Maharashtra State Board SSC Exam 2024 First Language Marathi Question Paper with Answers
Maharashtra State Board Examination March 2024 Kumarbharti Krutiptrika Question Paper with Ideal Answers
Maharashtra State Board Exam 2024 Marathi Question Paper with Answers
MARATHI FIRST LANGUAGE-01 (M)
(REVISED COURSE)
01/03/2024 दिनांक०१.०३.२०२४
Time: 3 Hours वेळ ३ तास
मराठी प्रथम भाषा – ०१ Total Marks: 80 एकूण गुण: ८०
मराठी कुमारभारती इयत्ता दहावी परीक्षा २०२४ संभाव्य आदर्श उत्तरपत्रिका
Maharashtra State Board SSC Examination March 2024 Question Paper with Answers
विभाग-1 : गद्य गुण ०२
अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) उत्तरे लिहा :
(1) म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार-
(ii) आपल्या तरुण मुलाला ‘माणसं’ दाखवणारा-
संभाव्य आदर्श उत्तरे
(1) म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार- मुलाची पत्र
(ii) आपल्या तरुण मुलाला ‘माणसं’ दाखवणारा- पोष्टमन
शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ, समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस! आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘चाट पाहणं’ हो गोष्ट एरवी मुखाची थोडीच असते! दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतक-याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणान्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखादया गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखादया गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो.
(2) आकृती पूर्ण करा: आकृती पूर्ण करा : गुण 2
वाट पाहण्याशी निगडित असलेल्या भावना
०१) —————
०२) —————
०३) —————
०४) —————
(2) आकृती पूर्ण करा : गुण 2
संभाव्य आदर्श उत्तरे
वाट पाहण्याशी निगडित असलेल्या भावना
०१) दू;ख
०२) काळजी
०३) भीती
०४) अस्वस्थता
(3) स्वमत :
‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
(आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) कृती पूर्ण करा :
सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये
संभाव्य आदर्श उत्तरे
सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये
उडी मारून बिचाण्यात शिरे
चट्कण झोपत नसे
झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछान्यात आली, की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन् रूपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिज्रन्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोषीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तोही एखादया लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दीर्घाच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे.
सोनाली आणि रूपाली लहान होत्या तोपर्यंत रूपालीच अंगापिंडानं मोठी होती. बयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली सात दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीबर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई, सोनाली बिचारी गरीब. रूपाली तिच्यावर गुरगुरली, की बापडी कोपन्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं.
(2) कोण ते लिहा : गुण 2
(i) सोनालीवर ताईगिरी करणारी-
(ii) झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी-
संभाव्य आदर्श उत्तरे
(i) सोनालीवर ताईगिरी करणारी- रुपाली
(ii) झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी- सोनाली
(3) स्वमत : गुण 3
सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
अपठित गदय
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृतिबंध पूर्ण करा : गुण 2
आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी
०१) —————
०२) —————
०३) —————
०४) —————
संभाव्य आदर्श उत्तरे
०१) फुलांची कोमलता
०२) गंगेची निर्मलता
०३) सागराची अनंतता
०४) पृथ्वीची क्षमता
मातेचा महिमा मी किती सांगू, किती गाऊ ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वतःच्या लेकरांसाठी तो ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले खुपले, की ती कावरी- बावरी होते. आई! हया दोन अक्षरांत सान्या श्रुतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल.
(2) कधी ते लिहा :
(i) आई कावरीबावरी होते –
(ii) आई थकणार नाही –
संभाव्य आदर्श उत्तरे
(i) आई कावरीबावरी होते – मुलाचे दुखले खुपले की
(ii) आई थकणार नाही – मुलांची सेवा चाकरी करतांना
विभाग-2 : पद्य गुण 2.
२. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) (अ) चौकटी पूर्ण करा :
(i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट –
(ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे –
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.
तू फुकलेस रणशिंग अगाध ज्ञानान्या बळावर
तू तोढत्याम गुलामांच्या पायांतल्या बेट्या
आणि केलेम उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे, तसे
तुझे शब्द जसेकी
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्याच्या मंगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळोंने हादरलं आकाश; डचमळलो पृथ्वी
आणि बघता बघता बवदार तळ्याला आग, लागतो.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुन्ना ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
बक्दार तळाचं पाणी, तेही आता थंड झालंय.
संभाव्य आदर्श उत्तरे
(i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट – माळवाट
(ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे – खाच खळगे
(2) आकृतिबंध पूर्ण करा : गुण 2
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य
०१) ————————-
०२) ————————-
०३) ————————-
०४) ————————-
संभाव्य आदर्श उत्तरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य
०१) नवा इतिहास घडविला
०२) मूक समाजाचे नेतृत्व
०३) समाज जागा केला
०४) चवदार तळ्याचा सत्याग्रह
(2) आकृतिबंध पूर्ण करा : गुण 2
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य
(3) खालील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत तिहा :
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि पडविलास नवा इतिहास
संभाव्य आदर्श उत्तरे
(4) काव्यसौदर्य : गुण 2
‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुन्ना ध्यास पेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणो, तेहो आता थंड झालंय’.
या ओळांतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
संभाव्य आदर्श उत्तरे
(आ) खालील पुट्ट्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खाए कृती सोडवा :
भरतवाक्य किंवा | आश्वासक चित्र | |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी / कवियत्री (ii) प्रस्तुत कवितेचा विषय (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ——————- ——————- ——————- | ——————- ——————- ——————- |
‘वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात’.
संभाव्य आदर्श उत्तरे
संभाव्य आदर्श उत्तरे
भरतवाक्य किंवा | आश्वासक चित्र | |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी / कवियत्री (ii) प्रस्तुत कवितेचा विषय (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | मोरोपंत सज्जनाची संगती सज्जनाची संगतीचे फायदे सांगितले | नीरजा स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानतेला दिलेले महत्व |
विभाग-3 : स्थूलवाचन
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : गुण 6
(1) ‘माणसे पेरा। माणुसको उगवेल’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
संभाव्य आदर्श उत्तरे
(2) ‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरतो व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय मंदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत तिहा.
संभाव्य आदर्श उत्तरे
(3) व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.
संभाव्य आदर्श उत्तरे
विभाग-4 : भाषाभ्यास
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
(1) समास :
योग्य जोड्या लावा :
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) त्रिभुवन (ii) पुरुषोत्तम | कर्मधारय समास द्विगू समास इतरेतर द्वंद्व समास |
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) त्रिभुवन (ii) पुरुषोत्तम | द्विगू समास कर्मधारय समास |
खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा :
(बिनचूक, जमीनदार, तीळतीळ, आंबटचिंबट)
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
जमीनदार | बिनचूक | तीळतीळ, आंबटचिंबट |
S S C अधिक वाचा मराठी लेखी परीक्षा |
माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) अर्थातच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयांचा अभ्याक्रम माहिती असणे गरजेचे आहे त्या शिवाय त्यांना वार्षिक परीक्षा स्वरूप कळणार नाही त्यासाठी आम्ही विषयनिहाय अभ्यासक्रम देत आहोत त्याचा फायदा त्यांना वार्षिक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी नक्कीच होईल. वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा |
(3) वाक्प्रचार :
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : गुण 4
(i) कंठस्नान घालणे
(ii) हुकमत गाजवणे
(iii) व्यथित होणे
(iv) आनंद गगनात मावणे.
संभाव्य आदर्श उत्तरे
(i) कंठस्नान घालणे – अर्थ – ठार मारणे वा.ऊ.- विर जवानांनी दहशतवादयांना कंठस्नान घातले.
(ii) हुकमत गाजवणे – अधिकार गाजवणे. समाजातील कमकुवत घटकांवर जमिनदार हुकमत गाजवी
(iii) व्यथित होणे – दुःखी होणे जमवलेली सर्व रक्कम चोरीला गेल्याने जाम व्यथित झाला
(iv) आनंद गगनात मावणे. – खूप आनंद होणे, झाला परिक्षेचा निकाल समजताच माझा आनंद गगनात मावत नव्हता.
(आ.) भाषिक घटकांवर आधारित कृती : अधिकार गाजवणे. समाजातील कमकुवत घटकांवर जमिनदार हुकमत गाजवी.
(1) शब्दसंपत्ती :
(1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : गुण १
(1) मार्ग = पाठ, वाट
(ii) जल = पाणी, उदक, नीर
(2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : गुण १
(i) सुपीक x नापीक
(ii) ज्ञानी x अज्ञानी
(3) खालील शब्दांचे वचन बदला : गुण १
(i) भिंती
(ii) रस्ता
संभाव्य आदर्श उत्तरे
(i) भिंती – भिंत
(ii) रस्ता – रस्ते
(4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा गुण 1
रखवालदार
संभाव्य आदर्श उत्तरे
रखवालदार – वाल , खवा , रवा, दार, दावा
(2) लेखननियमांनुसार लेखन :
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुसत करा गुण 5
(कोणतीही दोन वाक्ये सोडवा) :
(1) महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती.
(ii) पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात.
(iii) महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे-
(iv) शनीवारी दूपारी साडेबाराची वेळ होती.
संभाव्य आदर्श उत्तरे
(1) महर्षी कर्वे यांजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती.
(ii) पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात.
(iii) महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे
(iv) शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होती.
(3) खालील विरामचिन्हे ओळखा : गुण 1
(i) ,
(ii) ” “
संभाव्य आदर्श उत्तरे
(i) , स्वल्पविराम
(ii) ” ” दुहेरी अवतरण चिन्ह
(4) पारिभाषिक शब्द : गुण 1
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा :
(i) Tax
(ii) Exhibition
संभाव्य आदर्श उत्तरे
(i) Tax = कर
(ii) Exhibition = प्रदर्शन
It is good for students for practice the set of paper
Thank you so much