Admission Capacity Fixed For Junior College
Admission Capacity Fixed For Junior College
Admission Intake capacity for junior colleges fixed
Student admission capacity for junior colleges determined
Number of seats fixed for additional branches/units in junior colleges
Uccha Madhyamik Patsankhya Nishit
Kanishtha Mahavidyalaya Atirikt Shakha Patsankhya Nishit
महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ मधील तरतुदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयांसह अन्य कनिष्ठ महाविद्यांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडी करीता पटसंख्या निश्चित करण्याबाबत
तारीखः ३० सप्टेंबर, २०२५
वाचा –
१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः प्राशातु- २०२२/प्र. क्र. २६४/ एसएम-५, दि.०७ फ्रेब्रुवारी, २०२३
२) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य पुणे यांचे क्र. शाळा व्यव. एस-३/पटसंख्या निश्चिती/२०२५/३३९६५८, दि. २३ जुलै, २०२५
प्रस्तावना –
उपरोक्त वाचा येथे नमूद दि.०७ फेब्रुवारी, २०२३ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र
स्वयंअर्थसहायित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ मधील तरतूदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्वाववरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालये वगळता अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडीस मान्यता प्रदान करताना वर्गाची बैठक क्षमता (Seating Capacity) निकष नमूद करण्यात आले आहेत. सदर निकष निश्चित करताना नवीन मान्यताप्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालये यांना वगळण्यात आले होते. १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यपद्धती सुधारणा (Govemment Process Reengineering) अंतर्गत शासनाकडील अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातील तुकडींची वर्गाची बैठक क्षमता (Seating Capacity) निश्चित करून या प्रकरणापुरते अंतिम मान्यता प्रदान करण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना प्रत्यावर्तित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन शुद्धीपत्रक
उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील नमूद शासन निर्णयाचे शिर्षकातील
“महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ मधील तरतूदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालये वगळता अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडी करीता पटसंख्या निश्चित करण्याबाबत
च्या ऐवजी
महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ मधील तरतूदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयांसह अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडी करीता पटसंख्या निश्चित करण्याबाबत”
असे वाचावे.
२. तसेच सदर शासन निर्णयातील पहिल्या परिच्छेदातील
“महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ मधील तरतूदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्वाववरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालये वगळता अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडीस मान्यता प्रदान करण्याबाबत खालीलप्रमाणे निकष विहित करण्यात येत आहे:-“.
च्या ऐवजी
“महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ मधील तरतूदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्वाववरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयांसह सदरच्या शासन दिनांकापूर्वी मान्यता मिळालेल्या अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडीस मान्यता प्रदान करण्याबाबत खालीलप्रमाणे निकष विहित करण्यात येत आहे:-
असे वाचावे.
३. तसेच संदर्भाधीन शासन निर्णयात खालील प्रमाणे नवीन परिच्छेद क्र. ३ समाविष्ट करण्यात येत आहे. * सदर तुकडीच्या विद्यार्थी क्षमतेमध्ये ८० वरून १२० इतकी वाढविल्यामुळे कोणतेही वाढीव शिक्षक/शिक्षकेतर पद/ पदे अनुज्ञेय होणार नाही या अटीच्या अधीन राहून आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना कमाल १२० विद्यार्थी क्षमतेपर्यंत अंतिम मान्यता प्रदान करण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना प्रदान करण्यात येत आहेत.”
सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०९३०१३१४१३८३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन शुद्धिपत्र पीडीएफ प्रत लिंक
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांकः MSC-२१०४२/३/२०२५-MSC-(SM-५),मुंबई-३२
