Dahavi Baravi Parikshet Aakruti Kashane Kadhavi
How to draw a diagram in the board examination Board Parikshet Aakruti Kashane Kadhavi How to draw diagram in English Marathi Hindi Language / Krutipatrika Pen Ki Pencil
Malrarashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178,179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स.न.८३२-ए. फा.प्लॉ.नं. १७८,१७९, बालचित्रवाणी शेजारी, आघारकर रिसर्च बाला इन्स्टिटयूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ४११ ००४.
परीक्षा प्राधान्य / महत्वाचे |
प्रति, क्रमांक रा.मं./ परीक्षा-६/123 पुणे,४११ ००४. दिनांक- २४.०२.२०२४ विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे |
विषय- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२४ भाषा विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात |
संदर्भ- श्री नफिज अन्वर शेख, मुंबई यांचा दि. २०/०२/२०२४ रोजीचा ई-मेल.. |
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२४ ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा अनुक्रमे दि. २१.०२.२०२४ व दि.०१.०३.२०२४ पासून आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर परीक्षांच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील आकृत्यासंदर्भातील प्रश्नांबाबत आकृती काढतांना विद्यार्थ्यांनी पेनचा वापर करावा अशी सूचना दिलेली आहे. तथापि काही विद्यार्थी आकृत्यांसाठी पेन्सिलचा वापर करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था होवू शकते. सबब सदर बाब या कार्यालयाच्या परीक्षा समितीसमोर सादर करण्यात आली असता परीक्षा समितीने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.
“भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेत आकृत्यासंदर्भातील प्रश्नांबाबत आकृती काढतांना विद्यार्थ्यांनी पेनचा अथवा पेन्सिलचा वापर केला असेल तर अशा संबंधित प्रश्नांना पेन अथवा पेन्सिल अशा साधनांचा विचार न करता विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकृत्यांचे परीक्षण करून गुणदान करण्यात यावे.” त्यानुसार भाषा विषयांशी संबंधित सर्व नियामक व परीक्षक यांना सूचना देण्यात याव्यात. |
तरी उपरोक्त निर्णयानुसार पुढील कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळास सादर करावा.
(अनुराधा ओक) सचिव, राज्यमंडळ, पुणे ०४. |
क्र. नाविमं / उ.मा./अ-२/
नाशिक-४२२००३
दि.२८/०२/२०२४
विभागीय सचिव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
प्रति,
सर्व नियामक व परिक्षक
फेब्रु – मार्च २०२४ परीक्षा
उपरोक्त राज्य मंडळाच्या पत्राची सर्व नियामक व परिक्षकांनी नोंद घेऊन पुढील योग्यती कार्यवाही करण्यात यावी.
प्रत माहितीस्तव
मा. सचिव, राज्य मंडळ, पुणे ४११००४
नाशिक विभागीय मंडळ, नाशिक-४२२००३
उपरोक्त परिपत्रक पीडीएफ डाऊनलोड करा
माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) अर्थातच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयांचा अभ्याक्रम माहिती असणे गरजेचे आहे त्या शिवाय त्यांना वार्षिक परीक्षा स्वरूप कळणार नाही त्यासाठी आम्ही विषयनिहाय अभ्यासक्रम देत आहोत त्याचा फायदा त्यांना वार्षिक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी नक्कीच होईल.
अ.क्रं. विषय
०१ इंग्रजी लेखी परीक्षा
०२ इंग्रजी अंतर्गत परीक्षा
०३ मराठी अंतर्गत परीक्षा
०४ मराठी लेखी परीक्षा
०५ हिंदी लेखी परीक्षा
०६ हिंदी अंतर्गत परीक्षा
अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आकृती कशाने काढायची ? पेनाने कि पेन्सिलने ?
दहावीच्या भाषा विषयाविषयीचा गोंधळ दूर
आकृती पेनाने काढा वा पेन्सिलने... गुण मिळणार!
दहावी आणि बारावीच्या परीक्षकां मध्ये संभ्रम
दहावीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषा विषयांमध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती, आकृत्या पेनाऐवजी पेन्सीलने काढल्या म्हणून विद्यार्थ्यांचे गुण कापू नयेत, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.राज्य शिक्षण मंडळात मराठी विषयाकरिता मॉडरेटर म्हणून काम करणारे नफीस शेख यांनी याबाबत मंडळाला पत्र लिहून हा गोंधळ दूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंडळाने गुणांबाबतची संदिग्धता दूर केली जाईल, असे शेख यांना कळविले.
सर्व नियामकांना सूचना त्याबाबत सर्व भाषा विषयांच्या नियामक सभेत सर्व नियामकांना सूचना देण्यात येणार आहेत. नियामक आपापल्या परीक्षकांना सूचना देतील. विद्यार्थ्यांनी पेन किंवा पेन्सीलने आकलन कृती आकृती काढल्यास उत्तर बरोबर असल्यास पूर्ण गुण द्यावेत. केवळ पेन्सीलने आकृती काढली म्हणून अर्धा गुण कापू नये, अशा सूचना देण्यात येतील, असे मंडळाने शेख यांना कळविले आहे. |
दहावीच्या मराठी, इंग्रजी,हिंदी अशा भाषा विषयांमध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती आकृत्या पेनाऐवजी पेन्सिलने काढल्या म्हणून विद्यार्थ्यांचा अर्धा गुण कापायचा की नाही, याबद्दल पेपर तपासणाऱ्या शिक्षकांमध्ये असलेला गोंधळ दहावीच्या परीक्षेआधी दूर व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
प्रथम भाषा मराठी द्वितीय भाषा हिंदी आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषया बद्दल अधिक जाणून घ्या
पेपर तपासणारे शिक्षक पेनाने आकृती काढली म्हणून अर्धा गुण कापतात. आकृती पेनाने काढावी अशी सूचना प्रश्नपत्रिकेत आहे. मात्र, पेन्सिलने आकृती काढलेली असल्यास अर्धा गुण कापावा, अशा सूचना नाहीत. मग हे गुण का कापले जातात, असा प्रश्न काही पर्यवेक्षक, मॉडरेटर करत आहेत. त्यांनी पेन्सिलने आकृती काढल्यास गुण कापण्याचे काहीच कारण नाही, अशी भावना 'फारूक हायस्कूल'चे शिक्षक व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात मॉडरेटर म्हणून काम करणारे नफीस शेख यांनी व्यक्त केली. शेख यांनी मंडळाला पत्र लिहून गोंधळ दूर करण्याची मागणी केली आहे.
नेमका विषय काय?
दहावीच्या परीक्षेत भाषा विषयात परिच्छेदवर आकलन कृती विचारण्यात येते. त्यासाठी चौकट किंवा इतर आकृती बनवून त्यात उत्तरे लिहिणे अनिवार्य असते. प्रश्नपत्रिकेत आकृत्या पेननेच काढाव्या, असे नमूद असते. परंतु, पेन्सिलने आकृती काढल्यास काही परीक्षक उत्तर बरोबर असूनही अर्धा गुण कापतात.
मुले आकृतीसाठी पेन्सिल का वापरतात?
• पेनाने काढलेल्या आकृतीमुळे शाई उत्तरपत्रिकेवर पसरून पेपर खराब होण्याची शक्यता असते.
• शिवाय पट्टीला पेनाची शाई लागल्याने ती खराब होते.
• वारंवार पेनाने रेघा ओढल्यानंतर व नीट चालेनासे होते.
• पेनाने तयार केलेल्या आकृतीत दुरुस्ती करता येत नाही.
ते उत्तर बोर्ड ग्राह्य धरत नाही
विद्यार्थी आकृती पेन्सिलने काढू लागले तर उत्तरही पेन्सिलनेच लिहिण्याची शक्यता आहे आणि पेन्सिलने लिहिलेले उत्तर बोर्ड ग्राह्य धरत नाही. परंतु, आकृत्या पेन किवा पेन्सिलने काढू शकतात. उत्तर मात्र पेनानेच असणे अनिवार्य आहे.
संभ्रम काय
प्रश्नपत्रिकेत किवा परीक्षकांना कुठेही अशी सूचना देण्यात आलेली नाही की, विद्यार्थ्यांनी पेन्सिलने तयार केलेल्या आकृतीस प्रत्येकी प्रश्नांना अर्धा गुण कमी करावा. तरीही काही पर्यवेक्षक आणि मॉडरेटर अर्धा गुण कापतात.