपचारावरील खर्चाच्या प्रतिपुर्तीची अनुज्ञेय रक्कम प्रस्तुत शासन निर्णयामधील तवता ‘अ’ मध्ये नमुद केली आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यांत येऊन आता वेतनश्रेणीचे वर्गीकरण न करता औषधोपचारावरील प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% रक्कम सरसकट अनुज्ञेय राहील

पुढे वाचा लिंक

Medical Reimbursement Proposal

कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांची वैद्यकीय देखभाल आणि / किंवा उपचार यांच्या संबंधात करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्चाच्या परताव्याची मागणी करण्याकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना

Disease List pdf Copy Link

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसंबंधी प्रस्ताव सादर करताना घ्यावयाची खबरदारी मार्गदर्शक सूचना.
महाराष्ट्र शासन गृह विभाग
शासन परिपत्रक क्र. एमव्हीडी-१२०५/प्र.क्र.५८८/परि-४, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२, दिनांक ३१ ऑक्टोबर, २००७.
साचा:- १) सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय क्र.एमारजी-२००५/९/प्र.क्र.१/आरोग्य-३, दि. १९ मार्च, २००७.
शासन परिपत्रकः- शासकीय कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आकस्मिक उद्भवणाऱ्या २७ आजारांवर निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने संदर्भातील दि.१९-३-२००७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण जाहीर केलेले आहे. सदर धोरणाप्रमाणे रु. ४०,०००/- पर्यंतच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजूरीचे अधिकार संबंधीत विभाग प्रमुखांना देण्यात आलेले आहेत. तर,रु. ४०,०००/- रक्कमेवरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या प्रमुखांना देण्यात आलेले आहेत. तसेच, विहीत तरतुदीत न बसणाऱ्या प्रकरणी अपवादात्मक परिस्थितीत विशेष बाब म्हणून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूतीस मान्यता द्यावयाची असल्यास निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीसुध्दा गठीत करण्यात आलेली आहे.
उक्त धोरणाच्या अनुषंगाने रु. ४०,०००/- रक्कमेवरील अथवा अपवादात्मक स्वरुपात विशेष बाब म्हणून समितीपुढे ठेवावयाचे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे प्रस्ताव शासनास सादर करताना सोबत जोडलेली तपासणीसूची संपुर्णपणे भरुन संबंधितांच्या सही व शिक्क्यानिशी शासनाल्ला पाठविण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी.

अब सचियः गृह विभाग, महाराष्ट्र शासन.

Disease List pdf Copy Link

शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एमजी २००५/९/प्र.क्र.१/आ.३, दि.१९ मार्च, २००५ चे सहपत्र.
परिशिष्ट ‘अ’
-: शासन विर्निदिष्ट २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी :-
हृदयविकाराचा झटका (Cardiac Emergency) प्रमश्तिक संहनी (Cerebral Vascular) फुफ्फुसांच्या विकाराचा झटका (Pulmonary emergency) / अॅन्जिओग्राफी चाचणी
२) अति रक्तदाब (Hypertension)
३) धनुर्वात (Titanus)
४) घटसर्प (Diphtheria)
५) अपघात (Accident) आघात संलक्षण (Shock Syndrome) हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधित (Cardiological and Vascular)
६) गर्भपात (Abortions)
७) तीव्र उदर वेदना/आंत्र अवरोध (Acute abdominal Pains/Intestinal Obstruction)
८) जोरदार रक्तस्त्राव (Severe Hemorrhage)
९) गॅस्ट्रो — एन्ट्रायटिस (Gastro Entireties)
१०) विषमज्वर (Typhoid)
११) निश्चेतनावस्था
१२) मनोविकृतीची सुरूवात (Onset of Psychiatric Disorder)
१३) डोळ्यातील दृष्टीपटल सरकणे (Retinal Detachment In The Eye)
१४) स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार
(Gynaecological And Obstetric Emergency)
१५) जननमुत्र आकस्मिक आजार (Genito-Urinary Emergency)
१६) वायू कोथ (Gas Gangrine)
१७) कान, नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळेनिर्माण झालेले आकस्मिक आजार (Foreign Body in Ear, Nose or Throat Emergency)
१८) ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अश जन्मजात असंगती (Congenital Anomalies Requiring urgent Surgical Intervention)
१९)
ब्रेन ट्युमर (Brain Tumour)
२०) भाजणे (Burns)
२१) इपिलेप्सी (Epilepsy)
२२) अॅक्यूट ग्लॅकोमा (Acute Glaucoma)
२३) स्पायपनस स्कॉड (मज्जारज्जू) संबंधात आकस्मिमक आजार
२४) उष्माघात
२५) रक्तासंबंधातील आजार
२६) प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
२७) रसायनामुळे होणारी विषबाधा
गंभीर आजार – भाग २
१)हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery)
२) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया (By Pass Surgery)
३) अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया
४) मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation)
५) रक्ताचा कर्करोग (Blood Cancer)

Disease List pdf Copy Link

वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन परिपत्रक क्र. वैखप्र-२०१३/प्र.क्र. २९१/१३/राकावि-२ जी.टी. रुग्णालय आवार, संकुल इमारत, १० मजला, बी.विंग, मंत्रालय, मुंबई
दिनांक: ११ ऑक्टोंबर, २०१३

Disease List pdf Copy Link

Leave a Comment

error: Content is protected !!