Changes Or Correction In School Record Of Students

Changes Or Correction In School Record Of Students

Changes Or Correction In School Record Of Students

Students Name Surname Fathers Mothers Guardians Name Caste Sub caste Date Of Birth Place Of Birth Correction Application pdf Required Documents

Student’s name/surname/father’s/mother’s guardian’s name, caste, sub-caste, date of birth, place of birth, correction application and necessary required documents

APPLICATION FOR CHANGE IN NAME / SUR-NAME
Regarding the documents to be submitted for the approval of corrections in the caste, date of birth, name, place of birth, etc. of the students.

Regarding changes or corrections in date of birth, name, surname, caste, etc. recorded in the General Register.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विदयार्थ्याची जात, जन्मतारिख, नाव, जन्मठिकाण इत्यादी यांच्यामध्ये दुरुस्ती मान्यता आदेशकामी सादर करावयाच्या कागदपत्राबाबत..

सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत

विदयार्थ्यांचा नाव/आडनाव/वडिलांचे/आईचे नाव दुरुस्ती बाबत.

विदयार्थ्यांचा जातीत दुरुस्ती बाबत.

३. विदयार्थ्यांची जन्मतारिख/जन्मठिकाण दुरुस्ती बाबत.

विदयार्थ्यांच्या पालकांचे नाव व आडनाव बदल बाबत (दत्तक विधानानुसार अथवा आईचे पुर्नविवाह नुसार)

विदयार्थ्यांच्या पालकांचे नावा ऐवजी आईचे नाव लावणे बाबत

जन्मदिनाक बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

नाव व आडनावातील बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

जातीत व पोटजातीत बदल बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

विदयार्थ्यांचा नाव/आडनाव/वडिलांचे/आईचे नाव / जातीत / पोटजातीत / जन्मतारिख / जन्मठिकाण / पालकांचे नाव व आडनाव / पालकांचे नावा ऐवजी आईचे नाव / जन्मदिनाक बदल / दुरुस्ती बाबत.

माध्यमिक शाळा संहिता नियम २६.४ नुसार सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नांव आडनाव, जात-पोटजात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडुन किंवा त्याच्या वतीने (पालकांकडून) आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे. त्याच्या किंवा त्याच्या वतीने केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

वाचाः-१. महाराष्ट्र खाजगी शाळा संहिता नियम १९८६ चे नियम २६.४ अन्वये
२. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासननिर्णय क्र. एसएसएन/१००९ (४०६/०९)/माशि-२ दि.२४/०२/२०१०
३. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ कलम ३(१) अन्वये लोकसेवा घोषित

विषयांकीत प्रकरणी उक्त संदर्भिय पत्रानुसार या परिपत्रकान्वये कळविणेत येते की, शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद अहमदनगर विभागाच्या अधिनस्त सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा मधील विदयार्थ्यांचा जात, जन्मतारिख, नाव, जन्मठिकाण इ. यांच्यामध्ये दुरुस्ती मान्यता आदेश मिळणेकामी प्रस्ताव या कार्यालयास सादर केले जातात. त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत याबाबत परिपत्रक निर्गमित करणे संदर्भ क्र. ०३ नुसार गरजेचे आहेत. प्रस्तावसोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.

१. विदयार्थ्यांचा नाव/आडनाव/वडिलांचे/आईचे नाव दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) जे नाव दुरुस्त करुन पाहिजेत त्या नावाचे विदयार्थ्यांचा आधारकार्ड, आईचे, व पालकांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, विदयार्थ्यांचा जन्मदाखला अथवा महाराष्ट्र शासन राजपत्र

२. विदयार्थ्यांचा जातीत दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०३ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) उपविभागिय अधिकारी यांचेकडिल विदयार्थ्यांचा जातीचा दाखला (६) उपविभागिय अधिकारी यांचेकडिल पालकांचा जातीचा दाखला

३. विदयार्थ्यांची जन्मतारिख/जन्मठिकाण दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०१ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नावासहीत जन्मदाखला
(६) विदयार्थ्यांचा इ.१ ली, ४ थी व ७ वी चे निर्गम उतारा

४. विदयार्थ्यांच्या पालकांचे नाव व आडनाव बदल बाबत (दत्तक विधानानुसार अथवा आईचे पुर्नविवाह नुसार)
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नाव बदल बाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र (६) दुय्यम निंबधक कार्यालयाकडील दत्तकविधानपत्र (७) आईचे मा. न्यायालयाकडिल घटस्फोट निकाल (८) आईचे पुर्नविवाह नोंदणी प्रमाणपत्र (९) विदयार्थ्यांच्या नावासहीत रेशनकार्ड

५. विदयार्थ्यांच्या पालकांचे नावा ऐवजी आईचे नाव लावणे बाबत
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नाव बदल बाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र (६) आईचे मा. न्यायालयाकडिल घटस्फोट निकाल व निकालामध्ये सदर विदयार्थ्यांची कस्टडीयन आईकडे असणे आवश्यक आहे (७) विदयार्थ्यांच्या नावासहीत रेशनकार्ड
उपरोक्त प्रस्तावामधील सर्व कागदपत्रे शाळेचे मुख्याध्यापक यांनी पडताळणी करुन साक्षांकीत करुन जोडणे आवश्यक आहे तसेच. प्रस्तावाची एक प्रत शाळेच्या दप्तरी कायम ठेवणेत यावी. जे विदयार्थी शाळेमध्ये शिकत नसेल त्या विदयार्थ्यांचा नावात/जन्मतारिख/जात दुरुस्ती करता येत नाही याची नोंद घ्यावी. वरिल प्रमाणे परिपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करुन सदरचा मंजुरी आदेश सात दिवसात या कार्यालयातुन घेवुन जाणे संदर्भ क्र.०३ नुसार आवश्यक आहे. तसेच इ.११ वी १२ च्या विदयार्थ्यांचा नावात/जन्मतारिख/जात दुरुस्ती बाबतचा प्रस्ताव मा शिक्षण उपसंचालक पुणे यांचेकडे सादर करावे. या कार्यालयास सादर करु नये. व या कार्यालयास दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव परस्पर पालकांना देवुन कोणीही पाठवु नये. याबाबत दक्षता घ्यावी. सदरचे परिपत्रक सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागु राहील.

जन्मदिनाक बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. जन्म नोंदवहीतील प्रमाणित उतारा
३. लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत
४. खिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रत
५. विद्यार्थ्याच्या ख-या जन्मतारखेबाबत वृतिधारी दंडाधिका-यासमोर विद्यार्थ्याच्या आईवडिलानी किवा पालकाने केलेले शपथपत्र .
६. नोंदवहीतील उतारा (जनरलरजिस्टर) प्रमाणित प्रत .

नाव व आडनावातील बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
(मुख्याध्यापक)
२. दत्तक विधानामुळे बदल असलेस त्याबाबत दत्तक पत्राची प्रमाणित केलेली प्रत
३. विवाहामुळे बदल झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
४. आई वडीलानी (पालक) यानी वृत्तिधारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञाप्रत
५. महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूची
६. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर उतारा) प्रमाणित प्रत.

जातीत व पोटजातीत बदल बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना ३ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. जातीचा दाखला (जिल्हादंडाधिकारी किंवा त्यानी प्रधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी, मानवसेवा दंडाधिकारी किवा समाजकल्याण अधिकारी)
३. आईवडीलानी (पालक) यानी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञाप्रत
४. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर) प्रमाणित प्रत .

नमुना क्रमाक १
वर्णलेखनातील किंवा आकडयातील दुरूस्तीसह जन्मतारखेत बदल करण्याकरीता अर्ज

Changes Or Correction In School Record Of Students
Changes Or Correction In School Record Of Students

नमुना क्रमांक २
वर्णलेखनातील दुरूस्तीसह नाव व आडनावात बदल करण्यासाठी अर्ज

Changes Or Correction In School Record Of Students
Changes Or Correction In School Record Of Students

नमुना क्रमांक ३
जातीत किंवा पोटजातीत बदल करण्याकरीता अर्ज

Changes Or Correction In School Record Of Students
Changes Or Correction In School Record Of Students

Leave a Comment

error: Content is protected !!