Mantralaya Entry DigiPravesh App

Mantralaya Entry DigiPravesh App

Mantralaya Entry DigiPravesh App

mantralay DigiPravesh app

मंत्रालयात क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व अभ्यांगत यांना DigiPravesh या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीव्दारे मंत्रालयात प्रवेश देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन परिपत्रक क्र. पीईएस-०११७/प्र.क्र.३२/विशा-४,मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दि. ११ ऑगस्ट, २०२५

वाचा :

१. शासन परिपत्रक क्र. पीईएस-०११७/प्र.क्र.३२/विशा-४, दि.२४.०३.२०२५

   शासन परिपत्रक

मंत्रालय सुरक्षा प्रकल्प फेज-२ प्रकल्पांतर्गत कार्यान्वित Visitor Management System प्रणाली विचारात घेवून संदर्भाधीन क्र.१ येथील शासन परिपत्रकान्वये क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना मंत्रालय प्रवेश देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याअन्वये क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व सर्वसाधारण अभ्यांगत यांना DigiPravesh या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीव्दारे मंत्रालयात प्रवेश अनुज्ञेय करण्यात आला आहे. (मंत्रालय प्रवेशासाठी वापरावयाच्या DigiPravesh ऑनलाईन अॅप हे Playstore व Appstore येथे उपलब्ध आहे.) ०२. तथापि, मॅन्युअल प्रवेश प्रणाली तसेच अलीकडच्या काळात प्रायोगिक तत्वावर (Soft Launch) सुरू करण्यात आलेल्या DigiPravesh अॅप आधारित प्रवेश प्रणाली याप्रमाणे दोन्ही प्रणाली द्वारे मंत्रालयामध्ये प्रवेश देण्यात येत होता.

०३. DigiPravesh ऑनलाईन अॅप प्रणालीआधारे नोंदणी प्रक्रिया ही मंत्रालय प्रवेशाच्या अनुषंगाने अधिक सुलभ व सुरक्षित असल्याने मंत्रालयात फक्त DigiPravesh ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीव्दारे मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाले घेतला असून दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ पासून मंत्रालय प्रवेशासाठी केवळ DigiPravesh या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीआधारे (Formal Launch) नोंदणी करुन मंत्रालय प्रवेश अनिवार्य करण्यात येत आहे. तसेच यापुर्वी कार्यान्वित असलेली मॅन्युअल प्रवेश पास देण्याची पध्दत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.

IMG 20250812 064119
Mantralaya Entry DigiPravesh App

DigiPravesh App LINK

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०८१११२२२३८७३२९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

उप सचिव, गृह विभाग

Mantralaya Entry DigiPravesh app Link

Mantralaya admission is mandatory by registering only through DigiPravesh, an online app-based system (Formal Launch).

Mantralaya Entry is mandatory by registering only through DigiPravesh, an online app-based system (Formal Launch)

Mantralaya Entry is mandatory by only through DigiPravesh online app

IMG 20250812 063553
Mantralaya Entry DigiPravesh App

Leave a Comment

error: Content is protected !!