दुर्गोत्सव २०२५ Durgotsav

Durgotsav

Durgotsav

Durgotsav2025

Amrut Durgotsav

UNESCO has declared the 12 Durgas of Shiv Chhatrapati as World Heritage. To pay an unprecedented tribute to them, the public is celebrating “Amrit Durgotsav”.

जा.क्र.शिसंमा/ दुर्गोत्सव/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/5124

दि.३०/१०/२०२५

:OCT 2025

विषय :- युनेस्कोने शिवछत्रपतींच्या १२ दुर्गाना जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे. त्यांना जनसामान्यांतून एक अभूतपूर्व अशी मानवंदना देण्यासाठी “अमृत दुर्गोत्सव” साजरा करण्याबाबत..

संदर्भ :

१) महसूल व वन विभाग, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचे पत्र क्रः-संकीर्ण-२०२५/प्र.क्र.८८/समन्वय-३ (म-८), दिनांक ०९/१०/२०२५.

२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांचे पत्र क्र. अमृत/दुर्गात्सव/२०२५/३५३, दिनांक २४/०९/२०२५.

३) संचालनालयाचे पत्र दि.१६/१०/२०२५. क्र.शिसंमा/दुर्गोत्सव /ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५०२२

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, आपणांस संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक ३ च्या पत्राअन्वये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांना मानवंदना देण्सासाठी ” अमृत दुर्गोत्सव” हा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. शिवछत्रपतींच्या दुर्गाना अमृत दुर्गोत्सवातून दिलेल्या मानवंदनेतून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे. यासाठी राज्यातील सर्व स्तरांतील जनतेचा सहभाग होणे अपेक्षित आहे. अमृत दुर्गात्सव साजरा करणेबाबतची संहिता व वेळापत्रक संदर्भाधीन पत्रासोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये देण्यात आले आहे. (सोबत पत्र जोडले आहे.)

तरी अमृत दुर्गोत्सव महोत्सव सर्व जिल्ह्यांमध्ये संदर्भाधीन पत्रासोबतच्या परिशिष्ट अ मधील संहिता व वेळापत्रकानुसार साजरा करण्यात यावा. यासाठी आपल्या स्तरावरील सर्व शाळा/महाविद्यालय यामध्ये अमृत दुर्गात्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यातील सर्व स्तरावरील नागरिक, विविध सेवाभावी संस्था (NGO) तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांना या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी करुन घेण्यात यावे, असे सूचित करण्यात आलेले आहे.

तरी यापत्रान्वये पुनश्चः आपणांस कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रासोबतच्या सहपत्रामधील सूचनांनुसार “अमृत दुर्गात्सव” हा उपक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये संदर्भाधीन पत्रासोबतच्या परिशिष्ट अ मधील संहिता व वेळापत्रकानुसार साजरा करण्यात यावा. यासाठी आपल्या स्तरावरील सर्व शाळा/महाविद्यालय यामध्ये “अमृत दुर्गात्सव” हा उपक्रम साजरा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यातील सर्व स्तरावरील नागरिक, विविध सेवाभावी संस्था (NGO) तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांना या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी करुन घेण्यात यावे.

परिपत्रक लिंक

शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे.

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे

Durgotsav
Durgotsav

📣 इतिहास केवळ स्मरणात ठेवण्याकरिता नाही— तो असतो पराक्रम आणि शौर्याच्या पुनरावृत्ती साठी.

🪔 ‘अमृत’ संस्थेच्या वतीने अभिमानपूर्वक सादर — दुर्गोत्सव 2025

“शिवछत्रपतींच्या” गौरवशाली दुर्ग परंपरेला लोकांच्या सहभागातून दिलेली विश्वविक्रमी मानवंदना!

🎯 या वर्षी, महाराष्ट्रभर (आणि महाराष्ट्राबाहेरही) १२ दुर्गांची प्रतिकृती उभारूया!

तुम्ही या ऐतिहासिक मोहिमेचा भाग कसे बनू शकता:

🔸 युनेस्कोने प्रमाणित केलेल्या १२ किल्ल्यांपैकी कोणताही एक निवडा.

🔸 तो किल्ला घरात, शाळेत किंवा सोसायटीत प्रतिकृती स्वरूपात उभारा.

🔸 प्रतिकृतीसोबत एक छानशी सेल्फी काढा.

🔸 ही सेल्फी 🌐

www.durgotsav.com

या संकेतस्थळावर अपलोड करा.

*⚔️ तुमच्या एका सेल्फी चे महत्व*

तुमची एक सेल्फी विश्वविक्रम नोंदवेल!

सर्व पात्र सेल्फी एकत्र करून जगातील पहिल्या सार्वजनिक सहभागातून गडदुर्गांच्या प्रतिकृती बनवल्या जातील व वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवल्या जाणार आहेत!

✨ या दिवाळीत, छत्रपती शिवाजी महाराजांना अशी मानवंदना देऊया जी आजवर विश्वात कुठेही झाली नाही.

📞 संपर्क: +91 9112226154

🌐 संकेतस्थळ: www.durgotsav.com

📧 ईमेल: info@mahaamrut.org.in

🏢 पत्ता: महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, अ‍ॅडव्हान्समेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग (AMRUT), महाराज सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, पाचवा मजला, औंध, पुणे – ४११०६७.

Leave a Comment

error: Content is protected !!