Ek Bharat Shreshtha Bharat Activities एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविणे बाबत परिपत्रक

Ek Bharat Shreshtha Bharat Activities

Ek Bharat Shreshtha Bharat Activities

Ek Bharat Shreshtha Bharat Activities In All Schools

Implementing Activities In All Schools Under The Ek Bharat Shreshtha Bharat Scheme

Regarding implementing activities in all schools under the “One India-Best India” scheme…

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

दिनांक: २२/०७/२०२५

जा.क्र. मराशैसंप्रप/कला व क्रीडा/EBSB/२०२५-२६/

विषय : “एक भारत-श्रेष्ठ भारत “योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविणे बाबत…

संदर्भ : १. भारत सरकार शिक्षा मंत्रालय द्वारे आयोजित ऑनलाईन बैठक माहे एप्रिल २०२५.

२. मा. राजेश कुमार मौर्य, उपसचिव भारत सरकार यांचे पत्र दि.२०/११/२०२० ( सुधारित मार्गदर्शक सूचना)

उपरोक्त विषयाबाबत, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत ” एक भारत-श्रेष्ठ भारत” योजनेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, भौगोलिक, जैविक विविधता, वेगवेगळे प्राणी, वनस्पती, संगीत, नृत्य, लघुचित्रपट चित्रपट, हस्तकला, खेळ, सण-उत्सव, साहित्य, चित्र-शिल्प या सर्वांमध्ये विविधतेचे दर्शन होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून विविधता टिकविणे व त्याबाबत उत्तरदायित्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी देशातील राज्या-राज्यांची जोडी करुन राज्यांमधील उपरोक्त नमूद बाबींची माहिती करून घ्यावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याची ओरिसा या राज्यात सोबत जोडी (Pairing) करण्यात आलेली आहे. एक भारत-श्रेष्ठ भारत या उपक्रमातंर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये संदर्भ क्र.२ नुसार खालील उपक्रम घेण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.

शाळांमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत कार्यान्वित करण्याबाबत :

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ ते १२ वीच्या शाळांमध्ये एक भारत -श्रेष्ठ भारत उपक्रम कार्यान्वित कण्यात यावे. यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा समावेश करण्यात यावा. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमातंर्गत सोबत जोडलेल्या यादीतील उपक्रम शाळांमध्ये माहे ऑगस्ट, २०२५ व एप्रिल, २०२६ या कालावधीत राबविण्यात यावेत. एक भारत-श्रेष्ठ भारत उपक्रम शालेय स्तरावर आयोजित केल्यावर त्याबाबतची माहिती खालील नमूद लिंक वर भरावी. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळांस्तरावर खाली दिलेले उपक्रम राबवावेत.

उडीया भाषेतील १०० वाक्यांचा सराव :-

सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मधील उडीया भाषेतील वाक्यांचा शालेय वेळेत ५- १० मिनिटांचा वेळ देऊन विद्यार्थ्याकडून सराव करून घेण्यात यावा.

शाळांमध्ये घ्यावयाचे उपक्रम :-

अ.क्र. उपक्रमाचे नाव

१. उडीया भाषेतील १०० वाक्यांचे संभाषण उपक्रमाचे तपशील सदर पत्रासोबत दिलेल्या प्रपत्र-अ नुसार उपक्रम आयोजित करण्यात यावा.

२. खुले पत्र लिहिणे.

एकमेकांच्या राज्यामधील सामान्य ज्ञान, तेथील ऐतिहासिक स्थळे, स्थानिक खेळ व संस्कृती, अन्नपदार्थ, भाषा, कपडे, प्राणी जीवन, वनस्पती जीवन इ. माहितीचे आदानप्रदान करणे.

३. ओडीशा राज्यातील लोकनृत्य / गाणे शिकणे.

उपक्रमाचे तपशील ओडीशा राज्यातील लोकनृत्य / गाणे या बाबत सादरीकरण / स्पर्धा घेणे.

४. ओडीशा फॅन्सी ड्रेस स्पर्धा

उपक्रमाचे तपशील ओडीशा राज्यातील वेषभूषा बाबतच्या स्पर्धा आयोजित करणे.

५.ओडीशा राज्यातील खाद्य पदार्थ महोत्सव.

उपक्रमाचे तपशील ओडीशा राज्यातील खाद्य पदार्थ महोत्सव आयोजित करणे.

६.ओडीशा राज्यातील लोककला, हस्तव्यवसाय व पेंटिंग शिकणे

उपक्रमाचे तपशील ओडीशा राज्यातील लोककला, हस्तव्यवसाय व पेंटिंग या बाबत शाळेतील कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविणे. जर शिक्षकाला सदर कलांचे ज्ञान नसेल तर ऑनलाईन मदत घेतली जाऊ शकते.

७.ओडीशा राज्याबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण आणि भाषेचे शिक्षण

उपक्रमाचे तपशील प्रपत्रअ मध्ये दिलेल्या १०० वाक्यांच्या आधारे भाषेचे शिक्षण देणे.

८. पेन मित्र (Pen Pals/e Penpals)

उपक्रमाचे तपशील १. एकमेकांना प्रश्न विचारून त्यांच्या जोडलेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सवयी, इतिहास, कला आणि साहित्य, रीतिरिवाज आणि परंपरा, वन्यजीव, वनस्पती-प्राणी, पारंपारिक औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे ज्ञान इत्यादींचा शोध घेणे.

२. त्यांच्या संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे धाडस, चालीरीती इत्यादींचे वर्णन करणाऱ्या कथा एकमेकांशी देवाणघेवाण करणे.
३. संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोस्टकार्ड, तिकिटे अदलाबदल करणे.

४. त्यांच्या स्वतःच्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील हस्तकला/कला दर्शविणारे हस्तनिर्मित पोस्टकार्ड किंवा लिफाफे त्यांच्या पेन मित्रांना पोस्ट करणे.

५. संस्कृती/परंपरा/खाण्याच्या सवयी/वन्यजीव/वनस्पती-प्राणी/पारंपारिक औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे ज्ञान/प्रसिद्ध ठिकाणे या विषयावर शब्द शोध, शब्दकोडे किंवा सुडोकू सारखे खेळ खेळा.

६. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या भाषेतील काही सामान्य वाक्ये किंवा शब्द एकमेकांशी दररोज शेअर करा.

७. राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील शाळा विद्यार्थ्यांसाठी वास्तविक बनवण्यासाठी Google नकाशे/गुगल स्ट्रीट व्ह्यू वापरून त्यांच्या पेन मित्रांच्या शाळेला व्हर्चुअल भेट द्या. शक्य असल्यास, समोरासमोर बैठकांसाठी उन्हाळी शिबिरे देखील नंतर आयोजित केली जाऊ शकतात. कार्यक्रमाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी शाळेतील शिक्षकाची नियुक्त करणे.

९. Scrap book (स्क्रैप बुक) पुस्तक तयार करणे

उपक्रमाचे तपशील ओडीशा राज्य बद्दलचे सामान्य ज्ञान, तेथील ऐतिहासिक स्थळे, स्थानिक खेळ व संस्कृती, अन्नपदार्थ, भाषा, कपडे, प्राणीजीवन, वनस्पती जीवन इ. माहिती अथवा फोटो संकलित करून त्याचे Scrap book (स्क्रैप बुक) पुस्तक मुलांकडून तयार करून घ्यावे.

१०. ओडीशा राज्याचे फोटो आणि कोलाज बनविणे.

उपक्रमाचे तपशील ओडीशा राज्यातील ऐतिहासिक स्थळे, स्थानिक खेळ व संस्कृती, अन्नपदार्थ, भाषा, कपडे, प्राणीजीवन, वनस्पती जीवन इ. माहिती संकलित करून फोटो आणि कोलाज बनविणे.

११. ओडीशा राज्यबद्दल आलेल्या बातम्यांवर चर्चा करणे.

उपक्रमाचे तपशील १. चर्चा :- विद्यार्थी किंवा शिक्षक राष्ट्रीय प्रतिष्ठित व्यक्ती/समाजसुधारक/प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्त्वे /इतर कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वावर /जोडलेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या इतर कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर थोडक्यात बोलू शकतात.

२. विद्यार्थी जोडलेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या चालू घडामोडींचा थोडक्यात अहवाल बातम्या वाचण्याच्या पद्धतीने सादर करू शकतात. त्यात आनंददायी घटक जोडण्यासाठी, काही मुले पॅनेललिस्ट (पॅनेल चे सदस्य) म्हणून काम करू शकतात आणि बातम्यांवर वादविवाद करू शकतात, तर काही मुले जोडलेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या माध्यमांमधून जाहिरात देखील करू शकतात.

१२. विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमाचा शाळास्तरावरील अहवाल सादर करणे

उपक्रमाचे तपशील १. शाळेच्या वार्षिक अहवाल/मासिकात EBSB बद्दल एक विभाग देखील असू शकतो.

२. शाळेतील वरिष्ठ वर्गांना ” एक भारत श्रेष्ठ भारत” (EBSB) अंतर्गत शाळेत केलेल्या सर्व उपक्रमांचे वर्णन एकत्रित करणे, एकत्रित करणे आणि संकलित करणे, अहवालात किंवा “एक भारत श्रेष्ठ भारत शाळा अहवाल” मध्ये काम सोपवले जाऊ शकते.

३. हा अहवाल कागद किंवा चार्ट पेपर किंवा इतर कोणत्याही सर्जनशील स्वरूपात असू शकतो आणि तो शाळेच्या सूचना फलकावर उपलब्ध असावा.

४. अहवाल वर्षाच्या अखेरीस तयार करावा.

५. अहवाल तयार करण्यात विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होऊ शकतात.

६. यामध्ये शाळेत आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांचा/कार्यक्रमांचा समावेश असेल.

७. विद्यार्थ्यांनी त्यांच्या EBSB स्कूल रिपोर्टला योग्य शीर्षक द्यावे.

८. उपक्रमांचा अहवाल इच्छित स्वरूपात तयार करण्यात यावा. आणि शक्य असेल तेथे उपक्रमांचे छायाचित्रे आणि

हा अहवाल शाळेकडून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या SCERT कडे (DIET मार्फत) सादर करावा.

उपरोक्त तक्त्यात नमूद उपक्रम “एक भारत-श्रेष्ठ भारत अंतर्गत वर्ग/शाळा स्तरावर घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. सदरील उपक्रम घेण्यासाठी संदर्भाकरिता ओडीशा राज्याबद्दल अधिक माहितीसाठी परिशिष्ट ब सोबत जोडले आहे. परिशिष्ट व मधील माहिती, तसेच ओडीशा राज्याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून प्राप्त माहितीच्या मदतीने यादीत नमूद केलेले उपक्रम राबवावेत. उपक्रम पूर्ण झाल्यावर त्याची माहिती पुढील लिंकवर जाऊन भरण्यात यावी.

उपक्रमांची माहिती भरण्यासाठी लिंक

संदर्भीय क्र.२ नुसार शिक्षणाधिकारी माध्य. हे जिल्हा स्तरावरील नोडल/संपर्क अधिकारी तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील मधील वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता हे उपजिल्हा संपर्क अधिकारी आहेत. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी माध्य. (नोडल/संपर्क अधिकारी) व वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता (उपजिल्हा संपर्क अधिकारी) यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारत अंतर्गत उपरोक्त सर्व उपक्रम राबविले जातील यासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना तालुकास्तरीय/केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा, बैठका, झूम/गुगल मिटद्वारे प्रेरित करून शाळांना मार्गदर्शन करावे. आपल्या जिल्ह्यातील १०० टक्के शाळा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयन्त करावे. दरमहा आपल्या जिल्ह्यातील शाळांनी राबविलेले उपक्रम व सहभागी विद्यार्थी यांची संख्यात्मक माहिती याचा आढावा घेतला जाईल.

सोबत :- १. संदर्भीय पत्र क्र.२.

२. परिशिष्ट अ, ब,

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

(अरुण जाधव) उपसंचालक सामाजिकशास्त्र, कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०

प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर मुंबई) प्रशासन अधिकारी, मनपा/नपा, सर्व

IMG 20250731 182245
Ek Bharat Shreshtha Bharat Activities

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२

मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे- १

प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव सविनय सादर :

मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-०१

Leave a Comment

error: Content is protected !!