Election Duty Overtime Work Remuneration

Election Duty Overtime Work Remuneration

image 74
Election Duty Overtime Work Remuneration

Election Duty Overtime Work Remuneration

Election Duty Overtime Allowance for Work remuneration

Rates of remuneration staff on Election Duty

दिनांक : १६.०१.२०२५

शासन निर्णय –

महाराष्ट्र राज्यात दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ घेण्यात आली आहे. दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासून ते दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ ह्या निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूका संबंधीचे काम ठराविक मुदतीत पार पाडण्यासाठी मंत्रालयीन, विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणूक शाखांमध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुट्टीच्या दिवसांसह प्रत्येक दिवशी जादा काम करावे लागले. त्याकरिता मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तांची कार्यालये तसेच सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, तहसिल कार्यालये यामध्ये निवडणूकांचे काम करणाऱ्या, अराजपत्रित कर्मचारी वर्गाला तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात, इतर विभागातून / जिल्हा आस्थापनेतून निवडणूकीच्या कामासाठी घेतलेल्या अतिरिक्त अराजपत्रित कर्मचारी वर्गाला निम्ननिर्देशित शर्तीच्या अधीन राहून, खालील प्रमाणकानुसार अतिकालिक भत्ता देण्यास मंजूर देण्यात येत आहे. :-


१) अतिकालिक भत्त्याचा दर –
कोणत्याही कामाच्या दिवशी केलेल्या जादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासाला (अर्धा तास किंवा अर्ध्या तासांपेक्षा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल) प्रत्येक तासाच्या मूळ वेतन (Basic Pay) च्या प्रमाणात देण्यात येईल.
टिप दर ताशी वेतनाचा दर ठरविण्यासाठी महिना ३० दिवसांचा आणि गट “ब” (अराजपत्रित) व गट “क” कर्मचाऱ्यांसाठी दिवस ८.३० तासांचा, वाहनचालकांसाठी दिवस ९.४५ तासांचा समजण्यात येईल. तर चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाचे दैनंदिन कामाचे तास बृहन्मुंबईत ९ तास व इतर ठिकाणी देखील ९ तास समजण्यात येतील.अटी व शर्ती –


(१) अतिकालिक भत्ता माहे नोव्हेंबर-२०२४ च्या अनुज्ञेय मूळ वेतन (Basic Pay) च्या प्रमाणात तासाच्या दराने दिला जाईल. तसेच दैनंदिन वेतनाचा दर काढताना, त्यामध्ये इतर कुठल्याही भत्याचा (उदा. घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता इत्यादी) समावेश होणार नाही.


(२) सर्वसाधारण कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अतिकालिक भत्ता अनुज्ञेय असेल आणि तो फक्त दिनांक १५.१०.२०२४ पासून ते दिनांक २५.११.२०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीसाठी देय राहील.
(३) उपरोक्त कालावधीतील सुट्टीच्या दिवशी केलेल्या निवडणूकीसंबंधीच्या कोणत्याही कामासाठी अतिकालिक भत्ता दिला जाईल.


(४) मंत्रालय, विभागीय, जिल्हा व तहसिल पातळीवर निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या शासकीय, निमशासकीय तसेच इतर संस्थांतील कर्मचाऱ्यांना वरील पध्दतीने अतिकालिक भत्ता देय राहील.


(५) अतिकालिक भत्याची कमाल मर्यादा त्यांच्या माहे नोव्हेंबर २०२४ च्या देय होणाऱ्या मूळ वेतना (Basic Pay) एवढी राहील. त्यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा (उदा. घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता इत्यादि) समावेश होणार नाही. तसेच सदर अतिकालिक भत्ता एका अराजपत्रित कर्मचाऱ्याला एकदाच देय राहील.


(६) जे कर्मचारी निवडणूकीच्या कामासाठी मुख्यालयाबाहेर प्रवास करतील त्यांना नियमानुसार मिळणाऱ्या प्रवास/दैनिक भत्याव्यतिरिक्त अतिकालिक भत्ता देय नाही. या दोन्ही भत्यांपैकी जो फायदेशीर असेल तो भत्ता घेण्याबाबत सदर कर्मचाऱ्यांना पर्याय राहील.


(७) निवडणूकीचे काम ज्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पाडले जाते ते अधिकारी, अतिकालिक भत्यासाठी कर्मचारी वर्गाने केलेल्या जादा कामाचा दैनंदिन कालावधी दैनंदिन हजेरीपटाच्या आधारे प्रमाणित करतील.


(८) जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सरकारी व निमसरकारी आणि इतर संस्थांकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या वाहनांचे वाहनचालकांना अधिग्रहणाच्या कालावधीतील दिनांक १५.१०.२०२४ पासून ते दिनांक २५.११.२०२४ या कालावधीकरिता (दोन्ही दिवस धरून) अटी व शर्तीतील अनुक्रमांक १ व २ नुसार अतिकालिक भत्ता देय राहील.


(९) अधिग्रहित केलेल्या वाहनांच्या चालकांना वित्त विभाग, शासन निर्णय क्र. अकाभ- २०२२/प्र.क्र.०७/सेवा-६, दि.०७.०८.२०२३ नुसार त्यांच्या मूळ विभागातील/संस्थांतील दराने मिळणारा अतिकालिक भत्ता आणि या शासन निर्णयातील निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कालावधीसाठी अट क्र. १ व २ नुसार मिळणारा अतिकालिक भत्ता यापैकी जो फायदेशीर असेल तो अतिकालिक भत्ता दिनांक १५.१०.२०२४ पासून ते दिनांक २५.११.२०२४ या कालावधीकरिता घेण्याचा पर्याय राहील.


(१०) निवडणूकीच्या कालावधीत वाहनाचा वापर करणारे प्राधिकारी वाहन चालकांनी केलेले काम वाहनाच्या लॉग बुकवरुन प्रमाणित करतील. सदर प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी इतर शासकीय विभागाकडून अधिग्रहीत केलेल्या वाहनांच्या वाहनचालकांची अतिकालिक भत्त्याची देयके त्याच्या मूळ विभागाकडे न पाठविता संबंधित वाहन चालकांना निवडणूक निधीतून अदा करावीत.


(११) या शासन निर्णयातील अतिकालिक भत्त्याचा दर व शर्ती खाजगी वाहनांच्या वाहनचालकांना व रोजंदारीवर कार्यरत असलेल्या वाहनचालकांना लागू राहणार नाहीत.


(१२) निवडणूकीच्या कामासाठी दैनंदिन/कंत्राटी तत्वावर नेमलेल्या कर्मचारी वर्गाला अतिकालिक भत्ता देय नाही.

२. या बाबींवर होणारा खर्च “मागणी क्रमांक ए-०२, मुख्य लेखाशीर्ष २०१५-निवडणुका, उपशीर्ष १०६-राज्य/संघराज्यक्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, (০০) (০৭) राज्य/संघराज्यक्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च, (२०१५ ००६८), १३- कार्यालयीन खर्च, दत्तमत” खालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल. तसेच नांदेड जिल्हयांतर्गत एकाच वेळी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आणि १६-नांदेड लोकसभा पोट निवडणूक या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी “मागणी क्र.ए-२, प्रधानशीर्ष २०१५-निवडणुका अंतर्गत “उपशीर्ष १०४-लोकसभा व राज्य / संघराज्य क्षेत्र विधानसभा यांच्या एकाच वेळेस घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांचा खर्च, (२०१५००४१), १३-कार्यालयीन खर्च” या लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्रमांक ६६०/व्यय-४, दि.०३.१२.२०२४ व अनौ. संदर्भ क्रमांक २८१/२४/सेवा-६, दि.०९.१२.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनंतर निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११६१७५२३४९१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय, जिल्हा व तहसिल पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देणेबाबत.


महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : सीईएल-२०२४/प्र.क्र.४५/२४/३३(नि.३) (२),मंत्रालय, मुंबई

Vidhan Sabha General Election 2024 regarding payment of overtime allowance for overtime work done by non-gazetted employees at divisional, district and tehsil levels appointed for the work of Vidhan Sabha General Elections.

Leave a Comment

error: Content is protected !!