Establish Science And Innovation Centers In Every District महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामध्ये विज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्रे उभारण्याबाबत

Establish Science And Innovation Centers In Every District

Establish science and innovation centers in every district

Regarding setting up science and innovation centers in every district of Maharashtra.

Districts in Maharashtra for setting up Science and Innovation Activity Centres

Vidnyan Navinypurn Upkendra Stapana

(तात्काळ/प्रथम प्राधान्य)

जा.क्र.शिसंमा./ए-१/संकीर्ण/विआनाऊ/२०२५-२६/४०२४/4429

दि.०२/०९/२०२५

विषय : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामध्ये विज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्रे उभारण्याबाबत.

संदर्भ :

१) सदस्य सचिव, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांचा ई-मेल संदेश दि.२९.०७.२०२५

२) अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र जा.क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२७६/एसडी-४, दि.४.०८.२०२५

३) संचालनालयाचे पत्र जाक्र. शिसंमा/ए-१/संकीर्ण/विआनाऊ/२०२५-२६/४०२४, दि.४.०८.२०२५

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन पत्र क्र.संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२७६/एसडी-४, दि.३.०९.२०२५

उपरोक्त संदर्भीय ई-मेल संदेश व त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रती आवश्यक त्या कार्यवाहीसाठी या पत्रासोबत जोडण्यात आल्या आहेत. यामधील विषयाशी संबंधित टिप्पणीचे अवलोकन करण्यात यावे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी व जिज्ञासा वाढीस लागावी याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामध्ये विज्ञान व नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्रे उभारण्याबाबतच्या संकल्पनेचे विश्लेषण सदर टिप्पणीमध्ये करण्यात आलेले आहे. या योजनेकरिता निश्चित करण्यात आलेले निकष पूर्ण करणा-या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील एकूण सहा इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय/खाजगी अनुदानित/खाजगी विनाअनुदानित शाळांची यादी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांना आवश्यक आहे. माहिती आवश्यक असणा-या २३ जिल्हयांच्या यादीप्रमाणे या २३ जिल्हयांमधील प्रत्येकी सहा शाळांची नावे ही त्या शाळांमध्ये विज्ञान व नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्रे सुरु करण्याकरिता आयोगास त्यांच्या विहित परिशिष्टाप्रमाणे उपलब्ध करुन द्यावयाची आहेत.

संदर्भीय ई-मेल संदेशाबाबत देण्यात आलेल्या २३ जिल्हयातील प्रत्येकी सहा शाळांची माहिती विहित परिशिष्टामध्ये शासनास दि.१० ऑगस्ट, २०२५ पर्यंत सादर करावयाची होती. संदर्भ क्र.४ च्या शासन पत्रान्वये सदरची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तरी आपल्या विभागातील संबंधित जिल्हयांची माहिती विहित परिशिष्टामध्ये संचालनालयास प्रथम प्राधान्याने तात्काळ दि. ४ सप्टेंबर, २०२५ रोजी या कार्यालयास सादर करण्यात यावी.

परिपत्रक पीडीएफ लींक

शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासनशिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे.

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, छ. संभाजीनगर, अमरावती, नागपूर

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) (सर्व संबंधित २३ जिल्हे)

क्रमांक :- संकीर्ण २०२५/प्र.क्र.२७४/एसडी-४
दिनांक : ०४ ऑगस्ट, २०२५

विषय :- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विज्ञान आणि नावीन्यपूर्ण

संदर्भ :- सदस्य सचिव, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांचा ई-मेल संदेश दिनांक २९.०७.२०२५

महोदय,

संदर्भाधीन ई-मेल संदेश व त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रती या पत्रासोबत जोडण्यात आल्या आहेत. यामधील विषयाशी संबंधित टिपणीचे कृपया अवलोकन व्हावे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी व जिज्ञासा वाढीस लागावी याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विज्ञान व नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्रे उभारण्याबाबतच्या संकल्पनेचे विश्लेषण सदर टिपणीद्वारे करण्यात आलेले आहे. या योजनेकरिता निश्चित करण्यात आलेले निकष पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एकूण सहा इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय / खाजगी / अनुदानित / विनाअनुदानित शाळांची यादी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांना आवश्यक आहे. माहिती आवश्यक असणाऱ्या २३ जिल्ह्यांच्या यादीप्रमाणे या २३ जिल्ह्यांमधील प्रत्येकी सहा शाळांची नावे ही त्या शाळांमध्ये विज्ञान व नावीन्यपूर्ण उपक्रम केंद्रे सुरु करण्याकरिता आयोगास त्यांच्या विहित परिशिष्टाप्रमाणे उपलब्ध करून द्यावयाची आहेत.

२. संदर्भाधीन ई-मेल संदेशासोबत देण्यात आलेल्या २३ जिल्ह्यांतील प्रत्येकी सहा शाळांची माहिती विहित परिशिष्टामध्ये शासनास दिनांक १० ऑगस्ट, २०२५ पर्यंत सादर करण्यात यावी, ही विनंती.

सहपत्र : वरीलप्रमाणे.

आपला,

परिपत्रक पीडीएफ लिंक

(अ.अ. कुलकर्णी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मंत्रालय (विस्तार),मंत्रालय, मुंबई

प्रति,
आयुक्त (शिक्षण), पुणे. शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,

उपक्रम केंद्रे उभारण्याबाबत.. विषय :- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विज्ञान आणि नावीन्यपूर्ण

संदर्भ :- सदस्य सचिव, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांचा ई-मेल संदेश दिनांक २९.०७.२०२५

Establish Science And Innovation Centers In Every District
Establish Science And Innovation Centers In Every District

Establish science and innovation centers in every district

IMG 20250909 113959
Establish Science And Innovation Centers In Every District

RAJIV GANDHI SCIENCE AND TECHNOLOGY COMMISSION

List of the Districts in Maharashtra for setting up Science and Innovation Activity Centres

Please send list of say 5-6 Institutions as Recognized Institutions offering Secondary School Education in Following Districts:

Sr No

Name of District

Names of Recognized Institutions with Address

Name of Principal and email ID / Mob no

Leave a Comment

error: Content is protected !!