Amendment In Transfer Policy Of ZP Group C And D Employees
Amendment In Transfer Policy Of ZP Group C And D Employees
Amendment In GR Dated 15 May 2014 Transfer Policy Of ZP Group C And D Employees
Amendment in the policy of intra-district transfers of Group-C (Class-3) and Group-D (Class-4) cadre employees in the government decision of the Zilla Parishad dated 15th May 2014
जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा.
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः जिपब-११२५/प्र.क्र.१२५/आस्था-१४, मंत्रालय, मुंबई-
दिनांक: २३ मे, २०२५
वाचा :-
शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४
शासन शुध्दीपत्रक:-
जिल्हा परिषदेच्या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४ नुसार निश्चित केलेले आहे.
सदर शासन निर्णयातील “प्रकरण-२, जिल्हास्तरीय बदल्या मधील अ.क्र.३ येथील तक्त्यामधील अ) प्रशासकीय बदली (१) व (२) येथील खालील मजकुर वगळण्यात येत आहे,-
बदलीचा प्रकार टक्केवारी
अ) प्रशासकीय बदली
१) गट-क संवर्गातील कर्मचारी (प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्राम सेवक/ग्राम विकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी वगळून (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी/नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात)
$ १० % अनिवार्य
२) प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्राम सेवक, ग्राम विकास अधिकारी व आरोग्य कर्मचारी (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात)
$ १०% अनिवार्य
$ १) मात्र, ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातुन बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी.
$ २) वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान १ अथवा २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.
व त्याऐवजी खालील मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.
बदलीचा प्रकार
टक्केवारी
अ) प्रशासकीय बदली
$ १०% अनिवार्य
१) गट-क संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी (प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळून) (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व
ज्या जिल्ह्यात आदिवासी/नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात)
$ १) मात्र, ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातुन बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी.
$ २) वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान १ अथवा २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.
सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०५२३१७३४२१५९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
(ज्योत्स्ना अर्जुन)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
Amendment in Government Resolution Dated 15.5.2014 regarding Transfer Policy of Zilla Parishad Group C and D employees.