Integration Of Saral Portal and U Dise Plus Portal
Integration Of Saral Portal and U Dise Plus Portal
Integration of Saral System and U-Dice Plus System
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत बेनी बेष्ट मार्ग, पुणे ४११०
क्र. शिसंमा/2024-25/टि-8/सं.मा./०४१८२
दिनांक : ऑगस्ट, 2025
13 AUG 2025
प्रति, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
बृहन्मुंबई
विषय :- सरल प्रणाली व यु-डायस प्लस प्रणाली एकत्रिकरणाबाबत..
संदर्भ : मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दि.३०.०५.२०२५
मा. प्रधान सचिव, (शालेय शिक्षण) यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक ३०.०५.२०२५ रोजी विषय क्र. १३ अन्वये एनआयसी पुणे यांचे व्दारे सरल पोर्टलचे एकत्रिकरणाअंतर्गत सरल प्रणाली व युडायस प्लस प्रणालीचे एकत्रिकरणबाबत एनआयसी पुणे व एनआयसी दिल्ली यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करणेबाबत निर्देश प्राप्त आहे.
एनआयसी पुणे यांच्यास्तरावर यु-डायस प्लस व सरल पोर्टलवरील एकत्रिकरणाची कार्यवाही सुरु आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये यु-डायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता व इतर ऑनलाईन प्रणालीवरील कार्यवाही करण्यात येणार आहे.
तद्नुषंगाने सरल पोर्टल वरील स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल, संच मान्यता पोर्टल व स्टाफ पोर्टलवरील व युद्धायस प्लस वरील तपशील तातडीने आवश्यकतेनुसार अद्यावत करण्यात यावा, जेणे करुन यु-डायस प्लस व सरल पोर्टलवरील माहितीमध्ये तफावत येवून ऑनलाईन कार्यवाही करताना तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने दक्षता घ्यावी. सदरची कार्यवाही दि.२२.०८.२०२५ पर्यंत करण्यात येवून त्याबाबतचा अहवाल संचालनालयास दि.२५.०८.२०२५ रोजी सादर करावा.
(शरद गोसावी) शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक