As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित

As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable

जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/FS/2025/

दिनांक- 02/07/2025

सुधारित परिपत्रक

विषय- नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत.

संदर्भ-

  1. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/FS/1292699/2025 दिनांक 18/06/2025
  2. या कार्यालयाकडील परिपत्रक जाक्र. विप्रा/अविवि/तावि/3605अ, दिनांक 05/10/2017
  3. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) (NCF-FS) 2022
  4. राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) (SCF-FS) व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2024
  5. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- 2025/प्र.क्र.94/एस.डी.-4 दि. 30/06/2025

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) 2024 व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संदर्भ क्र.02 येथील परिपत्रक दिनांक 05/10/2017 अन्वये लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.

संदर्भ क्र.1 अन्वये निर्गमित करण्यात आलेले दि. 18/06/2025 रोजीचे या कार्यालयाचे परिपत्रक याद्वारे रद्द करण्यात येत आहे. संदर्भीय शासन निर्णयांना अनुसरुन नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने इयत्ता पहिली व दुसरीसाठी सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सुधारित सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

IMG 20250703 155112

IMG 20250703 161155

उपरोक्त संदर्भाना अनुसरुन सुधारित अभ्यासक्रमासाठी इ.1ली साठी विषय निहाय वेळेचे सुधारित नियोजन लागू करण्यात येत आहे. तसेच एकाच सत्रात भरणाऱ्या शाळा व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्यासाठीही वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे.

इ. शालेय वेळापत्रक (सूचना)

  1. सदर निर्देश हे इ.1 ली साठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच अंमलात येतील. इ.2 री साठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील.
  2. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल. इतर वर्गासाठी त्यांच्या विषयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावी.
  3. यासोबत नमुन्यादाखल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक हे एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही.
  4. वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी 2 तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे.
  5. पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल.
  6. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे.
  7. दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण (AEP) तासिकांसाठी वेळ देला आलेला नाही, अशा शाळांनी शालेय वेळेव्यतिरिक्त / वि‌द्यार्थी विभागणी करून, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत.
  8. AEP ही पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही तथापि ह्या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या आहेत.
  9. आनंददायी शनिवार मधील उपक्रम, एका सत्रात भरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना शालेय वेळेव्यतिरिक्त घेता येतील.

सोबत परिशिष्ट-अ-1,2 विषयनिहाय तासिका, परिशिष्ट-ब-1,2 नमुना वेळापत्रक.

Circular PDF COPY LINK

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत, माहितीस्तव,

  1. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
  2. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
IMG 20250703 161625

IMG 20250703 161819

IMG 20250703 162053

Also Read 👇

image 23
As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable

As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable

Regarding the subject plan, school work days, subject-wise division of hours and school timetable for classes 1 and 2 as per the new curriculum.

According to the new curriculum, the subject plan, school work days, subject-wise division of hours and school timetable for classes 1 and 2 have been fixed.

जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/FS/२०२५/
दिनांक- १८/०६/२०२५

        परिपत्रक

विषय- नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत.

संदर्भ-
१. राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४
२. या कार्यालयाकडील परिपत्रक जाक्र. विप्रा/अविवि/तावि/३६०५अ, दिनांक ०५/१०/२०१७
३. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ दि. १६/०४/२०२५
४. शासन शुद्धिपत्रक क्रमांकः संकीर्ण- २०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४दि. १७/०६/२०२५


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संदर्भ क्र.०२ येथील परिपत्रक दिनांक ०५/१०/२०१७ अन्वये लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.


संदर्भ क्र.३ येथील दि.१६/०४/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०२५-२६ पासून टप्प्या टप्प्याने करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सन.२०२५-२६ पासून इ.१ली साठीच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संदर्भ क्र.३ येथील दि. १७/०६/२०२५ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा असेल असे नमूद केलेले आहे. त्यास अनुसरुन इयत्ता पहिलीसाठी (नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने) सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
सदर तरतूदी सन. २०२५-२६ पासून लागू असतील.

क्रमराठी माध्यमाच्या शाळाइंग्रजी माध्यमाच्या शाळाअन्य माध्यमाच्या शाळा
०१इंग्रजी (स्तर-१)इंग्रजी (स्तर-१)माध्यम भाषा (स्तर-१)
(हिंदी/ उर्दू / गुजराती / कन्नड/ तमिळ / तेलुगु/सिंधी/बंगाली)
०२इंग्रजी (स्तर-२)मराठी (स्तर-२)इंग्रजी (स्तर-२)
०३हिंदी अथवा इतर भारतीय भाषाहिंदी अथवा इतर भारतीय भाषामराठी (अन्य माध्यमांसाठी)
०४ गणितगणित
गणित
०५ कलाशिक्षणकलाशिक्षणकलाशिक्षण
०६ आरोग्य व शारीरिक शिक्षणआरोग्य व शारीरिक शिक्षणआरोग्य व शारीरिक शिक्षण
०७ कार्यशिक्षणकार्यशिक्षणकार्यशिक्षण


बनी (स्काऊट / गाईड) – एच्छिक
कार्यानुभव विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल.
बनी (स्काऊट / गाईड) हा उपक्रम शाळांसाठी ऐच्छिक राहील.

image 32
As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable

आ. विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी-
इयत्ता पहिली व दुसरीसाठी वार्षिक दिवस व कालावधीची विभागणी पुढीलप्रमाणे असेल.

कामकाजवार्षिक दिवस३६५
शाळेतील अध्ययन-अध्यापन कृती (वर्गकार्य)२१० (२१०/६ दिवस ३५ आठवडे)शालेय कामकाज २३७ दिवस.
परीक्षा, मूल्यांकन व अनुषंगिक कृती१४
सहशालेय उपक्रम (दप्तराविना १० दिवस, आनंददायी शनिवार, शैक्षणिक सहल, शिबीर, सण-उत्सव इ.)१३
रविवार सुट्टया५२एकूण सुट्टया १२८ दिवस
अन्य सुट्टया७६
 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ (NCF-FS) व राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ (SCF-FS) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, संदर्भिय शासन निर्णयांना त्याचबरोबर अस्तित्वात असणाऱ्या सूचनांना अनुसरुन सुधारित अभ्यासक्रमासाठी इ.१ली साठी विषय निहाय वेळेचे सुधारित नियोजन लागू करण्यात येत आहे. तसेच एकाच सत्रात भरणाऱ्या शाळा व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्यासाठीही वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे. या स्तरासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ (NCF-FS) नुसार वार्षिक ९९० तास अध्ययन होणे या बाबींची पूर्तता होण्यासाठी याप्रमाणे वेळेचे नियोजन लागू करणे आवश्यक आहे.
इ. शालेय वेळापत्रक (सूचना)
१. सदर निर्देश हे इ.१ली साठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच अंमलात येतील. इ.२री साठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील.
२. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल. इतर वर्गासाठी त्यांच्या विषयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावी.
३. यासोबत नमुन्यादाखल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक हे एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही.
४. वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी २ तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे.
५. पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल.
६. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे.
७. दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण (AEP) तासिकांसाठी वेळ देता आलेला नाही, अशा शाळांनी शालेय वेळेव्यतिरिक्त/ विद्यार्थी विभागणी करून, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत.
८. AEP ही पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही तथापि ह्या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या आहेत.
९. आनंददायी शनिवार मधील उपक्रम, एका सत्रात भरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना शालेय वेळेव्यतिरिक्त घेता येतील.
सोबत परिशिष्ट-अ विषयनिहाय तासिका, परिशिष्ट-ब नमुना वेळापत्रक.

(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत, माहितीस्तव,
१. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

परिशिष्ट-अ
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
पायाभूत शिक्षण- इयत्ता पहिली व दुसरी साठी विषय निहाय वेळेचे नियोजन (सर्व माध्यमांसाठी)

image 25
As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable

image 26
As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable

टीप-
दैनंदिन परिपाठ, शाळेतील मधल्या सुट्या, AEP यांचा समावेश यामध्ये नाही. सदरचा तपशील केवळ विषयांच्या अध्ययन-अध्यापन कृतींचा आहे.

परिशिष्ट-ब
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे इयत्ता पहिली व दुसरी साठी नमुना वेळापत्रक (सर्व माध्यमांसाठी)

(सर्व माध्यमांसाठी)
तक्ता-१
एकाच सत्रात भरणा-या शाळांसाठी

image 31
As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable

तक्ता-२
दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी

image 29
As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable

As per the new curriculum
classes 1 and 2 school work days
classes 1 and 2 subject plan / framework
classes 1 and 2 subject wise of hours
classes 1 and 2 Perid wise hours
classes 1 and 2 school timetable

1 thought on “As Per New Curriculum For Classes 1st 2nd Subject Plan School Working Days Teaching Hours Timetable नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित”

Leave a Comment

error: Content is protected !!