Improvement In Implementation Of Scheme Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा

Improvement In Implementation Of Scheme Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna

image 5
Improvement In Implementation Of Scheme Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna

Improvement In Implementation Of Scheme Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojna

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत.

प्रस्तावना :-
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शासन निर्णय दि.०२.०९.२०२४ अन्वये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी ११ प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता, सदर योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-

Improvement in the implementation of the scheme “Chief Minister-My Beloved Sister”


“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास संदर्भाधीन दि.०२.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दि.१२.०७.२०२४ व दि.२५.०७.२०२४ अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे. सबब, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात येत आहे.२. सदर शासन निर्णय दि.०५.०९.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०९०५१८३५५५९३३० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Improvement In Implementation Of Scheme Chief Minister Mazi Ladki Bahin Yojna

(डॉ. अनुपकुमार यादव)
सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक- मबावि-२०२४/प्र.क्र.९६/का-२ नविन प्रशासन भवन, तिसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक:-०६ सप्टेंबर, २०२४.
संदर्भ :- महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मबावि-२०२४/प्र.क्र.९६/का-२, दि.२८.०६.२०२४, दि.०३.०७.२०२४, दि.१२.०७.२०२४, दि.२५.०७.२०२४ व दि.०२.०९.२०२४

GR pdf Copy Link

Leave a Comment

error: Content is protected !!