AIDS Awareness Program एड्स जनजागृती कार्यक्रम एड्स संदर्भात दृकश्राव्य माध्यमाद्वारे तसेच व्याख्यानाद्वारे तांत्रिक माहिती देणे व एड्सतपासणीकरीता स्वयंचलित परिक्षण संचाचे प्रात्यक्षिक यासंदर्भात एड्स नियंत्रण संस्था यांच्या सूचना

AIDS Awareness Campaign

AIDS Awareness Program

AIDS Awareness Campaign

क्र. प्राशिसं/संकीर्ण-८०२/एचआयव्ही एड्स विषयी तांत्रिक माहिती/२०२५/

दिनांक – ९/९/२०२५

विषय :- एड्स संदर्भात दृकश्राव्य माध्यमाद्वारे तसेच व्याख्यानाद्वारे तांत्रिक माहिती देणे व एड्सतपासणीकरीता स्वयंचलित परिक्षण संचाचे प्रात्यक्षिक यासंदर्भात एड्स नियंत्रण संस्था यांच्या सूचना

संदर्भ :- एड्स नियंत्रण संस्था, नवी दिल्ली यांचे प्राप्त पत्र दि.५.७.२०२५

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, एड्स नियंत्रण संस्था, नवी दिल्ली ही भारत सरकारकडे नोंदणीकृत संस्था असून या संस्थेमार्फत शासकीय विभागांच्या सहकार्याने एचआयव्ही / एडस विषयी जनजागृती करण्यात येते. या संदर्भात संस्थेकडून सेमिनार, कार्यशाळा, आरोग्य शिबिरे, रॅलीचे आयोजन, चित्रपट प्रदर्शन, इत्यादींचे आयोजन केले जाते.

एड्स बद्दल अधिक जाणून घ्या World HIV / aids day Quiz जागतिक एड्स दिन : प्रश्नमंजुषा

सदरील उपक्रम शासकीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था तसेच बाजारपेठा, व्यावसायिक संकुल, शाळा महाविदयालये, बँका, तुरुंग, रेड लाईट क्षेत्रे याठिकाणी राबविण्यात येतात.

तरी आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षण विभागातील कर्मचारी आणि शाळांतील शिक्षक यांच्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार सदर संस्था करीत असून यासंदर्भात संस्थेला एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यास आणि सहभागी होण्यासाठी सहकार्य करण्याबाबत विनंती केली आहे.

आपल्या स्तरावरुन एड्स कंट्रोल फाऊंडेशन यांच्या विनंतीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करुन त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.

परिपत्रक पीडीएफ लिंक

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

AIDS Awareness Program
AIDS Awareness Program

प्रति.
१) विभागीय उपसंचालक (सर्व)

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व)

३) शिक्षण निरीक्षक (उत्तर / दक्षिण / पश्चिम)

४) शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, न.पा./न.प./ म.न.पा. (सर्व)

प्रत माहितीस्तव सविनय सादर –

१) मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे

२) एड्स नियंत्रण संस्था, ए-११३, विवर्स कॉलनी, अशोक विहार, फेज-४, नवी दिल्ली

Leave a Comment

error: Content is protected !!