Verification of Character Appointment in Government Service
Character Certificate Verification Guidelines
Charitrya Padtalni Pramanpatra Margdarashak Suchana शासन सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी मार्गदर्शनार्थ सूचना
शासन सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांबाबत निर्णय घेण्याकरिता मार्गदर्शनार्थ सूचना व समिती गठीत करण्याबाबत
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: चापअ १०१२/प्र.क्र.६३/१६-अ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २६ ऑगस्ट, २०१४.
वाचा :
१) शासन परिपत्रक, राजकीय व सेवा विभाग, क्रमांक ३३१०/४६, दिनांक १२.८.१९४८.
२) शासन परिपत्रक, राजकीय व सेवा विभाग, क्रमांक १७२४/३४, दिनांक २०.१०.१९४८.
३) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: व्हीसीए १०६०-डी, दिनांक २७.९.१९६०.
४) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक चापअ-१००१/ प्र.क्र.११०/२००१/१६-अ, दिनांक २६.११.२००२
५) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक चापअ-१००८/ प्र.क्र.५७/२००८/१६-अ, दिनांक ३०.०९.२००८.
प्रस्तावना :-
शासन सेवेत नियुक्ती करण्यापूर्वी उमेदवाराचे चारित्र्य व पूर्व चारित्र्य यांची तपासणी करुन ते सदोष नाही याची खात्री करुन घेण्याची आवश्यकता, याबाबतच्या सूचना संदर्भाधिन क्रमांक १ च्या आदेशात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
उमेदवाराचे चारित्र्य व पूर्व चारित्र्य यांचा तपासणी अहवाल सदोष असल्यास / असमाधानकारक असल्यास, अशा प्रकरणी प्रत्येक प्रकरणातील गुन्हयाचे स्वरुप विचारात घेऊन संबंधित उमेदवारास शासन सेवेत घ्यावे किंवा कसे याबाबत सावधपणे जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता, याबाबतच्या सूचना संदर्भाधीन क्रमांक २ च्या आदेशात देण्यात आल्या आहेत.
शासन सेवेतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ च्या पदावर उमेदवारांच्या नेमणुका करण्यापूर्वी / नेमणुकीनंतर चारित्र्य व पूर्वचारित्र्य यांची तपासणी करण्याबाबतच्या सूचना संदर्भाधीन क्रमांक ३ च्या आदेशान्वये देण्यात आल्या आहेत. संदर्भाधीन क्रमांक ३ च्या परिपत्रकान्वये गट ‘क’ व गट ‘ड’ ची पदे तात्काळ भरण्याबाबत नियुक्ती अधिका-यांची खात्री झाल्यास चारित्र्य व पूर्व चारित्र्य पडताळणीच्या अधिन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदे भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
संदर्भाधीन क्रमांक ४ च्या परिपत्रकान्वये शासनांतर्गत पदांवर नेमणुका करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्व चारित्र्य याची पडताळणी करण्यासंदर्भात सुधारित साक्षांकन नमुना विहित करुन देण्यात आला आहे. सदर विहित नमुन्यात उमेदवाराने आपली वैयक्तिक माहिती भरुन दयावयाची आहे. सदर माहितीत उमेदवारांविरुध्द कोणत्याही न्यायालयात फौजदारी खटला सुरु आहे किंवा कसे, सुरु असल्यास त्याचा तपशील, प्रकरण क्रमांक, कोणत्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, गुन्हा कोणत्या कलमाखाली नोंदविला आहे, इत्यादी तपशील नमूद करावयाचा आहे.
शासन सेवेत नियुक्ती देताना ज्या उमेदवारांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे वा त्यांचेवर गुन्हयाचा आरोप आहे अथवा ज्या उमेदवारांचे प्रकरण कोणत्याही न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे अथवा ज्यांना किरकोळ गुन्हयाकरिता शिक्षा झाली आहे अथवा ज्यांना सक्षम न्यायालयाने निर्दोष सोडले आहे, अशा उमेदवारांना शासन सेवेत नियुक्ती देता येईल किंवा कसे याचे निकष ठरविणे तसेच या प्रयोजनार्थ समतोल निर्णय घेण्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सहाय्य होण्याकरिता शासन स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर एक समिती अथवा आवश्यकतेनुसार समित्या गठित करण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरून आता खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
हेही वाचाल – जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात परिपत्रक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
शासन परिपत्रक :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवार किंवा अन्य कोणत्याही विहीत निवड प्रक्रियेव्दारे जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील सरळ सेवा भरतीसाठी पुरस्कृत उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणीच्या साक्षांकन नमुन्यात उमेदवारांनी दिलेली माहिती तसेच अशा उमेदवारांच्या संदर्भात पोलीस विभागातर्फे करण्यांत आलेल्या पडताळणीच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्राधिका-याकडे सादर करण्यात आलेले सदर उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणी अहवाल याचा साकल्याने विचार करून सदर उमेदवाराची शासन सेवेत नियुक्ती करावी किंवा कसे वा ज्यांची नियुक्ती अशा चारित्र्य व पूर्वचारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त होण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली असेल ती पुढे चालू ठेवावी किंवा समाप्त करावी या करिता सक्षम नियुक्ती प्राधिकारी यांनी खालील निकष विचारात घ्यावेत तसेच पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करावा :- अधिक वाचा
उपरोक्त शासन निर्णय पीडीएफ मध्ये उपलब्ध