Educational Trips Insurance for Students And Teachers
Educational Trips Insurance for Students And Teachers
Insurance for Students Teachers Going on Educational Trips
दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड
शैक्षणिक सहली करता जाणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा वैयक्तिक अपघात विमा योजना
प्रति,
मा. मुख्याध्यापक / प्राचार्य,
विषय : शैक्षणिक सहलीकरीता जाणा-या विद्यार्थी व शिक्षकांचा वैयक्तिक अपघात विमा उतरवणे संदर्भात.
महोदय / महोदया,
वरील विषयास अनुसरून आपणास कळवू इच्छितो की, शासकीय आदेशानुसार व शिक्षण खात्याच्या नियमानुसार शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन जाताना आपण सहलीला जाणा-या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा विमा उतरवणे बंधनकारक केले आहे.
सदर विषय लक्षात घेऊन आम्ही (दि न्यू इंडिया एशुरेंस कं. लि.) सहलीसाठी जाणा-या विद्यार्थी व शिक्षकांचा विमा उतरवून देतो. त्याची माहिती खालील प्रमाणे आहे,
विमा कालावधी : विमा उतरवल्यापासून १ वर्ष.
विमा संरक्षण रक्कम :
रु. ५०,००० किंवा रु. १ लाख प्रती व्यक्ति (आपल्या आवश्यकतेनुसार)
Personal accident Insurance for Students and Teachers Going on Educational Trips
नुकसानीचे स्वरूप
विमा लाभ
अपघाती मृत्यु झाल्यास
१००% विमा रक्कम
अपघातामुळे दोन हात / दोन पाय / दोन डोळे कायमस्वरूपी निकामी झाल्यास
१००% विमा रक्कम
अपघातामुळे एक हात आणि एक पाय / एक हात व एक डोळा / एक पाय व एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाल्यास १००% विमा रक्कम
अपघातामुळे एक हात किंवा एक पाय किंवा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास ५०% विमा रक्कम
अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १००% विमा रक्कम
विमा हप्ता :
अ. नं.
विमा संरक्षण रक्कम (प्रती व्यक्ति)
विमा हप्ता (प्रती व्यक्ति)
रु. १ लाख करीता
रु. ६०/-
रु. ५०,००० करीता
रु. ३०/-
आवश्यक कागदपत्रे :
१. मुख्यध्यापकांचे पत्र शाळेच्या लेटरहेडवर मुख्यध्यापकांच्या सही शिक्क्यासह.
२. सहलीला जाणा-या सर्व विद्यार्थी व शिक्षाकांची यादी मुख्यध्यापकांच्या सही शिक्क्यासह.