Extra Time To Students For Class 10th 12th Exam
Extra Time To Students For Class 10th 12th Exam
Extra Time To Students For SSC HSC EXAM 2025
Additional time to be given to students for class 10th and 12th examination
इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळ
क्रमांक रा.मं./परीक्षा-८/३८३ पुणे
दिनांक -१८/०१/२०२५.
प्रति,
विभागीय सचिव, सर्व विभागीय मंडळे
विषय :-
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत.
संदर्भ :- कमांक रा.मं./ परीक्षा-८/७८०, दि. १५/०२/२०२३ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भिय पत्रास अनुसरून आपणांस सूचित करण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वाढवून देण्यात येत आहेत. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेसाठी देखील सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळी ११.०० पूर्वी व दुपारी ३.०० पूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार नाही याची सर्व परिरक्षक, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक यांनी दक्षता घेण्याबाबत आपल्यामार्फत लेखी परिपत्रकाव्दारे सूचित करावे.
परीक्षा दालनात ज्या कमाने परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल, त्याच कमाने परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर लिखित ‘उत्तरपत्रिका परीक्षार्थ्यांकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना संबंधित परिरक्षक व केंद्रसंचालक यांचेमार्फत देण्यात याव्यात. पेपरच्या निर्धारीत वेळेनंतर शेवटी दहा मिनीटे वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात यावा. परीक्षा कालावधीत द्यावयाचे घंटेचे सुधारीत नियोजन सोबत जोडण्यात आलेले असून, सदर बाब आपल्या कार्यकक्षेतील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालये तसेच सर्व परिरक्षक, केंद्र संचालक यांना लेखी परिपत्रकाव्दारे निदर्शनास आणावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास सादर करण्यात यावा.
(देविदास कुलाळ) सचिव, राज्य मंडळ, पुणे
State Board SSC 10th HSC 12th Exam 2025
Planning of bells to be given during examination period