Display Sugar Boards Plaques In Schools
Display Sugar Boards Plaques In Schools
Regarding displaying “Sugar Boards/Plaques” in schools
Sakahar Falak
Regarding Establishing ‘Sugar Boards’ in Schools to Monitor and Reduce Sugar Intake Among Children.
क्र.शिसंमा/संकीर्ण/साखरफलक/विद्या शाखा/अ-२/२०२५-२६/०५ol2
दिनांक २८/१०/२०२५ 29 OCT 2025
विषय: शाळांमध्ये “शुगर बोर्ड/फलक” प्रदर्शित करण्याबाबत.
संदर्भ :
१. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग यांचे पत्र क्र. २२७८५०/NCPCR-CH (1)/2022-23/PART-2. दिनांक ०६/०३/२०२५ रोजीचे पत्र.
२. प्रस्तुत संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/संकीर्ण/साखरफलक/विद्या शाखा/अ-१/२०२५-२६/३३४२, दिनांक २६/०६/२०२५.
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांकः-संकीर्ण-२०२५/प्र.क्र. २५२/एस.डी. ४. दिनांक ०४ जुलै, २०२५.
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांकः-संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२५२/एस.डी.४, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५.
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग यांचे “शाळांमध्ये साखर फलक (बोर्ड) विद्यार्थ्यांना दिसेल असे लावून विद्यार्थ्यांमधील साखरेचे सेवन नियंत्रणात ठेवण्याबाबत” संदर्भक्र. १ व २ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. (सोबत प्रत संलग्न)
शालेय विद्यार्थ्यांमध्ये साखरयुक्त पदार्थाच्या अतिसेवनाने उद्भवणाऱ्या धोक्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्याकरिता, राज्यांतील सर्व शाळांना “शुगर बोर्ड/फलक” प्रदर्शित करण्याविषयी व चर्चासत्रे/कार्यशाळा आयोजित करण्याविषयी सूचित करण्याबाबत व त्याअनुषंगाने केलेल्या कार्यवाहीविषयी शासनास अवगत करण्याबाबत संदर्भ क्र.३ व ४ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
सदर प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याने व राज्यातील बालकांचे हित लक्षात घेऊन, राज्यांतील सर्व शाळांना “शुगर बोर्ड/फलक” प्रदर्शित करण्याविषयी केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे
