Maharashtra Day Special

Maharashtra Day Special महाराष्ट्र दिन विशेष…
महाराष्ट्राबद्दल तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का..?

eshala
आज ०१ मे महाराष्ट्र दिन……… मराठी भाषेचे महाराष्ट्र हुतात्म्यांच्या बलिदानातून हे राज्य निर्माण झाले. हे नव्या पिढीला ज्ञात नाही. एक जनआंदोलन त्यासाठी झाले हे आजही विस्मृतीच्या पडद्याआड गेले आहे. जे तेजस्वी नेते निर्माण झाले. वृद्ध, तरुण, स्रिया या सार्‍यांनी त्यात भाग घेतला. पत्रकारांच्या आणि शाहीरांच्या बुलंद आवाजाने त्याला साथ दिली. सर्वजण एक दिलाने लढले. सत्तेच्या खुर्च्या नरमल्या. पंडित नेहरू, मोरारजी देसाई, स.का. पाटील हरले. भांडवलशहा नामोहरण झाले. या लढ्यातील महारथींनी सर्वस्व पणाला लावून मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्रासाठी योगदान दिले.
२१ नोव्हेंबर इसवी सन १९५६ या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात खुप तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्या-मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संघटनामुळेच कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले होते. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदर कडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटन कडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. पण अढळ सत्याग्रहीमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश, मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मा झाले. या शहिदांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने विचार करून शेवटी १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ. स. १९६५ मध्ये त्याजागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे स्वप्न साकार करणार्‍या ज्या वीर सुपुत्रांनी आणि सुकन्यांनी आपल्या बलिदानाने व अपूर्व त्यागाने हा सोन्याचा दिवस दाखवला त्या सर्वांना आम्हा मराठी जनतेचा मानाचा मुजरा.
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
आज एक मे. राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. याच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात महराष्ट्राबद्दलच्या काही खास गोष्टी.
महारष्ट्र गीत – जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य
महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कुवेत, पनामा, फिजी, कतार, ओमान, आर्यलँड, भूतान या देशांपेक्षाही अधिक
लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२
महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत
मराठी बोलणार्यांची संख्या ६२,४८१,६८१
महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.
देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली
महाराष्ट्रात १७ थंड हवेची ठिकाणे आहेत.
महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे
देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य
ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते
प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ
महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर
सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राची ओळख या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा
एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते
महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे: रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग
इतर महत्त्वाचे उद्योगधंदे – धातू उत्पादने, वाईन, दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स
महत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये

महत्त्वाची नगदी पिके – शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू
माहाराष्ट्रातील सिंचनाखालील जमीन = ३३,५०० चौ.कि.मी.
भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे निर्मितीचे प्रमुख केंद्र मुंबई
भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबईत आहे
कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक
महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत रायगड, प्रतापगड, शिवनेरी, व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे
गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे लोकसंगीत प्रसिद्ध
ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी
मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम.
मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला.
संगीतनाटके नाट्यसंगीताचा महाराष्ट्राला मोठा वारसा
बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमी गाजवली
कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते
मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा
दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव
शिवजयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा हे सण देखील उत्साहात साजरे होतात
स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली
यात महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते
राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध
एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत
महाराष्ट्रात पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग
मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे
प्रमुख शहरे: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अमरावती, सातारा
लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात
४८)महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न
महाराष्ट्रातील लोणार सरोवर जगभरात प्रसिद्ध आहे. उल्का पडल्याने तयार झालेल्या या सरोवराचे वय ५२ हजार वर्षांहून अधिक आहे.
महाराष्ट्रातील शनीशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. याच कारणामुळे हे देवस्थान जगभरात प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील नवापूर रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रात येतो तर अर्धा गुजरातमध्ये येतो
औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार बांधण्यात आले होते त्यापैकी आज १३ प्रवेशद्वारे सुस्थितीमध्ये आहेत.
देशातील सरकारच्या मालकीचे सर्व सोने हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूरमधील केंद्रात आहे.
मुंबईमधील लोकल ट्रेनमधून रोज जवळजवळ ६० लाख प्रवासी प्रवास करतात. हा आकडा इस्त्राइलच्या लोकसंख्येहून अधिक आहे.
युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अजंठा लेणी, वेरुळ लेणी आणि एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.
शेखरु Indian giant squirrel या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे. तर हिरवे कबुतराला Green Imperial Pigeon राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
कब्बडी हा राज्याचा प्रमुख खेळ आहे.
महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.
महाराष्ट्र हा शब्द संस्कृतमधून आल्याचे मानले जाते. संस्कृतमधील ‘महा’ म्हणजेच महान आणि ‘राष्ट्र’ म्हणजे देश हे दोन शब्दांना एकत्रित करुन तयार झाला आहे. महाराष्ट्र शब्दाचा अर्थ होतो महान राष्ट्र.
महाराष्ट्रा बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा भाग ०२

1 thought on “Maharashtra Day Special”

Leave a Comment

error: Content is protected !!