Anganwadi Sevika And Madatnis Bharti
Anganwadi Sevika And Madatnis Bharti
Anganwadi Sevika And Madatnis Bharti Update
Anganwadi Sevika And Anganwadi Madatnis Bharti Update
Anganwadi workers and Anganwadi helpers Recruitment
भरती अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी आपल्या समूहात सामील व्हा
महिला व बाल विकास विभागात भरणार ८ हजारांवर पदे
महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असून, महिला व बालकांसाठीच्या योजनांना गती मिळणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.
याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.
हेही वाचाल –
२३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचाल –